पिंटरेस्ट काय आहे ? पिंटरेस्ट चा वापर कसा करतात? How to Use Pinterest in Marathi?

शेअर करा

Pinterest म्हणजे काय?

आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन आहे आणि माहिती साठी त्याचा पुरेपूर वापर केला जात आहे. सोशल मीडिया, बातम्या, विडिओ या गोष्टी सर्वाधिक पहिल्या जातात. सोशल मीडिया पैकी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर हे सर्वश्रुत आहेत. त्यात अजून एका माध्यमाचा वापर वाढत आहे, ते म्हणजे Pinterest. ज्याप्रकारे आपण गुगल सर्च इंजिन चा माहिती साठी वापर करतो त्याच प्रकारे पिंटरेस्ट हा देखील एक माहिती स्रोत आहे. 

गुगल वर कुठलीही माहिती शोधल्यावर वेब, इमेजेस, विडिओ असे विविध शोध पर्याय मिळतात, तसेच Pinterest या मध्ये संबंधित विषयाचे छायाचित्र (Image) दिसतील. या चित्रांद्वारे वेबसाईट जोडल्या जातात ज्यात शोध-संबधी माहिती दिलेली असते. उदा. जर पिंटरेस्ट वर आपण “garden development” हा शोध घेतला तर आपल्याला अनेक छायाचित्र दिसतील ज्यावर संक्षिप्त माहिती दिलेली असेल आणि त्यावर क्लीक केल्यानंतर त्या वेबसाईट वर सविस्तर माहिती असेल.

गुगल वर एखादी माहिती शोधल्यानंतर अनेक वेळा सर्वात पहिला शोध Pinterest चा येतो. कारण पिंटरेस्ट मध्ये जास्त प्रमाणात माहिती स्रोत उपलब्ध आहेत. अनेक दिनविशेष अथवा एखाद्या व्यक्ती विषयक प्रतिमेचा शोध घेतला तर पिंटरेस्ट ह्या संकेतस्थाळावरील शोध दिसतो. 

How to use Pinterest in Marathi
How to use Pinterest in Marathi

पिंटरेस्टचा वापर कसा करावा ? How to use Pinterest in Marathi?

जसे इतर सोशल मीडिया चा वापर आपण करतो, तसेच हे देखील तेवढेच सोपे आहे. फरक इतकाच आहे, बाकी माध्यमावर आपला अमूल्य वेळ वाया जातो. परंतु पिंटरेस्ट वर माहितीचा खजाना उपलब्ध आहे, त्यामुळे आपला वेळ वाया जाणार नाही आणि याउलट आपला फायदाच होईल. 

ज्याप्रकारे माहिती घेता येते त्या प्रकरे माहिती देता देखील येते. म्हणजेच आपले प्रोफाइल बनवून त्यावर विविध माहिती टाकता येते. एखाद्या विषयासंबंधी तज्ज्ञ असाल तर ती माहिती इतरांना देऊ शकता. अर्थात यामध्ये कुठले पैसे मिळणार नाहीत. जर आपण वस्तू/सेवा विक्री करत असाल तर पिंटरेस्ट चा पुरेपूर वापर करून घेता येतो आणि त्याचा फायदा देखील होतो.

एखादी वस्तू किंवा सेवा विकण्यासाठी पिंटरेस्ट सारखा चांगला पर्याय नाही. विना खर्च आपल्या वस्तू व सेवांची माहिती देता येते आणि थेट ग्राहकापर्यंत पोहचता येते. या साठी आपल्याला Business account वर खाते उघडावे लागेल. तेथे सर्व माहिती भरल्यानंतर आपली वेबसाईट देखील जोडू शकता. या साठी देखील कसलाच खर्च नाही. 

अशाप्रकारे आपण पिंटरेस्ट चा योग्य वापर करू शकता. फक्त माहितीचा स्रोत म्हणून याचा वापर केला तर वेळेचा अपव्यय होणार नाही. पिंटरेस्ट इतर सोशल मीडिया माध्यमांपेक्षा वेगळे आहे. पिंटरेस्टचा वापर कसा करावा याबद्दल माहिती आपल्याला कशी वाटली ते खाली कमेंट मध्ये नोंदवा. [How to Use Pinterest in Marathi]


 

Comments are closed.

error: Content is protected !!