मातीची भांडी मराठी माहिती | Matichi bhandi information in Marathi

शेअर करा

Matichi bhandi information in Marathi:

Matichi bhandi information in Marathi | बदलत्या जीवनशैली मूळे आपली प्रतिकार शक्ती कमी होत आहे. भाजीपाला आणि धान्य लागवडी साठी वापरल्या जाणाऱ्या खात आणि कीटकनाशका मुळे अनेक आजार होत आहेत. तसेच खाण्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये भेसळ होत आहे आणि शारीरिक आजार वाढत आहेत.

आजकाल सर्वांच्या किचन मध्ये नॉनस्टिक भांड्यांचा सर्रास वापर होतोय, जे आपल्या तब्येतीसाठी अयोग्य आहेत. एका विशिष्ट तापमान च्या वर तापले गेले तर या भांड्यातून विषारी वायू तयार होऊन अन्न पदार्थात मिसळतात. अशा अन्नाचा सेवना नंतर हृदय संबंधी अनेक आजार उद्भवतात. माती पासून बनवलेली भांडी यावर उत्तम पर्याय आहेत. मातीची भांडी मराठी माहिती:

                                 

मातीची भांडी मराठी माहिती । भारतात अनेक वर्षांपासून मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो. मातीचा चिखल बनवून त्याला आकार दिला  जातो.याला व्यवस्थित सुकवल्यानंतर आगी मध्ये भाजले जाते. काळी माती आणि लाल मातीचा वापर करून भारतात भांडी बनवली जातात. वेगवेगळया ठिकाणावर आणि उपलब्धतेनुसार काळी माती आणि लाल माती वापरली जाते. 

ऍल्युमिनिअम, नॉनस्टिक (teflon) भांडी या पासून अनेक आजार होतात. या भांड्यांचा वापर जर जास्त कालावधी साठी केला तर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. सतत या भांड्यामध्ये स्वयंपाक केला तर आपल्या हृदयामध्ये आणि रक्तामध्ये अनेक विषारी कण मिसळतात आणि हळू हळू आपल्या अवयवांवर परिणाम करतात. आपल्या घरी असणारे ऍल्युमिनिअम चे भांडे पहा, नवीन आणल्यानंतर असलेला रंग आणि आता झालेला रंग यावरून आपल्याला याची दाहकता समजेल.  

Matichi Bhandi information in Marathi मातीची भांडी मराठी माहिती
मातीची भांडी मराठी माहिती | Matichi Bhandi information in Marathi

मातीची भांडी वापरण्याचे फायदे:matichi bhandi information in marathi

  • इतर धातूच्या भांड्या पेक्षा मातीची भांडी वजनास जड असतात आणि मजबूत देखील असतात. माती पासून बनवलेली असल्याने याला जास्तीत जास्त तापमानावर तापवले तरीही याचा काही तोटा होत नाही.
  • मातीच्या भांड्यामध्ये शिजवलेल्या अन्नामध्ये तेलाचे प्रमाण कमी शिल्लक राहते, कारण हे जास्तीचे तेल शोषतात आणि जितके गरजेचे आहे तितकेच तेल अन्न पदार्थ साठी वापरले जाते.
  • लाल माती आणि काळ्यामातीपासून बनवल्या गेलेल्या सर्व प्रकारचा भांड्यामध्ये स्वयंपाक शिजवल्याने आपल्या शरीराला कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि सल्फर मिळते.
  • या भांड्यांची  किंमत देखील परवडणारी आहे. बाजारात फार कमी किमती मध्ये आणि सहज उपलब्ध आहेत. स्टील अथवा नॉनस्टिक भांड्याच्या अर्ध्याच्या अर्ध्या किमतीत मातीची भांडी मिळतात.
  • मातीच्या भांडयामधे अन्न हळू हळू शिजले जाते त्यामुळे अन्नातील पौष्टिकता जशास तशी राहते. तसेच एक नैसर्गिक चव प्राप्त होते.
  • माती पासून फक्त हंडी आणि कढई नाही, तर ग्लास, बाटली, तवा हे सर्व देखील बनवले जाते. जर आधीच्या भांड्याऐवजी हे वापरले तर आपल्या किचनला एक नवीन पारंपरिक लुक देखील येईल.
  • याला बनवण्यात निसर्गाला कसलाच अपाय होत नाही, कुठल्याच नैसर्गिक संपत्तीचा ह्रास होत नाही. मातीची भांडी पर्यावरण पूरक आहेत आणि याची विल्हेवाट देखील सोप्या पद्धतीने लावली जाऊ शकते.

     

मातीची भांडी वापरण्याचे फायदे अनेक आहेत, त्यामुळे या एका छोट्या बदलामुळे आपले आयुर्मान चांगले होईल आणि तब्येत देखील उत्तम राहील. तसेच निसर्गाचा होणार ह्रास हा देखील कमी करता येईल. उत्तम आरोग्य आणि चांगली प्रतिकार शक्ती आजच्या प्रदूषण ग्रस्त वातावरणात गरजेची आहे. बदल हा नेहमी प्रगतीचे लक्षण असतो.

या लेखाबद्दल आपला अभिप्राय आणि प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षात नोंदवा.


error: Content is protected !!