IPO म्हणजे काय ? What is IPO Means in Marathi?

शेअर करा

IPO म्हणजे काय ? What is IPO Means in Marathi?

IPO म्हणजे Initial Public Offering. एक खाजगी कंपनी ज्यावेळी पहिल्यांदा आपले भाग (shares) विक्रीस काढते त्यावेळी त्यास IPO असे संबोधले जाते. अशा खाजगी कंपन्या ज्या शेअर बाजारात नोंदणीकृत नाहीत, त्यांना थेट  भाग (shares) विक्री करता येत नाहीत. यासाठी IPO जाहीर केला जातो. IPO मार्फत खाजगी कंपनीची शेअर बाजारात नोंद होते आणि भाग विक्री प्रारंभ होते. खाजगी कंपनी शेअर बाजारात नोंद करते, तेव्हा ती सार्वजनिक कंपनी होते.

व्यवसाय वृद्धीसाठी  

जेव्हा एखादा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात, तेव्हा अनेक बदल केले जातात.जसे कर्मचारी, जागा, सुविधा आणि इतर.अप्रत्यक्षपणे व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल/पैसे आवश्यक असतात. उत्पन्न वाढवायचे असेल तर भांडवल वाढवावे लागेल, भांडवल वाढवण्यासाठी शेअर बाजार नोंदणी केली जाते, जेणेकरून आपले भाग (shares) विक्री करता येतील. इथून भांडवल मिळते आणि ते व्यवसाय वाढीसाठी गुंतवले जाते.

व्यवसाय/कंपनी लहान माध्यम स्वरूपात असेल तर त्यात फार कमी लोक गुंतवणूक करतात आणि त्याच प्रमाणे उत्पन्न मिळते. मात्र ज्यावेळेस या व्यवसायाची शेअर बाजारात नोंदणी केली जाते त्यावेळेस सामान्य लोक देखील या व्यवसायात भागीदारी घेऊ शकतात. भाग विकत घेऊन कोणीही गुंतवणूक करू शकतो. यात व्यवसाय आणि गुंतवणूकदार या दोघांचा फायदा होतो.

भांडवल वाढवण्यासाठी बँक कर्जाचा पर्याय देखील आहे. कर्ज घेतले तर त्यावर असणाऱ्या व्याजदराप्रमाणे पैसे परत द्यावे लागतात. या मध्ये व्यवसायाचे उत्पन्न झाले अथवा नाही याची परिणाम परतफेडीवर होत नाही. जर नुकसान झाले तरीही व्याजदर प्रमाणे परतफेड करावीच लागेल. याउलट शेअर बाजारात नफा/तोटा या प्रमाणे गुंतवणूक आणि परतफेड केली जाते. (IPO means in Marathi)

IPO Means in Marathi
IPO म्हणजे काय? What is IPO means in Marathi?

SEBI नियम 

IPO विक्रीस काढण्याआधी कंपनीचे मूल्यांकन (valuation) केले जाते आणि पत (credit) देखील तपासली जाते. भागाची किंमत किती असावी, भांडवलाच्या किती टक्के भाग काढायचा, लिलाव पद्धत यासाठी हे तपासले जाते. तसेच SEBI (Securities and Exchange Board of India) संस्थेच्या नियमानुसार IPO ची प्रक्रिया करणे बंधनकारक असते.

संबंधित कंपनीला सर्व मुद्देसूद माहिती SEBI समोर मांडावी लागते. शेअर बाजारात नोंद झाल्यानंतर देखील SEBI चे नियम व अटी पाळणे बंधनकारक असते. SEBI ही एक सरकारी यंत्रणा आहे, जी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही संस्था काम करते.

एखादी व्यक्ती जर IPO मध्ये भाग विकत घेत असेल तर तो प्रत्यक्षपणे भाग विकत घेत आहे, यासाठी कुठलीच मध्यस्थीची/ दलालाची गरज नसते. IPO जाहीर झाल्यानंतर कमीत कमी तीन आणि जातीत जास्त दहा दिवस खुला  असतो. जास्त लोक यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतात, त्यामुळे सहजासहजी IPO भेट नाही तर थोडे प्रयत्न करावे लागतात.

निष्कर्ष      

ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग अनेक आहेत मात्र शेअर मार्केट हा जास्त पसंतीचा मार्ग आहे. मागच्या दोन वर्षात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी संबंधित ज्ञानाची आवश्यकता असते. अनेक लोक यासाठी प्रशिक्षण देतात आणि गुंतवणूक करण्यासाठीचा सल्ला देतात. ज्ञान आणि अनुभव या दोन्ही गोष्टी आल्या तर नक्कीच फायदा होतो.(What is IPO means in Marathi).


अलीकडील लेख

 • ऑनलाईन PF कसा काढावा ?
  ऑनलाईन PF कसा काढावा? ऑनलाईन पीएफ कसा काढावा (PF withdrawal rules in Marathi) हे बहुतेक लोकांना माहित नसते. त्यामुळे आपण एखाद्या एजन्ट किंवा टॅक्स कंसल्टंट/CA कडे जाऊन त्यांचा सल्ला घेतो, त्याप्रमाणे ते त्यांचे कमिशन पण … Read more
 • राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचे स्रोत नेमके कोणते? राजकीय पक्ष आणि देणग्या…
  राजकीय पक्ष आणि देणग्या : भारतात तब्बल २५९८ इतके नोंदणीकृत पक्ष आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा समावेश होतो. कुठलाही राजकीय पक्ष हा त्या पक्षाला मिळालेल्या देणग्यांवरती कार्यरत असतो. या देणग्या शिवाय आर्थिकरित्या मजबूत होण्यासाठी दुसरा … Read more
 • घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग
  ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग :  व्यवसाय आणि नोकरीचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यातच तंत्रज्ञान विकासामुळे कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज कमी झाली आहे. व्यवसायामध्ये देखील ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन कामाच्या संधी … Read more
 • ईडी म्हणजे काय? ईडी चे कामकाज, ED meaning in Marathi
  ईडी म्हणजे काय? सविस्तर..  स्थापना उद्देश ईडी चा मुख्य उद्देश म्हणजे पुढील दोन कायद्याची अंमलबजावणी करणे.  १. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट,१९९९ (FEMA)  २. प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंडरिंग ऍक्ट, २००२.(PMLA)  जर या कायद्यांचे उल्लंघन होत असेल … Read more
error: Content is protected !!