“गुगल मीट” चा वापर कसा करावा? How to use google meet in marathi?

शेअर करा

How to use google meet: 

How to use google meet in Marathi | अलीकडच्या काळात झालेल्या तंत्रज्ञान विकासामुळे, सर्वच गोष्टी ऑनलाइन इंटरनेटच्या माध्यमातून होत आहेत. त्यात मुलांच्या शाळा, खरेदी-विक्री, व्यवहार, कार्यालयीन काम या सर्व गोष्टी आता जवळपास ऑनलाइन झाल्या आहेत. घरून काम करणाऱ्या लोकांसाठी नवनवीन टूल्स बद्दल माहिती घेणे आणि त्यांचा वापर कसा करावा हे शिकणे फार गरजेचे झाले आहे. अश्या टूल पैकी एक टूल म्हणजे “Google Meet“.

Google Meet Tool

ई-मेल साठी जवळपास सगळेच जण gmail चा वापर करतात. Gmail account मध्येच “Meet” चा पर्याय आहे. या आधी तुम्ही hangout चा वापर केला असेल. ज्या मध्ये कॉल आणि चॅट हे दोन्ही पर्याय उपलब्ध होते. त्याच प्रमाणे खास Meetings आणि Video conference साठी गुगल ने  G-meet हे टूल लॉन्च केले आहे. गुगलने या टूल साठी वेगळा प्लॅटफॉर्म तयार न करता gmail मधेच याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 

Google Meet चा वापर कसा करावा?

Gmail मध्ये लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूस असलेल्या पर्यायांमधे सर्वात शेवटी hangout च्या वर “Meet” असा पर्याय दिसेल. त्यात दोन ऑप्शन आहेत. जर आपल्याला नवीन मीटिंग/कॉल सुरु करायचा असेल तर Start a meeting हा पर्याय निवडावा आणि एखाद्या मिटिंग ला जोडणार असाल तर Join a meeting हा पर्याय निवडा.

Start a meeting वर क्लिक केल्यानंतर “Join Now” वर क्लिक करा, स्क्रीन वरती दिसणारी लिंक मिटिंग ची एक विशिष्ठ लिंक असेल, जी इतर सहभागी होणाऱ्या सभासदांना पाठवली जाऊ शकते. तसेच त्या खालील “add members” वर क्लिक केल्यानंतर email id टाकून आपण तिथूनच सभासदना आमंत्रण पाठवू शकतो. 

How to use google meet in marathi

त्याच प्रमाणे Join a meeting या वर क्लिक करून मीटिंगची लिंक टाकून थेट जोडले जाऊ शकता. मीटिंग मध्ये जोडले गेल्यानंतर आपल्याला इतर पर्याय दिसतील ज्यामध्ये कॅमेरा, माईक, प्रेझेंट, मीटिंग डिटेल्स हे सर्व पर्याय दिसतील, गरजेनुसार याचा वापर करू शकता.

How to use google meet in marathi
How to use google meet in marathi

how to use google meet

वैशिष्ट्ये

मोफत टूल 

ज्या प्रमाणे Gmail सेवा मोफत आहे त्याच प्रमाणे G-Meet टूल देखील फ्री आहे. आपण या मध्ये जास्तीत जास्त १०० व्यक्ती सोबत एकदाच कॉल/मिटिंग घेऊ शकतो, ज्याची मर्यादा एक तास इतकी आहे.एक तासानंतर सुद्धा ही सेवा मोफत असेल फक्त आपल्याला परत एकदा मिटिंग सुरु करावी लागेल. जर आपल्याला आंतरराष्ट्रीय डायल-इन नंबर, मीटिंग रेकॉर्डिंग, थेट प्रवाह आणि प्रशासकीय नियंत्रणे ही वैशिष्ट्ये हवे असतील तर याचे पैसे अधिक द्यावे लागतील.

कधीही आणि कुठेही 

आपण G-Meet चा वापर कधीही आणि कुठेही करू शकतो. यामध्ये लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईल या सर्व devices वरून जोडले जाऊ शकतो. जेणेकरून आपण कुठेही कॉल्स/मिटींग्स साठी उपस्थित राहू शकतो. जी वैशिष्ट्य आपण लॅपटॉप वर वापरू शकतो तीच मोबाईल वर सुद्धा उपलब्ध आहेत.

स्क्रीन शेअर 

या मध्ये विडिओ चा पर्याय आहेच त्याच प्रमाणे वापरकर्ता आपली स्क्रीन शेअर करू शकतो, म्हणजेच मिटिंग मध्ये जोडल्या गेलेल्या इतर वापरकर्त्यांना दिसेल. कार्यालयात समोरासमोर प्रेझेंटेशन देता येईल परंतु घरातून काम करत असताना आपण प्रेसेंट करू शकत नाही, या साठी G-meet चा “Present” हा पर्याय उत्तम ठरतो.

वर्क फ्रॉम होम करणारे सर्व लोक आधी zoom या टूल चा वापर करत होते. परंतु गुगल ने Google Meet टूल आणल्यानंतर झूम चा वापर कमी होऊ लागला. त्याला आणखी एक कारण म्हणजे zoom हे टूल चिनी असून भारतामध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जातोय. How to use google meet in Marathi.

वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

 

error: Content is protected !!