NGO information in Marathi
एनजीओ म्हणजे एक अशी गैरसरकारी संस्था (Non-Government Organisation) असते ज्यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नसतो, संस्थेला स्वयंसेवी संस्था असेही म्हटले जाते. सरकारचा कोणत्याही प्रकारचा संबंध यात नसतो. एनजीओ ही एक अशी संस्था असते. जिचे मुख्य उद्दिष्ट गरीब लोकांना मदत करणे आणि त्यांची अडचण, समस्या सोडविणे हे असते.
आपण ह्याच एनजीओ विषयी आजच्या लेखातुन जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की एनजीओ म्हणजे नेमके काय असते? एनजीओ कशापदधतीने काम करते? एनजीओचे काम काय असते? एनजीओचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात? इत्यादी सविस्तर माहीती आपण आजच्या लेखातुन जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एनजीओ म्हणजे काय?
एनजीओ ही एक अशी खाजगी स्वयंसेवी संस्था असते. जी सामाजिक कार्य करत असते. जिचा मुख्य हेतु हा सामाजिक कार्ये करणे हा असतो. जसे की गरीब स्त्रियांसाठी राहण्याची सोय करणे, गरीब आणि अनाथ मुलांना शिकविणे, महिलांना सुरक्षा प्रदान करणे इत्यादी कामे एनजीओ करत असते. एनजीओ ही एक अशी संघटना तसेच संस्था असते जी कोणीही चालवू शकतं. एनजीओचा मुख्य विकास अमेरिकेत झाला होता. कारण अमेरिकेमध्ये अशी खुप सामाजिक कार्ये केली जातात. जी सरकारद्वारे न होता काही संस्थांद्वारे केली जातात.
एनजीओ कशापदधतीने काम करते?
प्रत्येक एनजीओमध्ये सात तसेच सातपेक्षा जास्त लोक समाविष्ट असतात. एनजीओ ही एक अशी संस्था असते जिचा हेतु स्वताचा नफा करण्यापेक्षा इतरांचे भले करणे हा असतो. जर समजा एखाद्या व्यक्तीला सामाजिक कार्य करण्याची ईच्छा असेल तर ती व्यक्ती नोंदणी करुन तसेच विनानोंदणी करता हे कार्य करु शकते. पण जर आपण नोंदणी केलेली असेल तर आपण सरकारद्वारे आर्थिक मदत देखील मिळवु शकतो. पण समजा एखादा समाजसेवक असेल ज्याला सरकारकडुन कोणतीही आर्थिक मदत न घेता हे कार्य करायचे आहे तर तो विनानोंदणी सुदधा आपले एनजीओ सुरू करू शकतो.
एनजीओचा काम करण्याचा मुख्य हेतु काय असतो?
● महिलांना आवास योजना देणे.
● आदीवासी समाजाच्या समस्या दुर करणे त्यांच्या समस्या सोडविणे.
● समाजातील वेगवेगळया आजारांना तोंड देत असलेल्या लोकांना आर्थिक साहाय करणे.
● वृदध लोकांना मदत करणे.
● गरीब आणि अनाथ मुलांना शिक्षण देणे.
● शाळेतील मुलांना चांगले अन्न उपलब्ध करून देणे.
● मुलांना अभ्यासासाठी पुस्तके उपलब्ध करून देणे.
एनजीओचे प्रकार किती आणि कोणकोणते असतात?
एनजीओचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात :
1) रजिस्टर केलेले एनजीओ : रजिस्टर केलेले एनजीओ ते असते जे ज्याचे रजिस्ट्रेशन केलेले असते. ज्याच्या कार्यासाठी आपल्याला सरकारकडुन सुदधा पुरेसा निधी मिळत असतो. रजिस्टर एनजीओ मध्ये ट्रस्ट, कंपनी, सोसायटी यांचा समावेश असतो.
2) रजिस्टर न केलेले एनजीओ : रजिस्टर न केलेले एनजीओ म्हणजे ज्याची सरकारकडे कोणत्याही प्रकारची नोंद नसते. ज्याच्यात सरकारचा कोणताही संबंध नसतो.

एनजीओ मध्ये जाँईन कसे होतात?
कुठल्याही एनजीओमध्ये आपण दोन पदधतीने जाँईन करू शकतो. एक आपण एखाद्या एनजीओचे सभासदत्व घेऊ शकतो किंवा स्वताची एखादी खासगी एनजीओ देखील आपण सुरू करू शकतो. आपले स्वतःचे एनजीओ चालु न करता एखाद्या दुसऱ्या एनजीओ सोबत जोडण्यासाठी आपल्या मनात समाजसेवेची भावना असणे अत्यंत गरजेचे असते. त्याचबरोबर आपला याचा कोर्सही BSW/MSW झालेला असणे आवश्यक असते.
याच्यानंतर आपण इंटर्नशीपसाठी कोणतेही एनजीओ जाँईन करू शकता. त्यासाठी आपण एनजीओच्या ठिकाणी जाऊन भेट देऊ शकतो किंवा इंटरनेटवर आपल्या शहरात असलेल्या कोणत्याही एनजीओ विषयी सर्च करू शकतो आणि असे केल्यावर आपल्याला काही पर्याय मिळू शकतात.
1) सभासद व्हा
2) समाविष्ट व्हा
3) इंटर्नशीप घ्या
वरील तिन्ही पर्यायांपैकी आपण आपल्याला हवा तो पर्याय आपण निवडायचा असतो. फक्त ऐवढेच असते की आपण कोणत्या पर्यायाची निवड करतो त्यावर तिथे आपली माहीती विचारली जात असते. जी भरणे आपल्यासाठी अनिवार्य असते.
भारतातील काही प्रमुख एनजीओ :
● प्रथम
● लेप्रा सोसायटी
● सम्मान फाऊंडेशन
● गुंज लिमिटेड
● स्माईल फाऊंडेशन
● सरगम संस्था
● नन्ही कली
एनजीओसाठी निधी कसा मिळवायचा असतो?
1) खाजगी कंपनींना संपर्क करायचा:
आपल्याला वाटले तर आपण काही खासगी छोटयामोठया कंपनींकडुन देखील एनजीओसाठी निधी प्राप्त करू शकतो. त्यासाठी आपण त्यांना काँल करून विचारणा देखील करू शकतो किंवा ईमेल सुदधा करू शकतो. फक्त त्यासाठी आपल्या एनजीओची एक वेबसाईट तयार करणे गरजेचे असते. याच्याने आपल्या एनजीओवरचा विश्वास लोकांमध्ये वाढत जातो.
2) सरकारकडुन निधी प्राप्त करायचा :
जर आपण चालु केलेल्या एनजीओची सरकारी पुस्तकात नाव नोंदणी असेल तर आपण सरकारकडुन सुदधा आपल्या एनजीओसाठी आर्थिक मदत मिळवू शकतो.
3) निधी मिळविण्यासाठी एखादा कार्यक्रम आयोजित करणे :
आपण आपल्या एनजीओला निधी मिळण्यासाठी सामाजिक किंवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करू शकतो.ज्याच्यात आपण आपल्या चांगल्या उपक्रमाची लोकांनाही जाणीव करून देऊ शकतो. त्यांना आर्थिक मदतीचे आवाहन देखील करू शकतो.
एनजीओचे फायदे कोणकोणते असतात?
- एनजीओचे फायदे पाहायला गेले तर आज एनजीओ हे अतिरीक्त कमाईचे एक चांगले साधन बनुन चुकले आहे. शिवाय एनजीओमध्ये इतर नोकरींमध्ये जेवढे वेतन आपल्याला मिळत असते. त्यापेक्षा अधिक वेतन एनजीओत मिळत असते.
- त्याचबरोबर एनजीओसाठी काम करून आपल्याला एक समाजाची सेवा करण्याचा आनंद देखील मिळत असतो.
- काही लोक आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सुदधा एनजीओ चालू करत असतात. कारण एनजीओमध्ये मिळणारा निधी हा आयकर मुक्त असतो. (NGO information in Marathi).
असेच माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी विशेष या पानाला नक्की भेट द्या.