वेब सिरीज म्हणजे काय? मालिका आणि वेब सिरीज मध्ये काय फरक आहे?

शेअर करा

वेब सिरीज म्हणजे काय? What is web series in Marathi?

टीव्ही वर प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांपैकी सर्वाधिक पहिला जाणारा कार्यक्रम म्हणजे मालिका (Serials). याच प्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्म अथवा इंटरनेटवर प्रसारित केल्या गेलेल्या मालिका म्हणजे वेब सिरीज. टीव्ही वर येणाऱ्या मालिकांचे सहसा एकच पर्व असते, याउलट वेब सिरीजचे अनेक पर्व प्रसारित केले जातात. जसे टीव्ही चॅनेल बघण्यासाठी महिन्याला काही शुल्क आकारले जाते, तसेच वेब सिरीज बघण्यासाठी महिना/वर्ष प्रमाणे काही शुल्क द्यावे लागते.

तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता, अनेक नवनवीन गोष्टी ज्ञानात भर पडतात. त्यातच काही नवीन शब्द वारंवार ऐकायला येतात. यापैकी एक नवीन संकल्पना म्हणजे वेब सिरीज. मोबाईल अप्लिकेशन, इंटरनेट, वेबसाईट यांच्या मदतीने वेब सिरीजचा आनंद लुटता येतो. वेब म्हणजे इंटरनेटचे जाळे आणि सिरीज म्हणजे मालिका. Web Series टीव्ही वर प्रसारित केल्या जात नाहीत, ओटीटी, अँप, वेबसाईट अशा मंचावर प्रसारण केले जाते. अर्थातच Web series पाहण्यासाठी काही पैसे मोजावे लागतात. 

सभासदत्व (Subscription)

ज्या अँप/प्लॅटफॉर्म वर वेब सिरीज आहे त्याचे Subscription करणे गरजेचे असते. प्रतिमहिना अथवा प्रतिवर्ष सभासदत्व (membership) घेता येते. विविध पर्याय दिले जातात, ज्यात किती कालावधीसाठी किती पैसे आकारले जातात या बद्दल माहिती दिली गेली असते. हे सभासदत्व फक्त Web series साठी नसून त्या मंचावर असणाऱ्या इतर सर्व गोष्टी हाताळता येतात. उदा. चित्रपट, टीव्ही, पॉडकास्ट. 

वेब सिरीज म्हणजे काय, web series in Marathi
वेब सिरीज म्हणजे काय? web series in Marathi

मालिका आणि वेब सिरीज मध्ये काय फरक आहे?

मालिका (Serials) टीव्ही वाहिन्यांवरती प्रसारित केल्या जातात तर वेब सिरीज ह्या इंटरनेट द्वारे विविध मंचावर प्रसारित केल्या जातात. मालिकांमध्ये मुख्य गोष्टीच्या बाजूला जाऊन, ओढाताण करून जास्तीत जास्त भाग वाढवले जातात, जेणेकरून जास्त कालावधीसाठी चालतील. Web series एखाद्या चित्रपटाच्या धर्तीवर बनवली जाते. कथा, संवाद, चलचित्रे, संगीत हे उत्तम दर्जाचे असते, त्यामुळे प्रेक्षक अधिक पैसे मोजून Web series आवर्जून पाहतात. मालिकांप्रमाणे web series मध्ये त्याच त्याच गोष्टी परत दाखवल्या जात नाहीत. रहस्यमय गोष्टी, रोमांचित कथा, सत्य कथा असे विविध विषयांवर बनवल्या जातात.

अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, रोकु, हॉटस्टार, एम एक्स प्लेयर हे सर्व मंच वेब सिरीज साठी प्रसिद्ध आहेत. यावर चित्रपट, टीव्ही मालिका, खेळ आणि इतर गोष्टी देखील पाहता येतात. सर्व गोष्टींसाठी वेगवेगळे पैसे भरण्याची गरज नाही. एकदाच महिन्याचे अथवा वर्षाचे शुल्क भरले तर सर्व गोष्टी त्यातच समाविष्ठ असतील.

काही प्रसिद्ध मराठी वेब सिरीज Some famous Web Series in Marathi :

१. समांतर

२. आणि काय हवं?

३. पांडू

४. संदीग्ध

निष्कर्ष 

Technology मध्ये काळाप्रमाणे प्रगती होत आहे आणि याचा चांगला परिणाम माहिती तंत्रज्ञानावर होत आहे. आधी टीव्ही वर फक्त एक सह्याद्री वाहिनी होती, आता शेकडो वाहिन्या पाहायला मिळतात. तसेच टीव्हीला इंटरनेट जोडण्याचा पर्याय देखील आला आहे. या सर्वांच्या पुढची आवृत्ती म्हणजे वेब सिरीज आणि ओटीटी प्लॅटफॉर्म. यामुळे हवे तेव्हा मनोरंजन करून घेणं शक्य झाले आहे. वेब सिरीज म्हणजे काय तर तरुण पिढीला आकर्षित करणारा नव्या युगातला टीव्ही.

“वेब सिरीज म्हणजे काय? मालिका आणि वेब सिरीज मध्ये काय फरक आहे?” या लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खालील चौकटीत नोंदवा.


संबंधित लेख

error: Content is protected !!