NDRF “एनडीआरएफ” राष्ट्रीय आपत्ती निवारण दल माहिती.

शेअर करा

NDRF म्हणजे काय? What is NDRF?

NDRF full form is National Disaster Response Force. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजे “एनडीआरएफ”. NDRF यंत्रणा मुख्यत्वे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणासाठी कार्य करते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कार्य करते. भूकंप, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्ती वेळी NDRF दलाला पाचारण करण्यात येते.

NDRF information in Marathi

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल स्थापन करण्यात आले. “आपदा सेवा सदैव” हे NDRF चे घोषवाक्य आहे. यानुसार आपत्ती सेवेसाठी सदैव तत्पर असणारी यंत्रणा आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत ही यंत्रणा कार्य करते. एकूण १२ बटालियन NDRF साठी कार्य करतात. SSB, BSF, CRPF, CISF या सारख्या पथकांमधून NDRF जवानांची निवड करण्यात येते. 

देशामध्ये कार्यरत असणाऱ्या १२ बटालियन पुढीलप्रमाणे

१. गुवाहाटी – आसाम 

२. कोलकत्ता – पश्चिम बंगाल 

३. मुंडाली – ओडिसा 

४. अरक्कोणम – तामिळ नाडु 

५. पुणे – महाराष्ट्र 

६. गांधीनगर – गुजरात 

७. गाझियाबाद – उत्तर प्रदेश 

८. भटिंडा – पंजाब 

९. पाटणा – बिहार 

१०. विजयवाडा – आंध्र प्रदेश

११. वाराणसी – उत्तरप्रदेश 

१२. इटानगर – अरुणाचल प्रदेश 

NDRF information in Marathi NDRF full form in Marathi
Source : NDRF website

कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तर त्या ठिकाणी मदत पोचवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असते. National Disaster Management Authority (NDMA) या यंत्रणेच्या आदेशाने एनडीआरएफ कार्यरत असते. आपत्ती उद्भवलेल्या ठिकाणी पोहचून तेथील लोकांना सुखरूप बाहेर काढणे, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोचवणे, परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करणे ह्या सर्व जबाबदाऱ्या एनडीआरएफ पथक पार पाडते.  

NDRF पथकामध्ये अभियंता, डॉक्टर, तंत्रज्ञ, श्वानपथक यांचा देखील समावेश करण्यात येतो. कारण नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती उदभवली तर त्यावेळेस तातडीने जीव वाचण्यासाठी पुरातन करण्याची गरज असते. भूकंप, महापूर, वादळ अशा आपत्तीच्या वेळी एनडीआरएफ पथकांनी अतिशय कौतुकास्पद मदत कार्य केले आहे. (NDRF information in Marathi).


संबंधित लेख

error: Content is protected !!