वैयक्तिक कर्जाविषयी माहिती. Personal Loan information in Marathi

शेअर करा

Personal Loan information in Marathi

जेव्हा आपण वैयक्तिक कर्ज तसेच इतर कोणत्याही कर्जासाठी अर्ज करत असतो तेव्हा आपण ते कर्ज घेण्यासाठी कोणकोणती प्रक्रिया असते जी आपण पुर्ण करणे गरजेचे आहे ते जाणुन घेणे खुप आवश्यक असते. याचसाठी लागणारी सर्व कागदपत्रे आपण आधीपासुन तयार करून ठेवायला हवीत जेणेकरून कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना आपल्याला कोणतीही समस्या येणार नाही.तसेच आपले लोन लवकर मंजुर करून घेण्यात येऊ शकते. त्याचबरोबर वैयक्तिक कर्ज हे आपल्याला कमी व्याजदरात देखील प्राप्त होते.

सविस्तर जाणुन घेऊयात वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करायचा? वैयक्तिक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती असतात?  वैयक्तिक कर्जासाठी काय पात्रता आवश्यक असते? वैयक्तिक कर्जासाठी काही तारण ठेवावे लागते का?

वैयक्तिक कर्ज (personal loan) म्हणजे काय?

कोणतीही बँक ही आपल्याला दोन प्रकारचे कर्ज देत असते. त्याच्यामधील एक कर्ज हे सुरक्षित असते आणि एक कर्ज हे विनासुरक्षा प्रदान असते. सुरक्षित कर्ज जेव्हा आपण घेत असतो तेव्हा त्याची गँरंटी आपल्याला बँक देत असते. ज्याच्यामध्ये प्रामुख्याने गृहकर्ज (home loan) तसेच auto loan या दोघांचा समावेश होत असतो. पण जे कर्ज असुरक्षित असते त्याची हमी स्वता बँक कधीच घेत नसते. हे कर्ज घेत असलेल्या व्यक्तीची म्हणजेच आपली कर्ज फेडण्याची किती क्षमता आहे? हे बघुन सदर कर्ज दिले जात असते. वैयक्तिक कर्ज हे अशाच असुरक्षित कर्जाच्या गटात मोडते.

बहुतेक बँक अशा असतात ज्या आपल्याला हे वैयक्तिक कर्ज लग्न, घराचे बांधकाम करणे इत्यादी वैयक्तिक कारणांसाठी आपल्याला देत असतात. पण पाहायला गेले तर सुरक्षित कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी आपल्याला जास्त पटीने व्याजदर भरावे लागत असते. (Personal Loan information in Marathi)

वैयक्तिक कर्जासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात?

वैयक्तिक कर्ज प्राप्त करण्यासाठी खालील दिलेली कागदपत्रे जोडणे आवश्यक असते:

●     आधार कार्ड

●     पासपोर्ट

●     ड्रायव्हिंग लायसन्स 

●     अँड्रेस प्रूफ

●     पँनकार्ड

●     सहा महिन्याची पगार स्लीप (नोकरदारांसाठी) 

●     3 महिन्याचे आयटी आर (व्यवसायिकांसाठी) 

●     तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट

●     दोन वर्षाचा फाँर्म 16

●     कंपनीचे लेटर (आपण काम करत असलेल्या)

●     शंभर रुपयाचे दोन स्टँम्प पेपर 

●     बंँकेचा फाँर्म 

●     दोन पासपोर्ट साईज फोटो

वैयक्तिक कर्ज प्राप्त करण्यासाठी काय पात्रता आवश्यक असते?

कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक कर्ज देण्यासाठी प्रत्येक बँकेने आपल्या कर्ज देण्यासाठी पात्रतेच्या काही अटी ठरवलेल्या असतात. ज्या पुर्ण करणे आपल्यासाठी अनिवार्य असते.

●     कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक कर्ज देण्याआधी बँक त्याचे इन्कम, क्रेडिट, इम्पलाँयमेंट हिस्ट्री आणि त्या व्यक्तीची कर्ज फेडण्याची किती क्षमता आहे? हे सर्वप्रथम बघत असते.यासाठी बँक आपले घर बघण्यासाठी प्रत्यक्ष सुदधा येत असतात. हे बघण्यासाठी तसेच याची शहानिशा करण्यासाठी की ह्या व्यक्तीची र्थिपरिस्थिती कर्ज फेडण्याइतपत आहे का नाही? मग ही सर्व बँकेची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरच आपले कर्ज बँकेकडुन मंजुर होत असते. 

Personal Loan information in Marathi

Personal Loan information in Marathi
Personal Loan information in Marathi

वैयक्तिक कर्जासाठी आँनलाईन अर्ज कसा करावा?

वैयक्तिक कर्ज प्राप्त करण्यासाठी आपण दोन पदधतीने अर्ज करू शकत असतो. एक आँनलाईन दुसरा आँफलाईन. सर्वात पहिले आपण जाणुन घेऊयात की वैयक्तिक कर्ज प्राप्त करण्यासाठी आँनलाईन अर्ज कसा करायचा? 

प्रत्येक बँकेची कर्जासाठीची अर्ज प्रक्रिया ही वेगवेगळी असते तरी आपण उदाहरण म्हणुन जर आपण आय सी आय सी आय बँकेमध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करत असू तर आपल्याला कोणत्या पदधतीने अर्ज करावा लागेल हे समजुन घेऊयात. 

●     सगळयात पहिले आपल्याला ICICI बँकेच्या वेबसाईटवर जावे लागेल.आणि समजा जर आपण सदर बँकेचे अकाऊंट आधीपासुनच उघडले असेल तर मग आपण याचा लाभ घेत पर्सनल बँकिंग सेक्शनमध्ये नेट बँकिंगची निवड करू शकतो. पण नेट बँकिंग अकाऊंटवर लाँग ईन करण्यासाठी आपल्याला आपला आयडी पासवर्ड लक्षात ठेवणे देखील फार महत्वाचे असते.

●     समजा जर आपण बँकेचे नवीन ग्राहक असु तर मग आपल्याला लोन्स टॅब नावाच्या आँप्शनवर क्लीक करावे लागत असते. तिथुन आपण डायरेक्ट बँकेच्या आँफिशिअल लोन वेबसाईटवर रिडायरेक्ट होत असतो. त्याचबरोबर जर आपले फेसबुक टविटर तसेच लिंक्ड इनचे अकाऊंट असेल तर आपण तिथुन सुदधा लाँग ईन करण्याची सुविधा आपल्याला प्राप्त असते.

●     लोन सेक्शन मध्ये प्रवेश केल्यानंतर पर्सनल लोन आँप्शनवर क्लीक करून आपण अँप्लाय नाउ ह्या पर्यायावर ओके करायचे असते.

●     मग पर्सनल लोन अँप्लीकेशनचा एक फाँर्म येत असतो त्यातील सर्व माहिती आपण व्यवस्थित भरायची असते. मग शेवटी डाँक्युमेंट अपलोड करून फाँर्म सबमीट करायचा असतो.

एक गोष्ट आपण लक्षात ठेवणे फार गरजेचे असते की बँक सगळयात पहिले आपल्या अर्जाच्या पात्रतेचे मुल्यांकन करत असते. हे मुल्यांकन केले गेल्यानंतर बँकेला आवश्यकता पडल्यास अधिक माहितीसाठी बँक आपल्याकडे केवायसी डाँक्युमेंट तसेच आपले इन्कम डाँक्युमेंट देखील तपासणीसाठी मागण्याची दाट शक्यता असते. जेव्हा आपण बँकेच्या नजरेत लोनसाठी पात्र ठरत असतो तेव्हा बँक आपल्या लोनची रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये टाकत असते.अन्यथा नाही. 

वैयक्तिक कर्जासाठी आँफलाईन अर्ज कसा करायचा?

●     सगळयात पहिले आपल्याला ज्या बँकेकडुन कर्ज हवे आहे त्या बँकेत जावे लागते.

●     बँकेचा वैयक्तिक कर्जासाठीचा अर्जाचा फाँर्म असतो तो आपल्याला सगळयात पहिले भरावा लागतो.

●     मग आपल्याला आपली लोनसाठी लागणारी सर्व महत्वाची कागदपत्रे जी बँकेनी नमुद केलेली असतात ती सर्व त्या फाँर्मला जोडावी लागतात.आणि तो फाँर्म बँकेत जमा करावा लागतो.

●     यानंतर मग शेवटी बँक आपल्या कागदपत्रांची पडताळणी करते आणि आपण लोन किती पात्र आहोत हे बघत असते तसेच आपली वैयक्तिक तपासणी करून शहानिशा देखील करून घेत असते.

●     जेव्हा आपण लोनसाठी पात्र ठरत असतो तेव्हा बँक आपली लोनची रक्कम आपल्या खात्यामध्ये पाठवत असते.

वैयक्तिक कर्ज आपण कधी घ्यायला हवे?

वैयक्तिक कर्जासाठी आपण कधी अर्ज करायला हवा हे सांगावयास गेले तर मुख्यत्करून जेव्हा आपल्याकडे इतर कोणताच पर्याय उरलेला नसतो.तेव्हा आपण शेवटचा पर्याय म्हणुन वैयक्तिक कर्ज घ्यायला काहीच हरकत नाही.कारण तेव्हा आपल्याकडे दूसरा पर्याय देखील तेव्हा नसतो. खर पाहायला गेले तर वैयक्तिक कर्जामध्ये असुरक्षितता असल्या कारणाने बँक आपल्याकडुन जास्त व्याजाची आकारणी यामध्ये करत असते. म्हणुन आपण शक्य तितके वैयक्तिक कर्ज घेणे टाळायला हवे. (Personal Loan information in Marathi).


error: Content is protected !!