जागतिक आरोग्य संघटना माहिती मराठी
WHO full form is World Health Organisation. जागतिक आरोग्य संघटना ही संयुक्त राष्ट्र (United Nations) या संस्थेच्या मार्गदर्शनानुसार काम करते. सर्व देश एकत्र येऊन, एकमेकांना सहकार्य करून, मैत्रीपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र (UN) ची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्र या संस्थेने इतर विविध संस्था स्थापन केल्या त्यात UNESCO, IMF, World Bank, WHO आणि इतर. प्रत्येक संस्था एका विशिष्ट क्षेत्रात कार्य करते. जागतिक आरोग्य संघटना मुख्यत्वे आरोग्य संबंधित विषयांवर काम करते. (WHO information in Marathi).
स्थापना
७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संघटना स्थापन करण्यात आली. म्हणूनच हा दिवस जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा करण्यात येतो. सर्वांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना विविध उपायोजना करते. जगातील १९४ देश या संघटनेचे सभासद आहेत.
महामारीच्या काळात गरीब देशापर्यंत मदत पोचत नाही किंवा निधीचा अभाव असतो मात्र प्रत्येक देश, मग तो गरीब असो व श्रीमंत सर्वाना सामान आरोग्य सेवा-सुविधा पोचवण्याचे काम जागतिक आरोग्य संघटना करते. सर्वाना सामान आरोग्य सोयी सुविधा मिळाल्या हव्यात हे मूळ उद्दिष्ट ठेवून कार्य केले जाते. लस, औषधे, यंत्र आणि इतर गोष्टी पुरवण्याचे काम WHO करते.

मुख्यालय
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जेनेव्हा, स्विझरलँड येथे आहे आणि भारतातील मुख्यालय दिल्ली येथे आहे. जगभरात ६ मुख्य कार्यालये आणि १५० विभागीय कार्यालये आहेत. प्रत्येक देशाला आरोग्य स्तिथिनुसार काही नियम आणि सूचना दिल्या जातात. विविध उपाययोजना राबवल्या जातात. सर्व नियम, सूचना, योजना व्यवस्थित कार्य कराव्यात यासाठी मुख्यालयातून व्यवस्थापन आणि नियंत्रण केले जाते. तसेच या सर गोष्टींचे निरीक्षण करून अहवाल देखील जाहीर केला जातो.
संशोधन
विविध रोगांवर संशोधन करणे आणि त्यावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना काम करते आतापर्यंत १० अति गंभीर स्वरूपाचे रोग शोधले गेले आहेत, यातील काहींवर लास शोधण्यास यश आले आहे आणि काहींवर अजून संशोधन सुरु आहे. महत्वाचे संशोधन म्हणजे १९८० मध्ये स्मॉल पॉक्स नावाच्या रोगांवर देखील World Health Organisation ने मात केली आहे. तसेच पोलिओ आणि इबोला यांसारख्या रोगांवर देखील मात करण्यात यश मिळाले आहे.
निधी
सभासद असणारे देश दरवर्षी काही रक्कम जागतिक आरोग्य संघटनेला देतात. अमेरिकेकडून World Health Organisation ला सर्वाधिक निधी प्राप्त होतो. सरकारी संस्था, जागतिक बँक, सामाजिक संस्था अश्या विविध संस्थांमार्फत निधी दिला जातो. संशोधन, ओषध, लस, यंत्र सामग्री इत्यादी गोष्टींवर बराच निधी खर्च होत असतो, त्यासाठी विविध मार्गानी मिळालेला निधीचा वापर केला जातो. (WHO information in Marathi).
अलीकडील लेख