UAN कसे ऍक्टिव्ह करावे? How to activate UAN?
जर तुम्ही पहिल्यांदा एखाद्या संस्थेमध्ये काम करण्यास सुरुवात करत आहेत तर, पीएफ (Provident Fund) नोंदणी साठी काही कागदपत्रे आपल्याकडे मागितली जातात. त्यानंतर पीएफ क्रमांक नोंदणी पूर्ण करून पीएफ क्रमांक आणि UAN क्रमांक आपल्याला दिला जातो. नोंदणी केल्याप्रमाणे दार महिन्याला काही रक्कम पीएफ खात्यात जमा होत जाते. परंतु ज्यावेळेस पीएफ काढायचा असतो त्यावेळेस UAN ऍक्टिव्ह कसा करावा असा प्रश्न समोर येतो. UAN क्रमांक ऍक्टिव्ह करण्याची प्रक्रिया सविस्तरपणे..
UAN क्रमांक ऍक्टिव्ह करण्याची प्रक्रिया. UAN Activation Process
पीएफ रक्कम काढण्यासाठी महत्वाची बाब म्हणजे UAN क्रमांक ऍक्टिव्ह असणे. UAN ऍक्टिव्ह करण्याआधी आपला UAN क्रमांक माहिती हवा. संस्थेतील संबंधित वरिष्ठांना विचारून तो माहित करून घेता येतो. त्याच प्रमाणे EPFO वेबसाईट वरून देखील UAN क्रमांक मिळवता येतो. त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आणि त्यावर येणारा OTP टाकून UAN माहित करून घेता येतो.
UAN क्रमांक माहिती नसेल तर
Know your UAN या लिंक वर जाऊन आपला UAN क्रमांक मिळवता येतो. आपला मोबाईल क्रमांक जो पीएफ खात्याला जोडलेला असेल, तो क्रमांक टाकावा आणि “Request OTP” वर क्लिक करा आपल्याला OTP पाठवण्यात येईल. OTP टाकल्यानंतर आपला UAN क्रमांक आपल्याला माहित होईल. संदर्भासाठी खाली इमेज दिली आहे.

UAN क्रमांक माहित असेल तर
जर आपल्याला आपला UAN क्रमांक माहित असेल आणि ऍक्टिव्ह करायचा असेल तर UAN क्रमांक ऍक्टिव्ह करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ. UAN ऍक्टिव्ह करण्याच्या प्रक्रिया सोप्पी आहे आणि लवकर होते. यासाठी आपला आधार क्रमांक, पॅन क्रमांक, मेंबर आयडी अथवा UAN क्रमांक यापैकी कोणतीही एक माहिती लागेल. Activate Your UAN या लिंक वर जाऊन चार पर्यायांपैकी आपल्याला सोयीस्कर पर्याय निवडा.

आपले संपूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी अशी सर्व माहिती दिलेल्या जागेत भरा. सरकारी कागदपात्रांवर असलेले नाव आणि इथे टाकत असलेले नाव एकसारखेच असले पाहिजे. तसेच पीएफ खात्याशी जोडलेलाच मोबाइलला क्रमांक तिथे टाकावा. “Get Authorised PIN” वर क्लिक करा, आपल्या मोबाईल वर एक पिन पाठवला जाईल. पुढील पानावर तो कोड टाकून सबमिट करा आणि आपला UAN ऍक्टिव्ह झालेला असेल.
UAN ऍक्टिव्ह होण्यासाठी वेळ
सर्व माहिती UAN खात्यात जोडण्यासाठी ४८ तास लागतील. म्हणजेच UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. त्यांनतर तुम्ही लॉगिन करू शकता आणि पीएफ संबंधित सर्व माहिती पाहू शकता. तुमची प्रोफाईल, मेंबर आयडी, क्लेम आणि इतर माहिती. जर या माहितीमध्ये काही चूक असेल तर तसे बदल करण्यासाठी तेथून अर्ज देखील करू शकता. UAN सोबतच KYC पूर्ण करणे देखील बंधनकारक आहे. पीएफ रक्कम काढण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी “पीएफ कसा काढावा” हा लेख वाचा. केवायसी प्रक्रिया साठी “EPFO UAN KYC अपडेट करण्याची प्रक्रिया” हा लेख वाचा.
संबंधित लेख
- Amazon Great Indian Festival मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? Sale मध्ये कोणकोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत?
- EPFO UAN KYC अपडेट करण्याची प्रक्रिया
- IPO म्हणजे काय ? What is IPO Means in Marathi?
- Money Laundering म्हणजे काय?
- UAN क्रमांक ऍक्टिव्ह करण्याची प्रक्रिया. UAN Activation Process in Marathi.
- ईडी म्हणजे काय? ईडी चे कामकाज, ED meaning in Marathi