पॉडकास्ट म्हणजे काय? What is Podcast meaning in Marathi?

शेअर करा

पॉडकास्ट म्हणजे काय? What is Podcast meaning in Marathi?

तंत्रज्ञानाच्या विश्वात रोज नवनवीन गोष्टी येत असतात त्यात एक नवीन शब्द म्हणजे “पॉडकास्ट”. ब्लॉग, विडिओ या प्रकारेच Podcast हे एक नवीन माध्यम आहे. लेख अथवा ब्लॉग मध्ये शब्दांच्या माध्यमातून माहिती मांडली जाते, विडिओ मध्ये चलचित्रांच्या (visuals) माध्यमातून माहिती मांडली जाते. त्याच प्रकारे Podcast मध्ये फक्त ध्वनीचा (audio) वापर करून माहिती दिली जाते. जसे आपण रेडिओ, एफ. एम. ऐकतो ज्यामध्ये फक्त आवाज ऐकायला येतो, अगदी त्याच प्रकारे पॉडकास्ट असते.

पॉडकास्ट कसे करतात?

आपल्याकडे असणाऱ्या मोबाईल चा वापर करून पॉडकास्ट सुरु करता येते. ज्याप्रकारे ब्लॉग सुरु करण्यासाठी वेबसाईट, व्हिडिओ प्रसारित करण्यासाठी युट्युब चॅनेल महत्वाचे आहे. याउलट पॉडकास्ट साठी विशिष्ट तंत्रज्ञानाची गरज नसते. जसे व्हिडिओ रेकॉर्ड करून युट्युब अथवा फेसबुकवर पोस्ट केला जातो त्याच प्रकारे आवाज रेकॉर्ड करून पॉडकास्ट बनवता येते, त्यानंतर ते विविध माध्यमांवर प्रसारित करता येते. आठवड्याला, दिवसाला अथवा एका विशिष्ट वेळेला प्रसारण केले जाऊ शकते.(Podcast meaning in Marathi).

व्हिडिओ साठी लागणारे तंत्रज्ञान जसे कॅमेरा, लाईट, बॅकग्राऊंड यासाठी थोडाफार खर्च येतो. याउलट पॉडकास्टींग साठी एक चांगला माईक आणि आपला मोबाईल इतके पुरेसं आहे. फक्त आवाज उत्तम कसा येईल याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. आवाजासाठी ऑडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर/अँप चा वापर केला जाऊ शकतो.

वेळेचा अभाव  

वाचन करण्यासाठी अथवा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि आजकाल सर्वांकडे वेळेचा अभाव आहे. त्यामुळे माहिती साठी पॉडकास्ट माध्यमाचा प्रभावीपणे वापर केला जातो. जसे काम करत असताना गाणी ऐकली जातात तसेच पॉडकास्ट देखील ऐकू शकतो. डोळ्यांचा वापर न करता फक्त कानांनी ऐकून माहिती घेतली जाते. व्हिडीओ आणि लेख यांच्या तुलनेत पॉडकास्ट साठी कमी वेळ द्यावा लागतो.

पॉडकास्टचा वापर 

पॉडकास्ट सर्वाधिक वापर अमेरिका आणि इंग्लंड मध्ये होतो. भारतात मागच्या वर्षभरात पॉडकास्ट माध्यमांचा जास्त वापर होत आहे. बातम्या देणाऱ्या वाहिन्या आपल्या संकेतस्थळावर, सोशल मीडिया पेज वर पॉडकास्ट च्या माध्यमातून बातम्या देतात.  कमी वेळात मराठी भाषेत प्रसिद्ध झालेले पॉडकास्ट म्हणजे बीबीसी मराठी पॉडकास्ट. दिवसभर घडलेल्या घडामोडी पॉडकास्ट मध्ये संक्षिप्त स्वरूपात मांडल्या जातात. 

पॉडकास्ट म्हणजे काय? What is a podcast meaning in Marathi?
(Podcast meaning in Marathi) 

विविध मंच 

जसे व्हिडिओ द्वारे माहिती प्रसारित करण्यासाठी युट्युब या माध्यमाचा वापर केला जातो. तसे पॉडकास्ट साठी सर्वात आधी येतो “Google Podcast” मंच. याच प्रकारे स्वतःचे संकेतस्थळ, फेसबुक, युट्युब चा देखील जातो. काही लोक व्हिडिओ च्या माध्यमातून देखील पॉडकास्ट प्रसारित करतात, ज्यामध्ये चित्रफीत नसते फक्त ध्वनी (audio) असतो. त्यात जरी चित्रफीत असली तरी आपण फक्त ऐकलं तरीही ती माहिती आपल्या पर्यंत पोहचते.

Marathi Podcast

Marathi Podcast मध्ये अनेक पॉडकास्ट करणारे व्यक्ती आहेत. यात गोष्टी. कथा/कविता वाचन, बातम्या, कट्टा अश्या विविध प्रकारचे Marathi Podcast आहेत. अलीकडच्या अलीकडच्या काळात पॉडकास्टचा वापर वाढत आहे, कारण कमी वेळेत आणि कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येते. तसेच लोकांकडे जास्त वेळ नसल्याने एखादे काम करत करत पॉडकास्ट ऐकता येतो. (Podcast meaning in Marathi). 


अलीकडील लेख

error: Content is protected !!