इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? Social Media Influencer meaning in Marathi?

शेअर करा

Social Media Influencer meaning in Marathi :

Influencer म्हणजे काय?

Influence म्हणजे प्रभाव आणि Influencer म्हणजे प्रभावित करणारा व्यक्ती. एखादी वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी प्रभावित करणे, जाहिरात करणे, समीक्षण करणे इत्यादी काम influencer द्वारे केले जाते. बरेच ब्रँड हे लोकांकडून जाहिरात करून घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून अधिक विश्वास निर्माण होईल आणि वस्तू विकल्या जातील. Influencers यांच्याकडून Instagram या माध्यमाचा सर्वाधिक वापर केला जातो. तसेच फेसबुक आणि युट्युब हे देखील पर्याय आहेत. 

सोशल मीडिया वरती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फॉलोवर्स वाढवले जातात. त्यासोबत लाईक, शेअर, कॉमेंट महत्वाच्या असतात. Social Media Influencer होण्यासाठी आपल्याला आपली प्रोफाईल तयार करावी लागेल आणि सतत ऍक्टिव्ह राहावे लागेल. म्हणजेच नवनवीन पोस्ट तयार कराव्या लागतील आणि त्यावर engagement आणावी लागेल. कुठलाही एक विषय निवडावा ज्याबद्दल आपले पेज/प्रोफाईल पोस्ट आहेत, जास्तीत जास्त लाईक, शेअर, कंमेंट असतील तर जास्त लोकांपर्यंत पोहचता येते.

ज्यावेळेस आपले फॉलोवर्स हजारोंच्या घरात जातील त्यावेळेस कंपन्या तुम्हाला स्वतःहुन जाहिरातीसाठी विचारतील अथवा तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. ज्या विषयासंबंधी तुम्ही प्रभावित करता त्यासंबंधित ब्रँड्स ची जाहिरात, वस्तू विक्री, विपणन केले जाऊ शकते. Social Media Influencer होऊन पैसे कमावणे हे अनेक लोकांचे ध्येय असते. मात्र त्यासाठी थोडे कष्ट घेण्याची गरज असते.

Social media influencer meaning in Marathi
Social media influencer meaning in Marathi

फॉलोवर्स वाढवण्यासाठी पहिले सहा महिने कष्ट घ्यावे लागतील. त्यानंतर आपल्या प्रोफाईलवर engagement वाढवणे म्हणजेच लाईक, शेअर, कमेंट्स इत्यादी गोष्टी वाढतील आणि कंपन्या तुम्हाला त्यांचे प्रॉडक्ट प्रमोट करण्यासाठी पैसे देण्यासाठी तयार होतील.

बरेच Influencer असे आहेत जे एखाद्या विषयाविषयी लिहीत असतात, पोस्ट करत असतात आणि त्यातून पैसे कमावतात. उदाहरणासाठी जर आपण अभिनेत्री आणि अभिनेते यांचे छायाचित्र पोस्ट करत आहात आणि आपल्या प्रोफाईल ला जास्त व्हिसिट आहेत तसेच लाईक, शेअर, कमेंट देखील चांगले आहेत तर कुठल्याही चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केले जाऊ शकते. प्रोफाइल वरून जाहिरात करून त्या बदल्यात चांगले पैसे कमावता येतात.

Social media influencer सारखे इतर प्रकार देखील आहेत, जसे Micro Influencer, Celebrity Influencer, Blog Influencer इत्यादी. जाहिरातीसाठी जवळपास पद्धती सारख्या असतात. कमीत कमी खर्चात Social Media Influencer बनता येते, त्यासाठी सातत्य, संबंधित विषयाचा अभ्यास असेल तर जास्त फायदा करून घेता येऊ शकतो. (Social media influencer meaning in Marathi).


अलीकडील लेख

error: Content is protected !!