Political Parties in Maharashtra
राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष अशा दोन मुख्य प्रकारात पक्ष वर्गवारी करण्यात आलेली आहे. राज्य पातळीवर काम करणारे पक्ष हे प्रादेशिक पक्ष म्हणून संबोधले जातात आणि देश पातळीवर काम करणारे पक्ष हे राष्ट्रीय पक्ष म्हणून संबोधले जातात. पक्ष संघटना कार्यक्षेत्र, राज्य, प्रदेश अशा अनेक बाबी नुसार पक्षांची नोंदणी होते. भारतीय निवडणूक आयोग या पक्षांची नोंदणी करते. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष दोन्ही कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष यांची थोडक्यात माहिती इथे देत आहोत. (Political Parties in Maharashtra)
महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष कोणते? Which are the regional parties in Maharashtra?
महाराष्ट्रात अनेक प्रादेशिक पक्ष कार्य करतात. यामध्ये शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्र्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पक्ष, कम्युनिस्ट पार्टी, एमआयम, बहुजन विकास आघाडी हे महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहेत. या व्यतिरिक्त अनेक प्रादेशिक पक्ष महारष्ट्रात नोंदणीकृत आहेत, मात्र ते सक्रिय राजकारणात सहभंगी नाहीत.
१. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
काँग्रेस पक्षाची स्थापना ब्रिटिश काळात इ.स. १८८५ साली मुंबई येथे झाली. स्थापनेपासून बऱ्याच मंडळींनी महत्वाची भूमिका बजावली आहे. यात लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांचा समावेश होता. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांच्याकडे काँग्रेस पक्षाची धुरा आली. धर्मनिरपेकता, समान हक्कआणि जागतिक शांतता असा काँग्रेस पक्षाचा मूळ उद्देश आहे.
सुरुवातीच्या काळात गाय आणि वासरू हे पक्षाचे अधिकृत चिन्ह होते, त्यानंतर हाताचा पंजा हे चिन्ह देण्यात आले. भारतातील राष्ट्रीय आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची गणना केली जाते. महाराष्ट्रात भारतीय काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाशी आघाडी आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय पक्ष (राष्ट्रीय) म्हणून गणला जातो.
पक्षामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर हायकमांड कडे सर्व अधिकार असतात. हायकमांड म्हणजेच काँग्रेस पक्षातील एक मुख्य कार्यकारिणी आहे. अंतिम निर्णय घेण्याचा मुख्य अधिकार हायकमांड कडे असतो. कार्यकारिणी मध्ये काँग्रेस चे जेष्ठ नेते आणि अध्यक्ष यांचा समावेश असतो.
२. भारतीय जनता पार्टी
भारतीय जनसंघ – जनता पार्टी – भारतीय जनता पार्टी असा प्रवास आहे. सर्वात आधी जनसंघाची स्थापना करण्यात आली, जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाग होता. १९५१ साली जनसंघाची स्थापना झाली. त्यानंतर १९७७ साली संविचारांचे पक्ष एकत्र येऊन जनता पक्ष ची स्थापना करण्यात आली. नंतर जनता पक्ष बरखास्त झाला आणि १९८० साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली.
अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे प्रथम अध्यक्ष होते. हिंदुत्व आणि राष्ट्रवाद हे दोन मुख्य उद्देश आहेत. सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे चिन्ह नांगर खांदयावर घेतलेला माणूस हे होते, भारतीय जनता पक्ष स्थापन झाल्यानंतर कमळ हे चिन्ह देण्यात आले. राष्ट्रीय पक्ष म्हणून या पक्षाची गणना केली जाते. महाराष्ट्र राज्यात बराच काळ शिवसेना आणि भाजप यांची युती राहिलेली आहे.(Political Parties in Maharashtra).

३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सन १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. भारतीय काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेल्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. संयुक्त पुरोगामी आघाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश होतो. भारतातील राष्ट्रीय पक्ष असला तरी महाराष्ट्र राज्यात जास्त प्रभाव दिसून येतो. शरद पवार यांच्यावर यशवंतराव चव्हाण यांचा प्रभाव होता,पवार हे चव्हाण यांना स्वतःच्या वडिलांप्रमाणे मानत असत.
राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारसरणीने पक्ष प्रेरित आहे.पक्षाचे अधिकृत चिन्ह घड्याळ आहे, स्थापनेपासून यामध्ये बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष भारतीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आहे आणि सत्ता देखील स्थापन केली आहे. (Political Parties in Maharashtra).
महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष :
शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहेत.
४. शिवसेना
सन १९६६ मध्ये शिवसेना या पक्षाची स्थापना मुंबई येथे केली गेली. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी सोबत युती करून महाराष्ट्रात सत्तेत समाविष्ट झालेली आहे. शिवसेना हे संघटना म्हणून कार्यरत होती, काही काळाने पक्षात रूपांतर करण्यात आले.
धनुष्यबाण हे पक्षाचे अधिकृत चिन्ह आहे. मुख्यत्वे मराठी माणूस, हिंदुत्व, मुंबई हे मुद्दे/उद्देश आहेत. पक्ष व्यतिरिक्त बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सध्या उद्धव ठाकरे हे पक्ष प्रमुख म्हणून शिवसेना सांभाळत आहेत. २०१९ मध्ये महाराष्ट्रात भाजपशी युती तोडून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्ता स्थापन केली गेली. शिवसेनेकडे सर्वांपेक्षा वेगळा महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हणून पहिले जाते.
शिवसेना पक्षातून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मनसे हा एक प्रादेशिक पक्ष आहे. मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र धर्म हे प्रमुख मुद्दे/उद्देश आहे. मनसेचे परप्रांतीय विरुद्ध आंदोलन हे गाजलेले प्रकरण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्याच निवडणुकीत १३ आमदार निवडून आणले, मात्र त्यानंतर फारसे यश मिळाले नाही. मनसे हा महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहे.
पक्षाचे अधिकृत चिन्ह रेल्वे इंजिन आहे. पक्ष स्थापनेपासून मनसेने राज्यात अद्याप कुठल्याही पक्षासोबत युती केली नाही आणि एकत्र निवडणूक देखील लढवली नाही. सद्यस्थितीत मनसेचा एकमेव आमदार आहे. असे असले तरी राज ठाकरे याना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. ग्रामीण भागात देखील मनसे कार्यरत आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न मनसे कडून केला जातो. (Political Parties in Maharashtra)
अलीकडील लेख