घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग

शेअर करा

ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग : 

व्यवसाय आणि नोकरीचे स्वरूप बदलत चालले आहे. त्यातच तंत्रज्ञान विकासामुळे कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज कमी झाली आहे. व्यवसायामध्ये देखील ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन कामाच्या संधी वाढत आहेत आणि त्यातून पैसे देखील चांगले मिळत आहेत. अर्धवेळ अथवा पूर्णवेळ काम करून गुंतवणूक न करता ऑनलाइन पैसे कमावणे, आपल्या मोबाईल द्वारे देखील पैसे कमवता येतात. जाणून घेऊया घरबसल्या ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग.

1. Content writing

स्वतंत्ररित्या काम करून (freelancer) आपण पैसे कमवू शकतो. म्हणजेच जितके काम कराल तितके पैसे कमवू शकता या मध्ये नोकरी सारखे बंधन नसते. आपले लेखन उत्तम असेल तर लेख लिहून देखील पैसे कमवू शकता. अशा अनेक वेबसाईट आहेत ज्या असे काम देतात. एखादा विषय आणि तयारी मुद्दे दिले जातात, त्यानुसार एक परिपूर्ण आणि सोप्या भाषेत लेख लिहायचा असतो. 

या मध्ये प्रतिशब्द प्रमाणे पैसे दिले जातात. जर एक हजार शब्दांचा लेख असेल तर प्रतिशब्द एक रुपया प्रमाणे आपल्याला एक हजार रुपये दिले जातील. अर्थातच आपण केलेले लिखाण त्या दर्जाचे असले पाहिजे. दर्जा चांगला असेल तर अजून जास्त पैसे देखील मिळू शकतात. upwork, fiverr ह्या संकेतस्थळावर आपल्याला काम मिळेल.

ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग, Ways to make money online Marathi
ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग

2. Share Trading

बहुतेक लोकांना शेअर व्यापार म्हणजे एक जुगार आहे असे वाटते. योग्य ज्ञान घेऊन जर सुरुवात केली तर हळू हळू या मध्ये पारंगत व्हाल. आपल्या मोबाइलला अथवा कॉम्पुटर मधून काम करू शकता. काही काळाआधी हे थोडे अवघड होते, परंतु आज असंख्य अँप्लिकेशन आणि वेबसाईट आहेत ज्या आपल्याला मोफत  शिकवतात आणि मार्गदर्शन देखील करतात.

शेअर बाजार/व्यापार मध्ये जोखीम असतेच, कोणत्या वेळेला जोखीम घ्यायची/नाही हे समजले तर या मध्ये यशस्वी झालात असे समजा. तसेच अनेक जण घरात बसून काम करून लाखो रुपये कमावत आहेत. Upstox, Stockbroker या वेबसाईट/अँप्लिकेशन शेअर ट्रेडिंग साठी उपयुक्त आहेत.

3. Quora 

आपण फक्त प्रश्न विचारून पैसे कमवू शकतो. यावर आपला विश्वास बसणार नाही परंतु हे अगदी खरं आहे. quora.com या संकेतस्थळावर आपण असे करू शकता. ही वेबसाईट प्रश्न उत्तरासाठी बनवली गेली आहे,  ज्यांना प्रश्न पडतात ते विचारतात आणि ज्यांना उत्तर माहित आहेत त्यांनी ते उत्तर देतात. 

काही नियम व अटींची पूर्तता केल्यानंतर एका ठराविक कालावधी नंतर आपल्याला “कोरा पार्टनर प्रोग्रॅम” चे आमंत्रण येईल. या साठी आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतात आणि संयम ठेवावा लागतो. यामध्ये फक्त पैसे कमावण्यासाठी काम करू नका आपले खाते बंद होऊ शकते.

ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग, Ways to make money online Marathi
ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग

4. YouTube Channel 

आपल्याला ज्या विषयात रस आहे किंवा आपण जो छंद जोपासतो त्याचे व्हिडीओ बनवून युट्युब द्वारे पैसे कमवू शकतो. उदा. व्यायाम, स्वयंपाक, तंत्रज्ञान, कलाकुसर इत्यादी. आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन आहे आणि सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडिओ हे सोपे माध्यम आहे. युट्युब चॅनेल बनवणे देखील सोपे आहे याला कुठलेही पैसे भरावे लागत नाहीत.

चॅनेल बनवला, विडिओ टाकला कि लगेच पैसे मिळत नाहीत. या साठी काही अटी आहेत. या अटी म्हणजे आपल्या चॅनेलला १००० subscriber आले पाहिजेत आणि संपूर्ण विडिओ मिळून ४०० तास पहिला गेले पाहिजे. यानंतर monetize करू शकता. असे अनेक लोक आहेत जे युट्युब द्वारे लाखो रुपये कमावतात.

5. Blogging

आपण स्वतःचा ब्लॉग बनवून पैसे कमवु शकता. blogger.com वर मोफत ब्लॉग वेबसाईट तयार करता येते. आपल्या आवडीच्या विषयाची निवड करा आणि आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लेख लिहा. विविध माध्यमाद्वारे ब्लॉग वर ट्रॅफिक वाढवा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवता येईल.

ट्रॅफिक वाढल्यानंतर आपण गुगल ऍडसेन्स ला अर्ज करू शकता. सर्व नियमांचे पालन करत असाल तर लगेचच अर्ज मंजूर केला जाईल अथवा दुरुस्ती करण्यास सांगितले जाईल. जितकी जास्त ट्रॅफिक तितके जास्त पैसे कमावण्याची संधी असते. जितके जास्त लोक जाहिरात बघतील/ क्लीक करतील त्यानुसार पैसे दिले जातात.

वरील मार्गांशिवाय अजून असंख्य ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग आहेत. इंटरनेटचे फायदे आणि तोटे अनेक आहेत, त्यातील चांगले वाईट याचे ज्ञान असले पाहिजे. गुंतवणूक न करता ऑनलाइन पैसे कमावणे आणि ऑनलाईन पैसे कसे कमवावे या बाबत इंटरनेट वर थोडा अभ्यास केला तर नवीन माहिती मिळू शकेल. पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करून कामे करू शकता.

एकाच मार्गावर अवलंबून राहू नका, कमीत कमी चार ते पाच मार्ग निवडा तसेच फसवेगिरी करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. आपल्याला चुकीच्या मार्गाने लवकर ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी ई-मेल केले जातील याला बळी पडू नका. असा कुठलाच मार्ग नाही ज्याने लगेच एका रात्रीत पैसे कमावता येतील.


वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

संबंधित लेख

error: Content is protected !!