Motorola One Fusion Plus हा अमेरिकन स्मार्टफोन आहे चिनी फोन पेक्षा भारी

शेअर करा

Motorola One Fusion Plus

नवीन फोन घेणार असाल तर चिनी फोन पेक्षा जबरदस्त फीचर्स असलेला Motorola One Fusion Plus हा स्मार्टफोन अगदी किफायतशीर आहे. तुम्हाला असे वाटत असेल की चिनी फोन घेण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्याआधी तुम्ही ह्या फोन चे फीचर्स बघून घ्या.

64MP कॅमेरा 

Motorola One Fusion Plus

ह्या फोन मध्ये सध्या ट्रेंडिंग असलेल्या quad कॅमेरा सेटअप आहे. ज्या मध्ये 64MP चा मेन कॅमेरा, इन-डेप्थ सेन्सर, वाइड अँगल कॅमेरा याचा समावेश होतो. म्हणजे तुम्ही अगदी कमी जागेत जवळून इमेज घेत असाल तर वाइड अँगल ने तुम्ही घेऊ शकता. इन-डेप्थ सेन्सर तुम्हाला पोट्रेट मोड मध्ये उत्तम इमेज घेण्यास मदत करेन. या मध्ये समोरील (selfie camera) कॅमेरा 16MP चा आहे, जो की pop-up कॅमेरा आहे. pop-up कॅमेरा पण सध्या ट्रेंडिंग आहे. 

5000MAH बॅटरी

Motorola One Fusion Plus या फोन मध्ये आपल्याला जबरदस्त बॅटरी मिळते, ज्यामुळे २ दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो. तसेच गेमिंग साठी हे उपयुक्त ठरते. सोबतच 18W Turbo-charger मिळते आणि आपला फोन जवळपास दिड तासामध्ये पूर्ण चार्ज होतो. 

Snapdragon 730G प्रोसेसर 

Motorola One Fusion Plus

बॅटरी प्रमाणेच यामध्ये असणारे प्रोसेसर देखील लेटेस्ट आहे. या रेंज मध्ये असणाऱ्या सर्व स्मार्टफोन्स मध्ये असणाऱ्या प्रोसेसर पेक्षा Motorala one fusion plus मध्ये लेटेस्ट Snapdragan 730G प्रोसेसर आहे. Hi- Quality games साठी हा प्रोसेसर आणि बॅटरी हे समीकरण अगदी योग्य आहे.

6GB रॅम आणि 128GB मेमरी

प्रोसेसर आणि बॅटरी सोबत यामध्ये दिला आहे 6GB RAM आणि तब्बल 128GB मेमरी. विशेष बाब म्हणजे याची मेमरी क्षमता तब्बल 1TB पर्यंत वाढवता येते. हे फिचर इतर कोणत्याच फोन मध्ये आपल्याला मिळणार नाही. 6GB रॅम असल्याने फोन अगदी स्मूथ चालतो.

Motorola One Fusion Plus

 

किंमत Rs.17,499

motorola one fusion plus price. जर आपण चिनी किंवा इतर फोन कंपन्यांसोबत याची तुलना केली तर या range मधल्या फोन्स मध्ये सर्वात कमी किंमत आहे. बाकीच्या फोन पेक्षा जवळपास दिड हजार रुपयांनी हा फोन स्वस्त आहे. Motorolla One Fusion Plus हा फोन दोन कलर्स मध्ये उपलब्ध आहे 1.Twilight Blue 2.Moonlight White

हा फोन आपल्याला Flipkart या शॉपिंग साईट वरती विकत घेता येतो. दुसऱ्या कुठल्याच साईट वरती हा फोन भेटणार नाही. Motorola हा एक अमेरिकन ब्रँड आहे. सध्या भारत चीन मध्ये उडालेल्या ठिणगीमुळे भारतात चिनी वस्तूवर बहिष्कार टाकला जात आहे. त्यामुळे Motorola हा चिनी फोन्स ला एक उत्तम पर्याय आहे.


वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

 

Gadgets for workfrom home

error: Content is protected !!