वेबसाईट होस्टिंग काय असते? Web hosting meaning in Marathi.

शेअर करा

वेबसाईट होस्टिंग काय असते?

Web hosting meaning in Marathi : जर आपण नवीन वेबसाईट बनवत असाल तर आपल्याला एक वेबसाईट होस्टिंग सेवा विकत घ्यावी लागते. म्हणजेच आपल्याला काही स्पेस विकत घ्यावा लागतो जिथे आपल्या वेबसाईटची सर्व माहिती संपादित केली जाते. ज्या प्रकारे घर बांधण्यासाठी आधी एक जागा विकत घ्यावी लागते आणि नंतर घर बांधले जाते. त्याचप्रकारे वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला वेब होस्टिंग स्पेस विकत घ्यावा लागतो, त्यानंतरच वेबसाईट तयार केली जाते.

Web hosting meaning in Marathi:

होस्टिंग आणि डोमेन

वेबसाईट होस्टिंग सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. जिथे महिन्याला किंवा वर्षाला पैसे भरून ही सेवा विकत घेता येते. यामध्ये होस्टिंग चे विविध प्रकार आहेत, वेबसाइटच्या प्रकारानुसार आणि गरजेनुसार निवड करता येते. होस्टिंग सोबत डोमेन देखील खरेदी करणे गरजेचे असते.

डोमेन म्हणजे वेबसाईटचा एक पत्ता, जो ब्राउझर मध्ये टाकून वेबसाईट वरती भेट देता येते. उदाहरणार्थ : www.alotmarathi.com मध्ये “alotmarathi.com” हे डोमेन नाव आहे. तुम्ही याच वेबसाईट वर ही माहिती वाचत आहात.

कोडींग/वर्डप्रेस

HTML, Java, Php अशा अनेक कोडींग प्रकारांमध्ये वेबसाईट बनवता येते. यासाठी कोडिंग चे ज्ञान असणे आवश्यक आहे. जर आपल्याला कोडींग चे ज्ञान नसेल तर आपण वर्डप्रेसवर देखील वेबसाइट बनवू शकता. वर्डप्रेस हे असे डेव्हलपमेंट टूल आहे ज्यामध्ये तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप अशा पद्धतीने साईट तयार करू शकता. यासाठी कुठल्या कोडींगची आवश्यकता नाही, अगदी सहज आपण वेबसाइट बनवू शकता. जर आपण कम्प्युटर मध्ये चित्रकलेसाठी “Paint” वापरलं असेल तर आपण सहज वेबसाइट बनवू शकता.

वेब होस्टिंग प्रकार

तीन मुख्य प्रकारच्या होस्टिंग सेवा या जास्तीत जास्त वापरल्या जातात. Shared Hosting, Cloud Hosting, Dedicated Hosting. वेबसाईटचा प्रकार आणि त्यावर येणारी ट्रॅफिक यानुसार होस्टिंग सेवा निवडता येते.

जर आपण नवखे असाल तर आपण Shared WordPress Hosting विकत घेऊ शकता, ज्यासाठी प्रति महिना फक्त शंभर रुपये इतका कमी खर्च येतो. नवशिक्यांसाठी Shared Hosting द्वारे चांगली सुरुवात करता येते. तुलनेने इतर दोन सेवा खर्चिक आहेत. वेबसाईट ट्रॅफिक वाढल्यानंतर क्लाऊड अथवा डेडिकेटेड होस्टिंग वर हलवता येते.

निष्कर्ष 

होस्टिंग सेवा विकत घेताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यामध्ये प्रामुख्याने ग्राहकांचे अभिप्राय, किंमत आणि सपोर्ट या गोष्टी महत्वाच्या आहेत. वेब होस्टिंग सेवा म्हणजेच जागा (Storage) विकत/भाड्याने घेणे आणि त्यावर वेबसाईट तयार करणे आणि या बदल्यात  महिन्याला किंवा वर्षाला त्या कंपनीला भाडे देणे. (Web hosting meaning in Marathi)

error: Content is protected !!