उत्तम Resume कसा तयार करावा?

शेअर करा

Resume म्हणजे काय? Resume कसा तयार करावा?

नोकरीसाठी अर्ज करताना महत्वाची गोष्ट म्हणजे Resume (रिझ्युमे). यामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्ती संबंधित सविस्तरपणे माहिती दिलेली असते. याला बायोडाटा (Bio-data) असे देखील संबोधले जाते. कॉम्प्युटर अथवा मोबाईल द्वारे आपण Resume बनवू शकतो. नाव, नंबर, ईमेल, शिक्षण, अनुभव या महत्वाच्या गोष्टी Resume मध्ये लिहाव्या लागतात. जर एखादी व्यक्ती Resume पाहत असेल तर त्या व्यक्तीला आपल्या बद्दल थोडक्यात माहिती मिळावी, यासाठी Resume महत्त्वाचा ठरतो. तसेच मुलाखत घेणाऱ्या व्यक्ती कडून याच कागदाच्या आधारे प्रश्न विचारले जातात.

Resume कसा तयार करावा?

ज्याप्रकारे मुलाखतीसाठी अभ्यास आणि सराव या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याचप्रकारे Resume देखील एक महत्त्वाची बाब आहे. मुलाखत घेणारा व्यक्ती आणि तुमच्या मध्ये  संवाद होण्याआधी तुमचा Resume तपासला जातो. यामध्ये दिलेल्या माहितीवरून मूल्यमापन तसेच पात्रता लक्षात घेतली जाते. त्यामुळे Resume ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. Resume बनवताना काही अडचण आली तर संदर्भसाठी नमुना (Sample) जोडला आहे, तो डाउनलोड करावा. Resume कसा तयार करावा बद्दल सविस्तर…

प्राथमिक माहिती

आपल्या कॉम्पुटर मध्ये असणाऱ्या MS-Word च्या मदतीने उत्तम Resume बनवता येतो. नवीन फाईल बनवताना सर्वप्रथम आपले संपूर्ण नाव मोठ्या अक्षरांत लिहावे. त्यानंतर आपलं मोबाईल क्रमांक आणि ई-मेल लिहावा. या प्राथमिक माहिती नंतर. एक ठळक रेषा द्यावी, जी माहिती मध्ये दोन भाग करेन.

प्राथमिक माहिती मध्ये शक्यतो आपली प्रतिमा (Image) देऊ नये. नाव, क्रमांक आणि ई-मेल ही माहिती पुरेशी आहे. त्यानंतर आपली मुख्य माहिती येईल. ज्यामध्ये उद्देश (Career Objective) 50 ते 60 शब्दात लिहावा. करिअरचा मूळ उद्देश, क्षेत्र आणि भविष्यात साध्य करण्याबाबत यात लिहू शकता. पुढे कौशल्य (Skill Sets) बद्दल माहिती असेन. त्यात आपल्या मध्ये असणाऱ्या कौशल्य बाबत मुद्दे लिहावेत.

शैक्षणिक माहिती

शैक्षणिक माहिती लिहिताना उच्चशिक्षण, पदवी, महाविद्यालय, HSC, SSC असा क्रम असावा. म्हणजेच आधी पदवी बद्दल माहिती नंतर कॉलेज आणि शालेय शिक्षण माहिती. इतर व्यावसायिक प्रमाणपत्र (Professional Certificates) माहिती शैक्षणिक माहिती नंतर लिहावी. उदा. Tally, MS-CIT, CCC, Digital Marketing.

Resume कसा तयार करावा resume kasa banvaycha resume kasa tayar karava
Resume कसा तयार करावा, resume kasa tayar karava

अनुभव

जर आपल्याला कामाचा अनुभव असेल तर त्याबद्दल सविस्तर माहिती लिहिणे गरजेचे आहे. कारण यावरच तुमची पात्रता ठरवली जाते. या मध्ये हुद्दा, क्षेत्र, कालावधी, काम ही सर्व माहिती सविस्तर लिहावी. एकापेक्षा जास्त क्षेत्रात अनुभव असेल तर तसें नमूद करावे. अनेक कंपन्यामध्ये काम केले असेल तर अलीकडील माहिती आधी आणि नंतर जुनी माहिती असा क्रम ठेवा.

जर आपल्याकडे कुठलाच अनुभव नसेल तर शैक्षणिक माहिती आणि कौशल्य या बाबी वर जास्त भर द्यावा. मुद्देसूद आणि सविस्तर माहिती लिहिणे महत्वाचे ठरेल. कारण मुलाखती दरम्यान याच माहितीवर जास्त भर दिला जाईल. नवीन (Fresher) असणाऱ्यांना मुलाखतीचा सराव करणे अत्यंत गरजेचे असते. सराव केल्याने आत्मविश्वास निर्माण होतो.

प्रोजेक्ट 

पुढे आपण केलेले Project, Internship याबद्दल थोडक्यात माहिती लिहावी. जर कामाचा अनुभव नसेल तर सविस्तर लिहू शकता. परंतु जास्त पानाचा Resume होण्यासाठी माहिती भरू नका. यानंतर आपली वैयक्तिक माहिती ज्यामध्ये संपूर्ण नाव, जन्मतारीख, लग्न झाले अथवा नाही, भाषा आणि छंद याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी.

प्रतिज्ञापत्र 

सर्वात शेवटी प्रतिज्ञापत्र (Declaration) लिहिणे अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये दोन तीन ओळी लिहिलेल्या असतील ज्यात आपण  दिलेली माहिती ही खरी आहे याची खात्री आहे असे नमूद करावे लागेल. तसेच खाली आपली सही देखील करावी. यामुळे माहितीची खातरजमा होईल आणि अधिक विश्वास निर्माण होईल. (Resume कसा तयार करावा).

Resume Format Download here : Sample Format


वरील लेख उपयुक्त वाटला तर आपली प्रतिक्रिया खालील चौकटीत नोंदवा 


अलीकडील लेख

  • गॅजेट्स जे उपयुक्त ठरतील वर्क फ्रॉम होम साठी
    सध्याच्या जागतिक महामारीच्या काळात बहुतेक लोक हे घरून काम (work from home) करत आहेत. काही लोकांना घरून काम करणे म्हणजे अतिशय कंटाळा आणि कामाची इच्छा न होणे. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपले वर्क … Read more
  • ऑनलाईन / डिस्टन्स एजुकेशन साठी प्रवेश घेताना घ्यावयाची काळजी
    A lot Marathi – Distance Education डिस्टन्स एजुकेशन जॉब करत असताना शिक्षण घेणे हे खूप कष्टाचे काम होते. पण अलीकडच्या काळात शिक्षणातही आधुनिकीकरण झाले. त्यामुळे शिक्षण आणि काम दोन्ही एकत्र करता येत आहे. काही कंपन्या … Read more
  • Digital Marketing in Marathi – मार्केटिंग चे आधुनिक पर्याय
    एकविसाव्या शतकात सर्वच गोष्टीत फार मोठे बदल होत आहेत, त्यास आधुनिकीकरण हे सर्वात मोठे कारण आहे. अलीकडच्या काळात जाहिरात करण्याच्या पद्धती मध्ये खूप बदल झाले आहेत.पाच-सात वर्षाआधी मार्केटिंग ही पारंपरिक पद्द्धतीने करण्यात यायची. त्यात पोस्टर्स, … Read more
  • रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी
    रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी : रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी | सध्या सगळे जग Covid-19 या जीवघेण्या आजारामुळे त्रस्त झाले आहे. या रोगावरती लस अजून येणे बाकी आहे. जगातील बऱ्याच संस्थांनी आपण लस शोधली … Read more
  • जेव्हा आपण निसर्गात वेळ घालवाल तेव्हा घडतील आश्चर्यकारक गोष्टी
    निसर्गात (nature) फिरायला गेल्यानंतर मनातील तणाव दूर होऊ शकतो हे आपणास कधी लक्षात आले आहे का? जेव्हा आपण ताज्या हवेमध्ये बाहेर पडतो तेव्हा आपल्या सर्व समस्याच्या विचारातून बाहेर येतो. जेव्हा आपल्याला असे जाणवेल की आपण … Read more
  • निसर्गाचे रक्षण आणि भविष्यातील जागतिक संकट
    अतिशय वेगाने जगभरात पसरत असलेल्या कोवीड-१९ ने आता ४० लाणखांवरून अधिक लोकांना संक्रमित केले आहे आणि जवळजवळ २ लाख लोकांचा बळी घेतला आहे. विषाणूची उत्पत्ती कशी झाली याबाबत अजूनही संभ्रम असला तरी, आपल्या पर्यंत येई … Read more
error: Content is protected !!