बॅकलिंक म्हणजे काय? बॅकलिंक कशा मिळवायच्या?

शेअर करा

बॅकलिंक म्हणजे काय? What is Backlink in Marathi?

ब्लॉगिंग अथवा अफिलिएट मार्केटिंग साठी वेबसाईट ही महत्वाची बाब आहे. वेबसाईट तयार करणे, पोस्ट लिहिणे, एसईओ करणे, कीवर्ड शोधणे, इमेजेस या सर्व बाबी देखील महत्वाच्या आहेत. परंतु सर्वाधिक परिणामकारक बाब म्हणजे बॅकलिंक होय. बॅकलिंक मुळे आपली वेबसाईट गूगल सर्चच्या पहिल्या पानावर रँक होऊ शकते. बॅकलिंक म्हणजेच आपल्या वेबसाईटची लिंक इतर वेबसाईट वर असणे.

बॅकलिंकचे महत्व 

साधारणतः वेबसाईट बनवल्यानंतर पहिला प्रश्न पडतो तो रहदारीचा (traffic). वेबसाईट वर जास्तीत जास्त लोक भेट कसे देतील यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. Traffic वाढवण्यासाठी सोशल मीडिया, ग्रुप्स, गुगल सर्च असे अनेक पर्याय आहेत. सोशल मीडिया वर लिंक सामायिक करण्यास मर्यादा आहेत, जास्त रहदारी आण्यासाठी तेथे कष्ट घ्यावे लागतात. गूगल वर रँक होण्यासाठी वेबसाईटचे योग्य SEO करणे आणि सतत माहिती पुनर्लेखन करत राहणे ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. 

एसईओ, सोशल मीडिया सोबतच बॅकलिंक हा पर्याय देखील अधिक परिणामकारक ठरतो. फक्त एसईओ  करण्याचे रँकिंग वाढणार नाही तर त्यासाठी इतर वेबसाईट वरून बॅकलिंक मिळवल्या पाहिजेत. जितक्या जास्त वेबसाईट वर तुमच्या वेबसाईटची लिंक असेल तितकी गुगल रँकिंग वाढेल. 

बॅकलिंक म्हणजे काय समजून घेतल्यानंतर, बॅकलिंक कशा मिळवायच्या ते जाणून घेऊ.

बॅकलिंक कशा मिळवायच्या / तयार करायच्या 

बॅकलिंक तयार करण्यासाठी / मिळवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यातील काही  सविस्तरपणे  देत आहोत. 

१. थेट ई-मेल करणे 

आपला ब्लॉग अथवा वेबसाईट ज्या विषयावर आहे त्या विषयाशी निगडित इअर अनेक वेबसाईट असतात. अशा वेबसाईटशी संपर्क करून त्यांना थेट ई-मेल द्वारे बॅकलिंकसाठी विनंती केली जाऊ शकते. सकारात्मक प्रतिसाद आला तर आपल्या वेबसाईटच्या कुठल्या पानावर बॅकलिंक हवी आहे आणि त्या वेबसाईटच्या कुठल्या पोस्टवर हवी आहे हे ठळकपणे लिहावे. ई-मेल साठी विशेष मथळा असणे महत्वाचे नाही. आपल्या परीने सोप्या भाषेत आणि समजावा असा ई-मेल लिहा. त्यामध्ये आपल्या वेबसाईटचे नाव, लिंक, विषय हे सर्व लिहा. त्यांच्या वेबसाईट बद्दल कुठे वाचले याचा उल्लेख करावा.

२. पैसे देऊन बॅकलिंक मिळवणे 

थेट ई-मेल द्वारे संपर्क साधल्यानंतर त्या वेबसाईट वर बॅकलिंक बनवण्यासाठी पैशांची मागणी केली जाऊ शकते. जर त्या वेबसाईची प्रसिद्धी तेवढी असेल तर माफक पैसे द्यायला हरकत नाही, कारण त्याद्वारे आपली रहदारी देखील वाढणार आहे. परंतु जर त्या वेबसाईची प्रसिद्धी नाही, आपल्याला ती उपयुक्त वाटत नाही तर पैसे मुळीच देऊ नका.

काही कंपन्या आहेत ज्या कमी पैशांमध्ये शंभर पेक्षा जास्त बॅकलिंक देतात, अशा लिंक्स काही कालावधीसाठी फायदा देतील मात्र याचा धोका अधिक आहे. कारण एकाच आईपी वरून या लिंक दिल्या जातात. त्यामुळं याचा उलट परिणाम आपल्या वेबसाईट वर होऊ शकतो, रँक होणारे पेजेस सुद्धा दुसऱ्या अथवा तिसऱ्या पानावर जाऊ शकतात. त्यामुळे अशा लिंक घेऊ नका. 

बॅकलिंक म्हणजे काय, what is backlink in marathi
बॅकलिंक म्हणजे काय

३. गेस्ट पोस्टिंग 

बॅकलिंक देण्यास काही वेबसाईट तयार होतील मात्र त्या बॅकलिंक साठी एखाद्या लेखाची (Article/Post) मागणी करतील. म्हणजेच काही विषय सुचवले जातील त्या विषयावर लेख लिहून द्यावा लागेल. जो लेख तुम्ही लिहाल त्यात तुमच्या वेबसाईटची बॅकलिंक असेल. एखाद्या शब्दाला अधोरेखित करून Anchor Text मध्ये लिंक देऊ शकता. हा लेख त्यांच्या वेबसाईट वर प्रकाशित केल्यानंतर, लेख वाचण्यासाठी येणाऱ्या लोकांपैकी काही क्लिक आपल्या वेबसाईटवर येतील. दोन्ही वेबसाईटला याचा फायदा होतो.

४. कमेंट बॅकलिंक 

सर्वात सोपी आणि जास्तीत जास्त वेबसाईटवर बॅकलिंक बनवण्याची पद्धत म्हणजे कमेंट बॅकलिंक. आपण ज्या क्षेत्रात ब्लॉगिंग करता अथवा आपल्या व्यवसायाच्या प्रकारातील इतर वेबसाईट वर कमेंट करून आपण बॅकलिंक बनवू शकतो. समजा तुम्ही ब्लॉगिंग करता, तुमच्या विषयाशी निगडित असणाऱ्या वेबसाईट वर जाऊन तेथील पोस्ट वर कमेंट हा पर्याय असतो. त्यात नाव, वेबसाईट, ई-मेल, प्रतिक्रिया ही माहिती भरून कमेंट केली तर त्या वेबसाईट वर आपली एक कमेंट बॅकलिंक तयार होते.

कमेंट बॅकलिंक करण्याआधी ती पोस्ट संपूर्ण वाचली पाहिजे, त्यातील मुद्दे आणि इतर गोष्टीचा उल्लेख कमेंट मध्ये करावा जेणेकरून विषयांतर होणार नाही. तुम्ही एक सकारात्मक प्रतिक्रिया दिली तर जास्त पसंती मिळेल आणि लवकर समाविष्ठ केली जाईल.

५. प्रोफाइल बॅकलिंक

नवख्या ब्लॉगर्स साठी प्रोफाइल बॅकलिंक बनवणे फायद्याचे ठरते. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त बॅकलिंक बनवता येऊ शकतात. प्रोफाइल म्हणजेच खाते. तुम्हाला वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर जाऊन खाते उघडायचे आहे. तुमच्या स्वतःच्या नावे, ब्लॉगच्या नावे, व्यवसायाच्या नावे खाते उघडता येते. प्रोफाइल वरती माहिती भरताना नाव, शहर, आवड निवड आणि बरेच पर्याय दिले जातात. त्यात वेबसाईट हा पर्याय असतो तिथे आपली वेबसाईट लिंक टाकता येते.

बॅकलिंक म्हणजे काय तर दोन वेगवेगळ्या वेबसाईटला जोडणारा दुवा. आपली वेबसाईट जास्तीत जास्त इतर वेबसाईट सोबत संलग्न केली तर गुगल रँकिंग मध्ये स्टॅन उंचावते. तसेच रहदारी देखील वाढते. “बॅकलिंक म्हणजे काय” या लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खालील दिलेल्या चौकटीत नोंदवा.

Backlink related FAQs

  1. Do Follow बॅकलिंक म्हणजे काय? What is Do Follow Backlink?

    एस ई ओ साठी do follow backlink महत्वाच्या ठरतात. कारण ज्या वेबसाईट वर आपण बॅकलिंक करतो, त्यवेबसाइट वरून काही value आपल्या वेबसाईट वर हस्तांतरित होते. यामुळे आपली page authority वाढते आणि रँकिंग मध्ये फायदा होतो. साधारणतः बॅकलिंक मागणी करतेवेळी do follow बॅकलिंक हवी आहे असा स्पष्ट उल्लेख करावा.

  2. No Follow बॅकलिंक म्हणजे काय? What is No Follow Backlink?

    ज्या लिंकद्वारे कुठलीच value पुढे हस्तांतरित केली जात नाही अशा लिंक no follow backlink असतात. do follow बॅकलिंकच्या तुलनेने या फार कमी महत्वाच्या असतात. रँकिंग साठी याचा फार उपयोग हात नाही. मात्र page authority काही प्रमाणात वाढते. सोशल मीडिया खात्यांवर बनवल्या गेलेल्या लिंक no follow बॅकलिंक असतात.


संबंधित लेख

error: Content is protected !!