NCB विषयी माहीती

शेअर करा

NCB विषयी माहीती मराठी

Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे  होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे हे आहे. Narcotics Control Bureau ही संस्था समाजात ज्या अवैध तसेच मादक पदार्थाची जी तस्करी केली जाते. त्या तस्करीला थांबवण्यासाठी गुप्तपणे कार्य करत असते. 

आजच्या लेखातुन आपण ह्याच एन-सी-बी म्हणजेच Narcotics Control Bureau ह्या गुप्त संघटनेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत. 

एन-सी-बी काय असते ? 

एन-सी-बी ही भारतातील एक गुप्तचर संघटना तसेच प्रमुख संस्था आहे. जी भारतातील अवैध पदधतीने केल्या जात असलेल्या मादक पदार्थाच्या तस्करी थांबवण्यासाठी गुप्तपणे कार्य करत असते. 

एन-सी-बी चे पुर्णरूप काय आहे?

एन-सी-बी-चे पुर्णरुप हे (Narcotics Control Bureau) असे आहे. 

एन-सी-बी-ची स्थापना कधी आणि केव्हा करण्यात आली होती?

एन-सी-बी ह्या गुप्तचर संघटनेची स्थापना 17 मार्च 1986 मध्ये नारकोटेक्स ड्रग्ज तसेच सायकोट्राँपिक ड्रग्ज ह्या कलम,कायद्यानुसार 1985 च्या कलम 4(3) च्या अनुसार एन-सी-बी-ची स्थापना ही करण्यात आली होती.

एन-सी-बी-चे मुख्य कार्यालय कुठे आहे?

एन सी बी ह्या भारतातील अवैध मादक पदार्थांविरुदध गुप्तपणे कार्य करत असलेल्या संघटनेचे प्रमुख राष्टीय कार्यालय हे भारतातील नवी दिल्ली येथे स्थापित करण्यात आले आहे. 

एन-सी-बी-चा महासंचालक कोण असतो?

एन सी बी चे महासंचालक हे आय आर एस किंवा आय पी एस अधिकारी हे असतात. 

एन-सी -बी-चे काम काय असते?

एन सी बी ही भारतातील अवैध धंद्याविरोधात काम करणारी एक गुप्तचर संघटना आहे. जिचे महासचालक भारतातील आय आर एस तसेच आय पी एस अधिकारी हे असतात. एन सी बी ची अनेक कार्य असतात जी एन सी बी ला पार पाडावी लागत असतात आणि ती कार्ये पुढीलप्रमाणे आहेत :

1) एन सी बी ह्या गुप्तचर संघटनेचे सर्वात पहिले आणि प्रमुख कार्य असते अवैध धंदे,मादक पदार्थाची तस्करी इत्यादी अशा गुप्त माहीती जमा,गोळा करणे आणि त्या माहीतीला प्रकाशित करणे. 

2) मादक पदार्थांची अवैध मार्गाने केली जाणारी तस्करी थांबवणे तसेच तिचा समुळ अंत करणे. 

3) राज्यामध्ये ज्या काही अवैध मादक पदार्थांचे धंदे विक्री चालु आहे त्याला आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहीमेत मादक पदार्थ परिवर्तन कायद्यानुसार सहकार्य करणे. 

4) प्रत्येक देशाविदेशा मध्ये वेगवेगळया प्रकारच्या स्थापित आंतरराष्टीय संघटनांसोबत आपले संबंध प्रस्थापित करणे. 

नुकतेच काही दिवसांपुर्वी एन सी बी ने बाँलिवुड अभिनेता शाहरूख खान याच्या मुलाला आर्यन याला अटक देखील केली होती. नाइकोटेक्स ड्रग्ज अँण्ड सायकोट्राँपिक सब्सेक्टस अँक्ट च्या सेक्शन 8 सी, 20 बी आणि 27 ते 25 च्या नुसार त्याला एन सीबी कडुन अटक करण्यात आली होती. 

एवढेच नाही तर अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्ये प्रकरणी जेव्हा असे समोर उघडकीस आले की आत्महत्येपुर्वी सुशांतला ड्रग्ज देण्यात आले होते तेव्हा सुदधा दिर्घकाळ एन सी बी कडुन याची कसुन चौकशी करण्यात आली होती. तेव्हा खुप जणांना याबाबद अटक देखील करण्यात आली. 

एन-सी-बी च्या अंतर्गत कशाकशाचा समावेश होतो?

14 नोव्हेंबर 1985 मध्ये एक कायदा लागु करण्यात आला होता. त्या कायद्याचे नाव आहे एनडीपीएस अँक्ट. ह्या कायद्यानुसार केंद्रीय अधिकाराची निर्मिती करण्यात आली होती. जो केंद्र सरकारच्या अंतर्गत येत असतो. ह्या कायद्याच्या अंतर्गत मादक पदार्थां विषयी कसुन चौकशी करत असलेली गुप्त संघटना एन सी बी ही येत असते. जी केंद्र सरकारच्या अंतर्गत येते. एन सी बी ह्या संघटनेचे प्रमुख उददिष्ट मादक पदार्थांची तस्करी थांबवणे तसेच त्याला आळा घालुन त्याचा समुळ अंत करणे हे आहे. 

मागील काही दिवसांत बाँलीवुड तसेच सिने अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या अनेक नट तसेच नटींची नावे वेगवेगळया मादक पदार्थांचे सेवन तसेच तस्करी करण्याच्या प्रकरणात समोर आलेले आपणास दिसुन येते. पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही एन सीबी ही गुप्तचर संघटना फक्त मोठमोठया दिग्दज अभिनेते अभिनेत्री सेलिब्रिटीजच्या केस हाताळण्याचेच काम करते. 

एन-सी-बीने स्पष्टपणे सांगितले आहे की एनसीबी दिग्दज आणि सर्वसामान्य व्यक्ती असा भेदभाव अजिबात करत नाही. एन सी बी सर्वावर समान कारवाई करण्याचे काम करत असते. याचसाठी त्यांना जगात राष्टीय तसेच आंतरराष्टीय पातळीवर मादक पदार्थांच्या प्रकरणात कुठेही आणि कधीही आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार देखील बहाल करण्यात आला आहे. 

याचसाठी एन सी बी ही संघटना आंतरराष्टीय स्तरावर सुदधा मादक पदार्थांच्या तस्करी विरुदध लढा देण्यासाठी अशा एजंसीला हायर करते जी मादक पदार्थांच्या तस्करी विरुदध कार्य करते. 

मादक पदार्थांची तस्करी तसेच सेवन करण्याच्या प्रकरणात अटक केल्यानंतर एन सी बी गुन्हेगाराला काय आणि कोणती शिक्षा द्यावी हे कसे ठरवत असते?

मादक पदार्थांचे सेवन तसेच तस्करी करण्याच्या प्रकरणात गुन्हेगाराला किती? आणि कोणती शिक्षा द्यावी? हे एन-सी-बी कडुन ठरवले जात असते. तो किती प्रमाणात मादक पदार्थांचे सेवन तसेच तस्करी करतो यावरून म्हणजेच काँटिटी वरून. 

म्हणजेच समजा एखादी व्यक्ती कमी प्रमाणात मादक पदार्थांचे सेवन तसेच तस्करी करत असेल त्याला सहा महिने कारावासात ठेवले जात असते. तसेच त्याच्याकडुन आठ ते दहा हजारापर्यतचा दंड देखील वसुल करण्यात येत असतो. समजा एखादी व्यक्ती विपुल प्रमाणात मादक पदार्थांचे सेवन तसेच तस्करी करत असेल तर त्याला दहा ते पंधरा वर्ष कोठडीत ठेवण्यात येत असते. तसेच त्याच्याकडुन एक ते दोन लाख वसुल देखील केले जात असतात. एखादी व्यक्ती मादक पदार्थांचे सेवन हे खुप जास्त तसेच कमी न करता मध्यम प्रमाणात जर करत असेल तर त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि एक लाखाचा दंड देखील ठोठावला जात असतो. 

एन-सी-बी आँफिसर बनण्यासाठी कोणती योग्यता असावी लागते?

एन-सी-बी आँफिसर बनण्यासाठी आपल्याला काही योग्यता तसेच पात्रतांची पुर्ती करणे अत्यंत आवश्यक असते. आणि ती योग्यता पुढीलप्रमाणे आहे:

1) एन-सी-बी आँफिसर बनण्यासाठी आपण कोणत्याही संस्थेतुन पदवी कुठल्याही क्षेत्रात पदवी ग्रहण करणे अत्यंत आवश्यक असते.

2) एन सी बी आँफिसर बनण्यासाठी आपले वय हे 21 ते 27 च्या दरम्यान तसेच आतच असायला हवे. 

एन -सी-बी आँफिसर होण्याची प्रक्रिया काय असते?

एन-सी-बी आँफिसर बनण्यासाठी आपल्याला पुढील महत्वपुर्ण प्रक्रियेला सामोरे जावे लागत असते. 

1) एन-सी-बी आँफिसर बनण्यासाठी आपल्याला एन-सी-बी च्या संकेत स्थळावर जाऊन आँनलाईन अर्ज करण्यासाठी फाँर्म भरावा लागतो.

2) एन सी बी मध्ये जर आपल्याला सब इन्स्पेक्टर हे पद प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी आधी आपल्याला सी-जी-एल एस एससी ह्या परिक्षांना सामोरे जाऊन त्या आधी उत्तीर्ण व्हाव्या लागतात. लक्षात असु द्यावे की ह्या परिक्षा आपल्याला चार टप्प्यात द्याव्या लागत असतात.

error: Content is protected !!