ऑलिम्पिक माहिती सविस्तर
Olympic information in Marathi
आज प्रत्येक देशात अनेक व्यक्ती जे कोणत्या ना कोणत्या खेळात पारंगत असतात असे असलेले आपणास दिसुन येत असतात. अशा दिग्दज तसेच कौशल्यवान व्यक्तींचे कौशल्य सर्व जगासमोर यावे ह्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धा राबवल्या जात असतात. ज्यात वेगवेगळया क्रिडा क्षेत्रातील पारंगत व्यक्तींसाठी वेगवेगळया खेळांचे आयोजन केले जाते. जेणेकरून त्यांना आपले कौशल्य जगासमोर आणता येईल. आजच्या लेखातुन आपण ह्याच ऑलिम्पिक खेळा विषयी सविस्तरपणे माहिती जाणुन घेणार आहोत.
ऑलिम्पिक स्पर्धा म्हणजे काय?
आज पाहावयास गेले तर आपणास संपुर्ण जगभरातील प्रत्येक देशामध्ये असे अनेक दिग्दज खेळाडु पाहायला मिळतात जे एखाद्या कला कौशल्यामध्ये अत्यंत निपुण असतात. आणि त्यांची एका विशिष्ट कला कौशल्यातील निपुणता संपुर्ण जगाला ज्ञात व्हावी म्हणुन आंतरराष्टीय पातळीवर एका भव्य स्पर्धेचे आयोजन केले जाते आणि ह्या स्पर्धेलाच ऑलिम्पिक स्पर्धा असे म्हटले जाते.
ऑलिम्पिक स्पर्धेची सुरूवात कुठे आणि केव्हा झाली?
प्राचीन ऑलिम्पिकच्या स्पर्धेचा सुरुवातीचा कालखंड हा इसवी सन पुर्व 776 हा आहे.पण रोमचा राजा थिओ डोटस याने ह्या स्पर्धेवर बंदी आणली होती. यानंतर मग ग्रीकमध्येच स्थित असलेल्या अथेन्स नावाच्या एका शहरामध्ये 1896 मध्ये आंतरराष्टीय ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सुरू होताच जगभरातील तब्बल 15 देशांनी या स्पर्धेत भाग घेतला होता, ज्यामध्ये भारताचा देखील समावेश होता.
ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी होते?
आ़ँलम्पिक स्पर्धेचे आयोजन दर चार वर्षांनी केले जाते आणि ही स्पर्धा आयोजित करण्याचे काम ऑलिम्पिक समितीचे असते.
ऑलिम्पिक स्पर्धेच्या ध्वजावर किती वर्तुळे असतात? ह्या वर्तुळांचा अर्थ काय आहे?
ऑलिम्पिक स्पर्धेच्या ध्वजावर एकुण पाच वर्तुळे असतात. ही पाचही वर्तुळे वेगवेगळया रंगामध्ये दिलेली असतात. ह्या वर्तुळांचा रंग हिरवा, लाल, काळा, निळा, पिवळा असा पंचरंगी असतो आणि ह्या वर्तुळांमधुन आपल्याला जगातील पाच प्रमुख खंड दाखवले जातात. ज्यात काळा वर्तुळ हा आफ्रिका खंड दर्शविण्याचे काम करतो. लाल वर्तुळ अमेरिका खंड दर्शवितो आणि निळा वर्तुळ युरोप खंड, पिवळा वर्तुळ आशिया खंड, हिरवा वर्तुळ ओशिनिया खंड दर्शवितो. अशा प्रकारे ही पाचही वर्तुळे आपणास जगातील पाच खंड दर्शवितात.
ऑलिम्पिक खेळामध्ये वापरले जाणारे ब्रीदवाक्य कोणते आहे आणि त्या ब्रीदवाक्यांचा अर्थ काय होतो?
ऑलिम्पिक खेळामध्ये प्रामुख्याने तीन ब्रीदवाक्य वापरली जात असतात.
1) गती (citius)
2) उच्चता (altius)
3) तेज (fortius)
1) गतीचा अर्थ: याचा अर्थ असा होतो की प्रत्येक खेळाडुने आपापल्या खेळात गती आणायला हवी.
2) उच्चता : याचा अर्थ असा होता की प्रत्येक खेळाडुने आपल्या खेळामध्ये उच्च शिखर गाठायला हवे.
3) तेज : याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या खेळात तेज प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करायला हवी.
Olympic information in Marathi
ऑलिम्पिकमध्ये कोणकोणत्या खेळांचा समावेश केला जातो?
ऑलिम्पिकमध्ये अनेक खेळांचा समावेश होत असतो. पण ह्या सर्व खेळांची आपणास माहिती नसते. याचकरिता ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट होत असलेल्या काही अत्यंत महत्वाच्या आणि प्रसिद्ध खेळांची नावे आपण जाणुन घेणार आहोत.
● फुटबाँल
● टेनिस बाँल
● बँटमिंटन
● आर्चरी (धनुष्यविद्या)
● बास्केट बाँल
● हाँलीबाँल
● बेसबाँल
● हाँकी
● ज्युरो कराटे
● क्रिकेट
● सायकलिंग
● गोल्फ
● टेबल टेनिस
● कुस्ती
● बाँक्सिंग
● अँथलेटिक्स

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विजेत्याला दिली जाणारी काही महत्वाची पदके तसेच पारितोषिके कोणकोणती आहेत?
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विजेत्याला तीन महत्वाची पारितोषिके बहाल केली जात असतात.आणि ही तीन पारितोषिके पुढीलप्रमाणे:
सुवर्ण पदक
कास्य पदक
रौप्य पदक
1) सुवर्ण पदक : ऑलिम्पिक स्पर्धेत विजेत्याला देणारे हे एक उच्च पदक म्हणुन ओळखले जाते.हे पदक अशा विजेत्याला दिले जाते ज्याने नोबेल पारितोषिक प्राप्त केलेले असते.
2) रौप्य पदक : जेव्हा आँल्म्पिक मध्ये एखादा खेळाडु दितीय क्रमांक प्राप्त करून विजय मिळवत असतो.तेव्हा त्याला कांस्यपदक दिले जात असते.
3) कास्य पदक : ऑलिम्पिक स्पर्धेत त्रितीय क्रमांक मिळवून विजय प्राप्त करत असलेल्या विजेत्याला हे कास्यपदक दिले जात असते.
Olympic information in Marathi
ऑलिम्पिक खेळांविषयी जाणुन घ्यावी अशी काही रोचक तथ्ये कोणकोणती आहेत?
● ऑलिम्पिक खेळामध्ये संपुर्ण जगभरातील प्रत्येक देशातील कौशल्यवान आणि आपल्या कला कौशल्यात पारंगत व्यक्ती भाग घेत असतात. म्हणुन एवढया मोठया मंचावर जिथे एकापेक्षा एक दिग्दज हजर असतात अशा ठिकाणी आपण जिंकणे हे ह्या स्पर्धेत भाग घेत असलेल्या प्रत्येकाचे स्वप्र असते.
● इथे जगभरातील प्रत्येक देशाचे स्पर्धक जिंकण्यासाठी भाग घेत असतात म्हणजेच हे एक असे मोठे व्यासपीठ आहे जिथे संपूर्ण जगातील लोक एकत्र येत असतात.
आपल्या लहान मुलाला ऑलिम्पिक मध्ये जाता यावे यासाठी आपण काय करायला हवे?
● सर्वात आधी आपल्या लहान मुला तसेच मुलीला अशा मोठया महाविद्यालयात प्रवेश मिळवून द्यावा जिथे त्याला क्रिडेचे योग्य प्रक्षिक्षण दिले जाईल. युपी तसेच लखनौ येथे असे प्रक्षिक्षण दिली जाणारी महाविद्यालये आहेत.
● अशा मोठया क्रिडा महाविद्यालयात लहान मुलांना प्रक्षिक्षण देण्यासाठी स्वता सरकार देखील खर्च करत असते.
क्रिडा संस्थानात प्रवेश मिळविण्यासाठी वयाची मर्यादा काय असते?
क्रिडा संस्थानात प्रवेश मिळविण्यासाठी आपल्या मुलाचे वय हे कमीत कमी 9 ते 12 च्या दरम्यान असावे लागते.
एका चांगल्या ऑलिम्पिक खेळाडुच्या अंगी कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे?
आज जे काही खेळाडु ऑलिम्पिक क्षेत्रात आपले नाव गाजवता आहे किंवा नाव गाजवून चुकले आहेत अशा सर्व ऑलिम्पिक खेळाडुंच्या अंगी एक साम्यता असलेली आपणास दिसुन येते ती म्हणजे त्यांच्या अंगी असलेले गुण ज्यामुळे आज ते ह्या क्षेत्रात एवढे यशस्वी झाले आहेत.ते गुण पुढीलप्रमाणे आहेत:
1) आपल्या शारीरीक स्थितीची समज तसेच योग्य आकलन असावे
आपण जेव्हाही कोणत्याही नवीन खेळामध्ये प्रवेश करत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींचे आकलन असणे फार गरजेचे आहे आणि त्या म्हणजे आपल्या शरीराचा जो आकार आहे, आपले जे वजन आहे, आपली जी उंची आहे त्याप्रमाणे आपण ठरवायला हवे की आपण कोणत्या खेळात चांगले उत्तम कार्य करू शकतो. कोणत्या खेळात आपण उत्तम प्रदर्शन करू शकतो.
2) आपल्या योग्यतेनुसार खेळाची निवड करण्याची क्षमता
आपण आपल्या शरीराच्या तसेच बौद्धिक क्षमतेच्या नुसार खेळाची निवड करायला हवी. जर आपले शरीर एकदम धष्टपुष्ट असेल आणि आपण कोणतीही शारीरीक कसरत करू शकत असू तर आपण शारीरीक क्रडेची निवड करावी तसेच जर आपले शरीर कमकुवत असेल आणि आपली बौद्धिक क्षमता उत्तम असेल तर आपण बौद्धिक कसरत कराव्या लागत असलेल्या खेळाची निवड करू शकतात.
3) प्रक्षिक्षणासाठी योग्य जागेची निवड करणे
एकदा आपण आपल्याला ऑलिम्पिक मध्ये कोणता खेळ खेळायचा निवडुन झाल्यानंतर आपल्याला आपल्या खेळाला अनुकुल अशा वातावरणात नियमित सराव करणे देखील गरजेचे असते. त्यासाठी आपण प्रक्षिक्षणासाठी एखाद्या क्रिडा संस्थानात क्रिडा प्रक्षिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतो. जेणेकरून आपल्याला तो खेळ त्या क्षेत्रातील तज्ञ तसेच अनुभवी व्यक्तींकडुन शिकण्यास मिळेल.
4) वेगवेगळया स्पर्धेत भाग घेणे
एकदा आपले प्रक्षिक्षण पुर्ण झाले तर त्या घेतलेल्या प्रक्षिक्षणाचा आपल्याला खरच किती उपयोग होतो आहे त्यातील शिकलेले आपल्याला किती व्यवस्थित जमते आहे हे पाहण्यासाठी आपण वेगवेगळया टुर्नामेंटमध्ये भाग घ्यायला हवा. आपले रेटिंग पाँईंट बघायला हवे याने आपल्याला कळेल की आपण आपल्या निवडलेल्या खेळात कुठपर्यत आत्तापर्यत आलो आहे. आपल्याला त्या खेळाचे किती ज्ञान प्राप्त झाले आहे.
5) योग्य गुरू तसेच मार्गदर्शकाची निवड करणे
जेव्हाही आपण कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करत असतो तेव्हा आपल्याला त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्या क्षेत्रातील तज्ञ तसेच अनुभवींची आवश्यकता असते. जे आपल्याला एक मार्गदर्शक तसेच आपले गुरू बनुन आपल्याला योग्य ती दिशा दाखवण्याचे काम करत असतात. (Olympic information in Marathi)