सोशल मीडिया म्हणजे काय?

शेअर करा

Social media meaning in Marathi, सोशल मीडिया म्हणजे काय?

 Social Media meaning in Marathi | गुगल च्या मते Social Media म्हणजे “वेबसाइट्स आणि अँप्स ज्या वापरकर्त्यांना सामग्री (content) तयार आणि सामायिक करण्यास किंवा सोशल नेटवर्किंग मध्ये भाग घेण्यास सक्षम करतात”. मराठी भाषेत याला “सामाजिक माध्यम” असा शब्द आहे. प्रत्येकाला आपली मते लिहिण्याचे/मांडण्याचे स्वातंत्र्य या माध्यमांवरती असते.

Social Media चे प्रकार:

सोशल मीडियाचे विविध networks आहेत. त्यामध्ये आपल्याला माहित असणारे म्हणजे whatsapp, facebook आणि youtube. यांच्या व्यतिरिक्त अनेक अशी माध्यम आहेत ज्याची सविस्तर माहिती इथे देत आहोत. 

१.Instagram :

जसे आपण सगळे फेसबुक चा वापर करतो त्याच प्रमाणे इंस्टाग्राम आहे. Instagram ला फेसबुकची  पुढची आवृत्ती म्हणू शकतो. facebook प्रमाणेच या मध्ये देखील आपले अकाऊंट/प्रोफाइल बनवावी लागते. इन्स्टाग्राम हे facebook याच कंपनीचे अप्लिकेशन आहे. नावा प्रमाणे वापर करण्यासाठी इन्स्टंट आणि सोपे आहे. तरुण वर्ग या मध्ये अधिक प्रमाणात आहे तसेच प्रसिद्ध कलाकार या माध्यमांवर “active” असतात. इन्स्टाग्राम मध्ये “follow” असा पर्याय असतो, जसे फेसबुक मध्ये friend असा पर्याय असतो.

हेही वाचा :

२. Twitter : 

ट्विटर हे मोजक्या शब्दात आपले मते मांडण्याची मुभा देते.यामध्ये आपण post, like, reply. retweet करू शकता. रिप्लाय म्हणजे कंमेंट आणि रिट्विट म्हणजे शेअर करू शकता. या वर कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येते. पंतप्रधान कार्यालय, नेते, सेलिब्रिटी यांचे सर्वात जास्त फॉलोवर्स या माध्यम वर आहेत.

३. LinkedIn : 

बाकी माध्यमांपेक्षा LinkedIn हे माध्यम वेगळे आहे. या मध्ये संपूर्ण व्यावसायिक प्रोफाइल असेल, जिथे आपले शिक्षण, काम, हुद्दा, अनुभव इत्यादी गोष्टीवर भर दिला जातो. तसेच आपला व्यवसाय असेल तर त्याचे स्वरूप, ठिकाण, विभाग आणि त्याबद्दल बरीच माहिती इथे देऊ शकता. या मध्ये Connections असा पर्याय असतो. तुम्ही तुमच्या विभागात काम करत असणाऱ्या व्यक्तींशी जोडले जाऊ शकता ज्याचा वापर नोकरी साठी अथवा व्यवसाय वाढीसाठी करता येऊ शकतो.

Social Media meaning in Marathi
social media meaning in marathi

४. Viber :

वायबर या माध्यमाचा वापर मेसेज, कॉल, विडिओ कॉल करण्यासाठी केला जातो. यामध्ये  voice over internet protocol (VoIP) याचा वापर केला जातो, जेणेकरुन देशांतर्गत आणि देश बाहेर विना अडथळा संपर्क होऊ शकतो. वायबर चे पेड अकाऊंट सुद्धा आहे ज्या मध्ये अजून जास्त सर्विसेस आहेत.

५. Pinterest :

Pinterest हे एक असे माध्यम आहे जथे इमेजेस च्या माध्यमातून माहिती पोस्ट केली जाते. तसेच नवनवीन युक्त्या (idea) येथे लिहिल्या जाऊ शकतात. त्याच बरोबर animation, video यांचा येथे थोड्या प्रमाणात वापर होतो. ब्लॉगिंग करत असाल तर आपल्या ब्लॉग च्या इमेजेस सोबत इथे थोडी माहिती लिहू शकता. ज्या मूळे आपल्या संकेतस्थळावर जास्त लोक भेटी देऊ शकतील.

आज-काल Social Media चा अति वापर होतोय. पण याचा वापर आपण नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि स्वतः च्या विकासाठी करू शकतो. जेणेकरून आपला वेळ जाणार नाही आणि सामाजिक माध्यमांचा सुयोग्य वापर देखील होईल. Social media meaning in Marathi.


या लेखाबद्दल आपला अभिप्राय आणि प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षात नोंदवा.

error: Content is protected !!