Influenza म्हणजे काय? Influenza meaning in Marathi
Influenza हा एक श्वसनाशी संबंधित विकार आहे. ज्याची सुरूवात साधारणतः तापाने, सर्दी, खोकल्याने होत असते. Influenza virus हा आपल्या शरीरामध्ये आपल्या नाक, डोळे तसेच मुखाद्वारे प्रवेश करतो. हा एक असा आजार आहे जो ज्या व्यक्तीला असतो तो व्यक्ती जर शिंकला किंवा खोकलला आणि त्याचवेळी त्याच्या संपर्कात कोणी आले तर त्याला सुदधा हा आजार होण्याची दाट शक्यता असते. त्याच्या मार्फत हाच संसर्ग इतरत्र देखील पसरू शकतो. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती ही अतिशय कमी असते. त्याला हा आजार होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते.
आज आपण ह्याच आजाराविषयी जाणुन घेणार आहोत की Influenza म्हणजे नेमके काय असते? Influenza होण्याची कारणे कोणकोणती असतात? Influenza ची लक्षणे कोणकोणती असतात? Influenza वर केली जाणारी तसासणी तसेच उपचार कोणकोणते आहेत? इत्यादी बाबींविषयी आपण आजच्या लेखातुन सविस्तर जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. (Influenza meaning in Marathi).
Influenza होण्याची कारणे कोणती?
1) लहान किंवा वयस्कर व्यक्ती :
Influenza होण्याची सगळयात जास्त शक्यता लहान मुलांना तसेच वयस्कर व्यक्तींना असते. कारण लहान मुलांमध्ये तसेच वयस्कर वृदध व्यक्तींमध्ये कोणत्याही रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता ही खुपच कमी असते. म्हणुन असा आजारा होण्यापासुन लहान मुलांची तसेच वृदध वयस्कर व्यक्तींची आपण जास्त काळजी घ्यायला हवी.
2) शरीरामध्ये कमी रोगप्रतिकारक शक्ती असणे:
Influenza हा एक असा आजार आहे जो शरीरात कमी प्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना होत असतो. अशा व्यक्तींना हा आजार लवकर होत असतो. कारण त्यांच्यात कोणत्याही रोगाचा प्रतिकार करण्यासाठी जेवढी क्षमता तसेच शक्ती त्यांच्या शरीरात असायला हवी तेवढी क्षमता अजिबात उपलब्ध नसते. म्हणुन रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या व्यक्तींना हा व्हायरल आजार लगेच होतो.
3) किंवा आधीपासुन एखाद्या आजाराने त्रस्त असणे:
जर एखादी व्यक्ती आधीपासुनच मधुमेह, रक्तदाब इत्यादी सारख्या आजाराने पिडीत असेल तर त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. कारण त्यांना हा व्हायरल आजार जडण्याची दाट शक्यता असते.म्हणुन अशा व्यक्तींनी आपल्या प्रकृतीची गंभीरपणे काळजी घ्यायला हवी.
4) वजन खुप जास्त असल्यामुळे :
अशा व्यक्तींना देखील influenza होण्याची शक्यता असते ज्यांचे वजन खुपच जास्त प्रमाणात असते. म्हणुन अतिवजन असलेल्या व्यक्तींनी सुदधा विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांना देखील ह्या आजाराची लागण होऊ शकते.
5) एखाद्या स्त्रीचे प्रेगनेंट असणे:
एखादी महिला जर गर्भवती आहे तर तिला सुदधा ह्या व्हायरल आजारापासुन सावध राहायला हवे. तिने विशेषकरून स्वतःची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून तिच्या तसेच तिच्या बाळाच्या जीवाला काही धोका पोहचणार नाही.

Influenza होण्याची लक्षणे कोणकोणती असतात?
1) अंगात ताप येणे :
साधारणपणे जर आपल्याला ताप आला तर गोळया औषधे घेतल्यानंतर तो तीन चार दिवसात उतरून जात असतो. पण influenza मुळे ताप आल्यावर तो कमीत कमी १० ते १५ दिवस राहत असतो. ज्याकडे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकते.
2) कोरडा खोकला येणे:
Influenza virus चे दुसरे लक्षण आहे कोरडा खोकला येणे. जर कोणा व्यक्तीला सतत कोरडा खोकला येत असेल तर त्याला influenza झाल्याची शक्यता असु शकते. अशा व्यक्तींनी आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यायला हवी आणि त्वरीत डाँक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
3) डोके दुखणे:
साधारणत influenza ची सुरूवात ही डोकेदुखी ह्या लक्षणापासुनच होत असते. अशा परिस्थितीमध्ये आपण त्वरीत एखाद्या तज्ञ डाँक्टरला भेटुन आपल्या आरोग्याची तपासणी करायला हवी.
4) शरीरात अशक्तपणा जाणवणे:
Influenza अजुन एक लक्षण म्हणजे शरीरात अशक्तपणा निर्माण होणे. अशावेळी आपले शरीर एकदम दुर्बल झाल्यासारखे आपल्याला जाणवत असते. असे वाटते शरीरामध्ये काही उर्जाच शिलल्क राहिलेली नाही. म्हणुन अशी काही लक्षणे आपल्याला आपल्या शरीरात दिसुन येत असतील तर आपण क्षणाचाही विलंब न करता डाँक्टरकडे आपली तब्येत दाखवायला हवी आणि वेळ असताच ह्या आजाराला प्रतिबंध घालायला हवा.
5) गळयात खरखर होणे:
जर एखाद्या व्यक्तीला दिर्घकाळापासुन घशाचा त्रास जाणवत असेल तर हे influenza चे लक्षण असु शकते. अशावेळी त्या व्यक्तींने वैदयकीय चाचणी तसेच तपासणी करणे फार आवश्यक असते.
Influenza वर करावयाची तपासणी आणि उपचार
1) influenza वर करावयाचे घरगुती उपाय:
Influenza वर आपण घरगुती उपाय देखील करू शकतो.ह्यात आपण कमी प्रमाणात पाणी पिणे तसेच साधे हलके फुलके अन्न खाणे जसे की दाळ खिचडी इत्यादी असे घरगुती स्वरुपाचे उपचार देखील करू शकतो.
2) औषधोपचार करणे:
Influenza बरा होण्यासाठी आपण औषधोपचार पण करू शकतो. कारण औषधोपचार केल्याने influenza लवकरात लवकर बरा होण्यास मदत होत असते. म्हणुन नियमित औषधोपचार हा देखील एक उत्तम मार्ग आहे Influenza बरा करण्याचा.
3) नाकाचे औषध घेणे:
Influenza होण्याचे प्रमुख कारण आपल्या नाका-तोंडात तसेच मुखात influenza virus चा प्रवेश होणे हे मुख्य कारण असते. म्हणजेच influenza होण्याचे कारण नाकासंबंधीत श्वसनासंबंधित समस्या देखील असु शकते. म्हणुन influenza आजार बरा होण्यासाठी नाकाचे औषध पण घेता येते.
4) जास्तीत जास्त विश्रांती घेणे :
Influenza झाल्यावर जास्तीत जास्त प्रमाणात आराम करण्याचा सल्ला डाँक्टर आपल्याला देत असतात कारण याने आपल्या शारीरीक उर्जेची बचत होते. परिणामस्वरूप आपण लवकर ह्या आजारातुन बरे होत असतो. म्हणुन अशा आजाराच्या काळात आपण जास्तीत जास्त विश्रांती घेणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक असते.
5) वेदनानाशक औषधांचे सेवन करणे :
Influenza झाल्यावर आपल्या पुर्ण शरीरात वेदना होत असतात. ज्याच्याने आपल्याला खुप त्रास तसेच पीडा देखील होत असते. याचसाठी डाँक्टर आपल्याला वेदना थांबविण्यासाठी काही औषधे घेण्याचा सल्ला देखील देतात. जेणेकरून आपला त्रास तसेच वेदना काही प्रमाणात का होईना कमी होतील. म्हणुन influenza झाल्यावर वेदनानाशक औषधांचे उपचार करणे देखील फायदेशीर ठरते. (Influenza meaning in Marathi).
संबधित लेख