गॅजेट्स जे उपयुक्त ठरतील वर्क फ्रॉम होम साठी

शेअर करा

सध्याच्या जागतिक महामारीच्या काळात बहुतेक लोक हे घरून काम (work from home) करत आहेत. काही लोकांना घरून काम करणे म्हणजे अतिशय कंटाळा आणि कामाची इच्छा न होणे. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपले वर्क फ्रॉम होमी अधिक सोयीस्कर होईल. गॅझेट्स जे उपयुक्त ठरतील वर्क फ्रॉम होम साठी.

वायरलेस माऊस आणि कीबोर्ड

Keyboard work

 

अगदी घरीच बसून काम करत असल्यामुळे, आपल्या टेबल वर अनेक वेळेस बाकीच्या वस्तू पडलेल्या असतात. कमी जागेत माउस आणि किबोर्ड अड्जस्ट होत नाहीत आणि वायर मूळे अडथळा निर्माण होतो. काही लोकांना खाता खाता काम करायची सवय असते. या मूळे आपण वायरलेस माउस आणि कीबोर्ड चा वापर करावा, जेणे करून स्पेस पण मिळेल आणि अगदी ५ ते ८ फूट दुरून आपल्याला PC हॅन्डल करता येईल.(work from home).

वेब कॅम

webcam

ऑफिस मध्ये काम करत असताना सर्व एम्प्लॉयी / डिपार्टमेंट्स एकाच ठिकाणी असतात आणि सर्व एकत्रित बसून मिटींग्स करू शकतात. पण घरी असल्याने आपल्याला फक्त विडिओ कॉल चा पर्याय राहतो. त्यासाठी एक चांगला वेब कॅम असणे गरजेचे. जेणेकरून आपण विडिओ कॉल मध्ये अधिक सोयीस्कर रीतीने भाग घेऊ शकू.

USB हब पोर्ट

USB Hub work from home

वायरलेस कीबोर्ड आणि माउस, पेन ड्राईव्ह, वायफाय अडॅप्टर हया सर्वासाठी USB पोर्ट गरजेचा असतो. एकाच वेळेस हे सर्व वापरास लागणे म्हणजे लॅपटॉप/पीसी ला ३ किंवा त्या पेक्षा जास्त पोर्ट असावे लागतात, त्यासाठी USB पोर्ट महत्वाचा. सर्व पीसी ला २-३ पेक्षा जास्त पोर्ट नसतात. एका USB पोर्ट ला आपण ५ ते ६ डीवाईसेस जोडू शकतो.(Work from home).

हेडफोन्स

Headphones

मीटिंग्स साठी कॅमेरा जितका महत्वाचा त्या पेक्षा जास्त हेडफोन्स महत्वाचे, कारण काँफेरन्स मध्ये एकवेळेस आपण व्यवस्थित नाही दिसलो तरी चालेल पण आपला आवाज नीट पोचला पाहिजे. नॉइस कॅन्सलिंग हेडसेट हे साधारण हेडसेट पेक्षा जास्त सोयीस्कर ठरतात. कारण घरातील गोंगाटात आपल्याला व्यवस्थित मीटिंग्स अटेंड करता आल्या पाहिजेत.

नोटबुक आणि पेन

Notebook

या सर्व आधुनिक गॅजेट्स च्या बरोबर वही आणि पेन बाळगणे तितकेच महत्वाचे. काहीवेळेस लोड जास्त असल्याने टास्क होत नाहीत. त्यासाठी कागदावर उतरवून घेऊन आपण टास्क चे वेळेनुसार वर्गीकरण करू शकतो.(Work from home).

वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

 
How to use google meet
error: Content is protected !!