आज पहिले तर प्रत्येकाला जातीत जास्त पैशांची आवश्यकता असते. शेअर मार्केट हा पैसे कमविण्याचा एक खुप चांगला मार्ग आहे. शेअर मार्केट हा असा एक बाजार असतो जिथे वेगवेगळया कंपन्यांच्या शेअरची खरेदी आणि विक्री केली जात असते. इथे वेगवेगळया कंपन्या शेअर्सची खरेदी विक्री करुन आपल्या पैशांची गुंतवणुक करत असतात आणि ह्या शेअर्सचे भाव दिवसेंदिवस वाढत तसेच कमी होत असतात.
आजच्या लेखात आपण ह्याच महत्वाच्या विषयावर सविस्तर माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेअर मार्केट म्हणजे काय असते? शेअर ट्रेडिंग कशी करतात? आयपीओ म्हणजे काय? इंट्रा डे म्हणजे काय? एन एस ई,बीएसई इत्यादी विषयी जाणुन घेणार आहोत.
शेअर मार्केट म्हणजे काय?
शेअर बाजाराविषयी सांगायचे म्हटले तर खुप जणांना हा एक जुगाराचा प्रकारच वाटतो. पण हा कोणताही जुगार नसुन बुदधीने खेळला जाणारा एक बुदधीबळाचा खेळ आहे. ज्यांना याच्यामध्ये व्यवस्थित बुदधीचा वापर करून खेळता आले ते जिंकणार आणि ज्यांना इथे बुदधीचा योग्य वापर करून खेळता येणार नाही. त्यांची इथे हार होण्याची दाट शक्यता असते.
शेअर मार्केट हे एक असे मार्केट आहे जिथे काही लोक खूप उत्पन्न कमावतात तर काही गमावतात. इथे आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स जेव्हा खरेदी करत असतो किंवा त्यात पैसे गुंतवत असतो तेव्हा आपण त्या कंपनीचे भागीदार बनत असतो.आपण जेवढे पैसे यात लावत तेवढया टक्कयांची मालकी आपली त्या कंपनीत होऊन जाते.
पण यात सदर कंपनीला जर भविष्यात खूप मोठा फायदा झाला तर आपल्यालाही तो फायदा मिळत असतो. पण त्याच ठिकाणी सदर कंपनी ज्यात आपण आपले शेअर गुंतवलेले आहे तोटा जर झाला तर तोच तोटा आपल्याला देखील होत असतो. कारण आपणत्या कंपनीत पैसे लावलेले असतात, तिचे शेअर खरेदी केलेले असतात.
शेअर बाजारमध्ये शेअर कधी विकत घ्यायचे असतात?
कोणत्याही स्टॉक मार्केटमध्ये शेअर विकत घेण्याच्या अगोदर आपण त्याविषयाचा पुरेपुर अनुभव घेणे तसेच माहीती घेणे फार गरजेचे असते. आपण कुठे आणि कधी गुंतवणुक करायची याचे ज्ञान आपल्याला असायला हवे. कोणती अशी कंपनी आहे जिथे पैशांची गुंतवणुक केल्याने आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल हे आपल्याला माहीत असले पाहिजे.
ह्या अशा काही महत्वाच्या बाकी लक्षात घेतल्यानंतर आपण स्टॉक मध्ये पैसे गुंतवू शकतो. पण त्यातही कोणत्या कंपनीचे शेअर्स वाढत आहेत तसेच घटत आहेत हे नेहमी समजण्यासाठी आपण अर्थशास्त्राविषयी काही महत्वाच्या वर्तमानपत्रांचे वाचन करू शकतो. जसे की इकाँनामिक टाईम्स.
इथे पैशांची गुंतवणुक करणे हे खुप जोखमीचे असते. त्यामुळे आपण इथे सुरूवातीला थोडी कमी रक्कम गुंतवायला हवी. जस जसा आपला अनुभव वाढत जातो तसतसे आपण गुंतवणुकीत वाढ करत जावी. शेअर मार्केटमध्ये धोके पण खुप आहेत. काही वेळा इथे असे देखील प्रकार घडतात की एखादी कंपनी फ्राँड असते आणि आपण तिचेच शेअर्स विकत घेण्यासाठी पैसे लावतो. नंतर ती कंपनी आपले लावलेले पैसे घेऊन पळुन जाते. म्हणुन आपण कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याअगोदर त्या कंपनीची पाश्वभुमी जाणुन घेणे फार महत्वाचे असते.

शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक कशी करावी?
शेअर मार्केटमध्ये शेअर्स विकत घेण्यासाठी आधी आपल्याला एक डिमँट अकाऊंट उघडावे लागते. हे अकाऊंट आपण एखाद्या दलालामार्फत उघडू शकतो किंवा आँनलाईन सुदधा ओपन करू शकतो. आपल्या डिमँट अकाऊंटमध्येच आपले शेअरचे पैसे ट्रान्सफर केले जात असतात. जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये पैशांची गूंतवणुक करायची असेल तर आपल्याला डिमँट अकाऊंट ओपन करणे फार गरजेचे असते. कारण आपण ज्या कंपनीत गुंतवणुक करत असतो त्या कंपनीला जर फायदा झाला तर आपल्या फायद्याचे पैसे आपल्याला आपल्या डिमँट अकाऊंटवर भेटत असतात.
नंतर आपण तेच पैसे आपल्या सेविंग अकाऊंटला देखील हस्तांतरित करू शकतो. डिमँट अकाऊंट ओपन करण्यासाठी आपले एक सेविंग अकाऊंट असणे तसेच पँनकार्डची झेराँक्स आणि ऍड्रेस प्रूफ असणे आवश्यक असते. पण आपण चांगल्या दलालामार्फत अकाऊंट ओपन केले तर आपल्याला एक चांगला आधारही मिळत असतो. तसेच तो आपल्याला आपल्या गुंतवणुकीच्या क्षमतेनुसार चांगली कंपनी देखील सुचवत असतो.
आयपीओ म्हणजे काय?
आयपीओचा फुल फाँर्म Initial Public Offering असा होत असतो. आयपीओ म्हणजे जेव्हा पहिल्यांदा एखादी खासगी कंपनी शेअर मार्केटमध्ये उतरते. पहिल्यांदाच आपले शेअर सार्वजनिकपणे विकण्यासाठी काढते. त्यालाच आयपीओ असे म्हणतात. आयपीओ नंतर ती खासगी कंपनी खासगी राहत नसते तर ती लोकांची म्हणजेच पब्लिकची होऊन जात असते.
इंट्रा डे म्हणजे काय?
इंट्रा डे म्हणजे एकाच दिवशी शेअर खरेदी करायचे आणि ते विकुन देखील टाकायचे. इंट्रा डे मध्ये आपण शेअरची खरेदी करत असतो पण कमी वेळात त्याच शेअरची किंमत जर वाढली तर ते शेअर तेव्हाच आपण विकुही शकतो.
एनएसई आणि बीएसई म्हणजे काय?
एन एस ई आणि बी एस ई ह्या भारतातील दोन मोठया स्टॉक एक्सचेंज कंपन्या आहेत. एन.एस.ई. चा फुल फाँर्म नँशनल स्टॉक एक्सचेंज आणि बी.एस. ई. चा फुल फाँर्म बाँम्बे स्टॉक एक्सचेंज असा आहे. दोन्ही मुंबईतीतच आहेत. बाँम्बे स्टॉक एशियातील सगळयात पहिली आणि जुनी स्टॉक एक्सचेंज कंपनी आहे. जी १८७५ मध्ये सुरू करण्यात आली होती. जुन्या काळी आधी एक जागा ठरविली जायची जिथे सर्व ट्रेडर जमा होत असायचे आणि मग शेअरची खरेदी विक्री चालू व्हायची.
त्यानंतर मग १९९२ मध्ये नँशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापणा करण्यात आली. पहिले शेअरची खरेदी विक्री करायला खुप वेळ लागायचा पण एन एस ई ची स्थापणा झाल्यानंतर हा वेळ लागणे कमी होऊ लागले. एन एस ई आणि बी एस ई या दोघांनाही सेबीचे नियम लागु होत असतात. सेबीची स्थापण भारत सरकारने केली होती. स्टॉक मार्केटमध्ये काही चूकीच्या गोष्टी घडणे चालू झाले होते. त्यासाठी त्यांना आळा घालण्यासाठी भारत सरकारने सेबीची स्थापना केली. (Share Market information in Marathi).