NIA Information in Marathi :
NIA full form is National Investigation Agency. राष्ट्रीय तपास यंत्रणा. NIA ही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येणारी तपास यंत्रणा आहे. दहशतवाद आणि त्या संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी NIA ची स्थापना करण्यात आली. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी या संस्थेला विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. (NIA Information in Marathi).
राष्ट्रीय तपास यंत्रणा माहिती :
स्थापना :
NIA ची स्थापना डिसेंबर 2008 मध्ये करण्यात आली. संसदेमध्ये National Investigation Agency Bill 2008 हे विधेयक मंजूर करण्यात आले. विशेषतः 2008 मध्ये मुंबई वर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे एक अशा संस्थेची गरज होती जी राष्ट्रीय पातळीवर काम करून दहशतवादी कारवाया थांबवेल. यामुळे NIA ची स्थापना करण्यात आली.
विशेष न्यायालय
NIA अधिनियम कलम ११ आणि २२ अन्वये विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या NIA खटल्यांच्या चाचणीसाठी केंद्र सरकारकडून विविध विशेष न्यायालयांना अधिसूचित केले गेले आहे. या न्यायालयांच्या कार्यक्षेत्रात येणारा कोणताही प्रश्न केंद्र सरकार केंद्र सरकारद्वारे निर्णयित केला जातो. त्या प्रदेशाच्या कार्यक्षेत्रातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने नेमलेल्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली हे काम करतात.
- संबंधित लेख :
मुख्यालय आणि क्षेत्रिय कार्यालय
National Investigation Agency चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि संपूर्ण भारतात अनेक मुख्य शहरात शाखा आहेत. आठ विभागामध्ये या शाखांची विभागणी करण्यात आली आहे. ही क्षेत्रिय कार्यालये पुढील प्रमाणे : मुंबई, कलकत्ता, हैद्राबाद, कोच्ची, लखनऊ, रायपूर, जम्मू आणि गुवाहाटी. कार्यक्षेत्र आणि गुन्ह्याच्या प्रकार यानुसार ही कार्यालय काम करतात.
अधिकारी नेमणूक:
NIA ही तपास यंत्रणा कुठल्याही दबावाखाली काम करत नाही, तसेच निपक्षपणे काम करते. राष्ट्रीय तपास यंत्रणा मध्ये काम करणारे अधिकारी देखील निडर आणि शिस्तप्रिय असतात. कारण त्यांची नेमणूक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमधून केली जाते. भारतीय पोलीस सेवा, राज्य पोलीस अधिकारी, प्राप्तीकर अधिकारी, केंद्रीय राखीव पोलीस दल इत्यादी मधून अधिकारी निवडले जातात. तसेच पात्रतेसाठी विशेष परीक्षा देखील घेतली जाते.
2019 मध्ये केलेल्या नवीन अधिनियमानुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) ही इतर देशात देखील तपास करू शकते. अर्थात त्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. NIA साठी विशेष आर्थिक तरतूद देखील आहे आणि दरवर्षी काही लक्ष रुपये यासाठी खर्च केले जातात. त्यामुळे ही एक उच्चस्तरीय आणि अतिमहत्वाची संस्था गणली जाते. (NIA Information in Marathi).
माहिती उपयुक्त वाटली असेल तर खाली दिलेल्या चौकटीत आपली प्रतिक्रिया नोंदवा