किवर्ड म्हणजे काय? Keywords meaning in Marathi?

शेअर करा

Keywords म्हणजे काय? keywords meaning in Marathi?

Keywords meaning in Marathi | कोणत्याही website साठी त्यात असणारे keywords म्हणजेच वाक्य/शब्द महत्वाचे असतात. आपण Google वरती वाक्य किंवा शब्द सर्च केल्यानंतर जो result मिळतो, त्या मध्ये त्याच वेबसाईट्स असतील ज्यामध्ये ते keywords आहेत. ज्या विषया संबंधी वेबसाईट अथवा ब्लॉग असेल, त्याविषयी चे शब्द अथवा वाक्य हे लक्ष (target) केले जातात. जेणेकरून गूगल वरती शोध घेणाऱ्या व्यक्तीस अपेक्षित आणि नेमकी माहिती प्राप्त होईल.

वाक्य आणि शब्द हे SEO साठी महत्वाचे असतात. SEO म्हणजे Search Engine Optimization. आपली वेबसाईट ही गुगल सर्च रिझल्ट च्या पहिल्या पेज वर असावी या साठी सर्वच प्रयत्न करत असतात. त्यासाठी SEO करणे महत्वाचे असते. या मध्ये साईट संबंधित मुख्य वाक्य, शीर्षक, प्रतिमा (images), keywords, प्रस्तावना महत्वाच्या गोष्टी असतात, आपली साईट सर्च रिझल्ट मध्ये एक छोटी प्रस्तावना म्हणून दिसते आणि वापरकर्ता या वर click करतो आणि आपल्या साईट ला भेट देतो. 

Keyword Stuffing

निवडलेला किवर्ड जास्तीत जास्त वेळेस येण्यासाठी तो कीवर्ड ब्लॉगमध्ये घुसवला जातो किंवा हाईड केला जातो, त्यावेळेस keyword stuffing असे मानले जाते. गुगल अशा ब्लॉग ला रँक करत नाही, असे करणे गुगल च्या नियमाच्या विरुद्ध ठरते. काही वेळेस असा ब्लॉग गुगल कडून सर्च मधून काढून टाकला जातो. त्यामुळे शब्द आणि परिच्छेद मध्ये फक्त किवर्ड न टाकता त्याला अर्थ असणे देखील महत्वाचे आहे.

किवर्डचे प्रकार, keyword types :

प्रामुख्याने दोन मुख्य प्रकार आहेत, Short-tail keywords आणि Long-tail keywords. शॉर्टटेल म्हणजे एक ते दोन शब्द आणि लॉंगटेल म्हणजे तीन ते पाच शब्द. कोणत्याही वेबसाईटला गुगल वरती रँक करण्यासाठी keywords targeting हे अत्यतंत महत्वाचे असते. कुठले शब्द/वाक्य गुगल वरती सर्च केले जातात या वर भर दिला जातो. या साठी नेहमी long-tail keywords वापरले जातात.

जर आपण ब्लॉगिंग क्षेत्रात नवीन आहेत आणि आपली वेबसाईट देखील नवीन आहे तर सुरुवातीला आपण Long-tail keywords आणि low competition keywords चा वापर करावा. जेणेकरून लवकर रँक करता येईल. आपल्या ब्लॉग मध्ये निवडलेला किवर्ड पाच ते सात वेळेस आला पाहिजे.

हेही वाचा :

उदाहरणार्थ गुगल वरती आपण सर्च केले “keywords meaning in marathi” तर, जो शोध आपल्याला मिळेल त्यात keyword आणि Marathi हे मुख्य शब्द आहेत. मात्र जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी लोंगटेल किवर्डस (keywords meaning in marathi) चा वापर केला आहे. जेणेकरून त्या शब्दासोबत इतर शोध सुद्धा समाविष्ट होतील. आपण Marathi Keywords सुद्धा वापरू शकता. 

keywords meaning in marathi
keywords meaning in marathi

मोफत Keyword Research Tools

कीवर्ड रिसर्च करण्यासाठी काही निवडक टूल्स आहेत ज्यांचा मोफत वापर काटा येतो. त्या पैकी Wordstream, Serpstart, Google Keyword planner हे तीन मुख्य आहेत. तसेच आपल्याला सखोल माहिती हवी असल्यास आपण प्रीमियम टूल निवडू शकता. या मध्ये SEMrush, Ubbersuggest, Ahrefs हे टूल्स उपलब्ध आहेत. जर आपण नवीन ब्लॉगिंग करत असाल तर मोफत टूल चा वापर करा. हळू हळू आपल्याला ज्ञान प्राप्त होईल नंतर आपण प्रीमियम टूल घेऊ शकता.

जर तुम्ही वर्डप्रेस चा वापर करत असाल तर yoast SEO हे प्लगिन उत्तम आहे. wordpress वेबसाईट तयार करणे सोपे असू शकते, त्यात ब्लॉग अथवा पोस्ट लिहिणे हे देखील जास्त अवघड नाही: परंतु SEO, रँकिंग, keywords, कन्टेन्ट, इमेजेस, इंटर्नल लिंक्स, एक्सटर्नल लिंक्स ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. यांच्या शिवाय आपल्या वेबसाईटला जास्त भेटी देणारे लोक मिळणार नाहीत आणि जास्त प्रसार देखील होणार नाही. त्यामुळे keywords आणि SEO या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.


वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

 

error: Content is protected !!