एसईओ SEO म्हणजे काय? What is SEO in Marathi?
वेबसाईट बनवणे हे अगदी सोपे आहे पण ती गुगल वर रँक/लिस्ट करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. एसईओ SEO म्हणजे (Search Engine Optimization) सर्च इंजिन वर आपली वेबसाईट रँक/लिस्ट करण्यासाठी वापरली जाणारी तांत्रिक पद्धत, गूगल वरती एखादी माहिती सर्च केल्यानंतर वेगवेगळ्या साईट्स येतील. त्याच प्रमाणे एखादी वेबसाईट आणि त्यावरील पोस्ट कोणत्या विषयावर आहेत याच्या वर कीवर्डस ठरतात. त्यासाठी Search Engine Optimization ही खूप महत्वाची गोष्ट आहे. साईट कितीही सुंदर आणि चांगली असेल तरी त्यासाठी SEO करण्याची गरज असते, कारण ती आपोआप गुगल अथवा इतर प्लॅटफॉर्म्स वर दिसणार नाही.
प्रामुख्याने जे लोक अफिलिएट मार्केटिंग किंवा गूगल ऍडसेन्स चा वापर करतात त्यांना वेबसाईट वर जास्त लोकांना आणावे लागते, जेवढे जास्त लोक साईट ला भेट देतील तेवढे जास्त पैसे कमावण्याची संधी त्यांना असते. या मध्ये SEO, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल माध्यमांचा वापर केला जातो. (SEO meaning in Marathi)

SEO चे प्रकार
1. On-page SEO:
On-page म्हणजेच आपल्याला ज्या गोष्टी page वर दिसतात. जसे शीर्षक, प्रतिमा (image), परिच्छेद, किवर्ड, लिंक इत्यादी. या सर्वांची व्यवस्थितपणे मांडणी केली तर सर्वात वर रँक होता येईल. संदर्भासाठी ब्लॉग कसा लिहावा हा लेख वाचा. या मध्ये सखोल माहिती मिळेल.
Focus Keyword
या मध्ये मुख्य शब्द अथवा शब्दांचा संच टाकले जाते. ज्या विषयवार तुमचा ब्लॉग/पोस्ट आहे त्याच्या निगडित असलेला किवर्ड लक्ष करू शकता. म्हणजेक्ट तो keyword जर गुगल वर सर्च केला तर आपली साईट लिस्टिंग मध्ये दिसेल. सर्वात वर रँक होण्यासाठी keyword research करणे महत्वाचे आहे. google keyword planner या मोफत टूल चा उपयोग यासाठी करू शकता. उदा. “SEO meaning in Marathi”.
Meta Title
पोस्टचे शीर्षक, विषय, वाक्य, साईट चे नाव/लिंक ही सर्व माहिती यामध्ये द्यावयाची असते. तसेच मुख्य वाक्य (Focus Keyphrase) हे देखील यात टाकले जाते. जेणेकरून अजून प्रभावीपणे याचा वापर होतो.वापरकर्त्यास गुगल सर्च केल्यानंतर meta title आणि meta description दिसते, त्यामुळे या दोन्ही गोष्टी प्रभावी आणि ठळक असल्या पाहिजेत. जेणेकरून जास्त clicks मिळतील.

Meta Description
आपला विषय अथवा लेख या बद्दल थोडक्या शब्दात दिलेली माहिती म्हणजे Meta description. तीस ते चाळीस शब्द यामध्ये टाकले जाऊ शकतात.वापरकर्ता जी माहिती शोधतो ती अनेक वेबसाइट्स वर उपलब्ध असते, या सर्व साईट्स लिस्ट मध्ये दाखवल्या जातात, त्यामध्ये आपले description लवकर समजणारे असले पाहिजे. या मध्ये जास्त माहिती भरू नये. कारण search engine वरती शब्दांचा काही मर्यादा असतात.
Permalink
ब्लॉग अथवा पोस्ट ला एक विशिष्ट URL असतो. हा उरलं म्हणजेच permalink. याला आपण एडिट करू शकतो. या मध्ये फोकस कीवर्ड चा वापर करावा. जेणेकरून रँकिंग वाढवण्याची मदत होईल.
2. Off-page SEO
Off-page SEO मध्ये आपल्या साईटच्या माहितीचा प्रसार इतरत्र माध्यमावर केला जातो. जसे Social Media वर पोस्ट टाकणे, backlinks, Quora, चर्चासत्र (Forum). थोडक्यात आपल्या वेबसाईट चा प्रसार इतर वेबसाईट वर करणे.जसे तुम्ही ब्लॉग्स बद्दल माहिती घेत जल तसे हळू हळू याबद्दल ध्यान प्राप्त होईल.
- Social Media Posting
- Quora Answers
- Backlinks
- Forums
3. Technical SEO
वेबसाईट पेज किंवा पोस्ट बनवल्यानंतर त्याचा एक विशिष्ट link/URL मिळतो. संबंधित पोस्ट/पेज गुगल सर्च एंजिन वर आणण्यासाठी गुगल सर्च कॉन्सोल चा वापर केला जातो.
Google Search Console
या मध्ये आपली link/URL कॉन्सोल मध्ये जाऊन इन्पेक्ट करावी. सोबतच आपली लिंक गुगल वर येऊ शकते अथवा नाही याची माहिती “Test Live URL” वर क्लिक करून घेऊ शकता. जर आपला URL गुगल वर येण्यास समर्थ असेल तर तिथे तसे दर्शवले जाईल. जर आपला URL गुगल वर येणास असमर्थ असेल तर त्याचे कारण देखील तिथे दिले जाते, ज्या मध्ये बदल करून आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू शकता.

आपला URL हा लाईव्ह टेस्ट मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर आपण “Request Indexing” या वर क्लिक करून विनंती करा. यानंतर गुगल ने आपला URL index केला अथवा नाही हे परत URL टाकून पाहू शकता. साधारणतः indexing साठी आपण विनंती केल्यानंतर एक ते दोन तास लागतात, पण काही वेळेस जास्त वेळ देखील लागू शकतो. अशा प्रकारे आपले पेज/पोस्ट गुगल वर आणू शकता.


FAQs about Search Engine Optimization :
White Hat एसईओ म्हणजे काय? What is White hat SEO in Marathi ?
वेबसाईट रँक करण्यासाठी गूगल अथवा इतर सर्च इंजिन यांनी काही सूचना केल्या आहेत. काय करायला हवे आणि काय करायला नको याची यादी दिली गेली आहेत. दिलेल्या सर्व सूचना व नियमांचे पालन करून वेबसाईट एसईओ करणे म्हणजे white hat SEO होय. म्हणजेच कुठल्याच नियमांचे उलंघन न करता तुम्ही योग्य पद्धतीने वेबसाईटचे काम करत आहात.
Black Hat एसईओ म्हणजे काय? What is Black hat SEO in Marathi ?
वेबसाईट रँक करण्यासाठी अवैध पद्धतीचा वापर करणे म्हणजे black hat SEO होय. विविध सर्च इंजिन यांनी काही सूचना व नियम दिलेले आहेत, या सूचनांचे पालन करून वेबसाईट अथवा एसईओ सुरु ठेवले पाहिजे. निलयं व सूचनांचे उल्लंघन होत असेल तर त्याला black hat SEO असे संबोधले जाते. असे केल्याने गुगल आपली रँकिंग कमी करू शकते किंवा AdSense बंद करण्यात येऊ शकते.
वर्डप्रेस प्लगिन
आपली वर्डप्रेस साईट असेल तर SEO साठी वेगवेगळे प्लगिन्स उपलब्ध आहेत. Yoast Seo हे उत्तम प्लगिन आहे. वेबसाईट वर कुठले शब्द/किवर्डस आहेत ते शोधले जातात आणि तेच टार्गेटिंग साठी वापरले जातात. म्हणजेच एखाद्याने गुगल वर तो किवर्ड सर्च केला तर आपली साईट येईल. थांबा !! हे इतके सोपे नाही. यावर काम सुरू केल्यानंतर हळू हळू आपल्याला याचे ज्ञान प्राप्त होईल. दोन-तीन वर्षांआधी या साठी कमी कष्ट लागायचे कारण मराठी भाषेतील साईट्स खूप होत्या, परंतु आता स्पर्धा वाढली आहे आणि तंत्रज्ञान सुद्धा अपडेट होत आहे.
SEO साठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे keywords, ज्यासाठी थोड्या research ची आवश्यकता असते. google keyword planner हे एक मोफत टूल आहे, ज्या मध्ये keywords टाकून त्याचे महत्व कळते. Search Engine Optimization साठी लागणारे कौशल्य हळू हळू प्राप्त होईल परंतु नवखे असणार्यांना सोप्या भाषेत सांगण्याचा हा प्रयत्न आहे. (SEO meaning in Marathi).
संबंधित लेख