Google Analytics बद्दल माहिती

शेअर करा

Google Analytics बद्दल माहिती

ब्लॉग किंवा वेबसाईट बनवल्या नंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे “Traffic”. जास्तीत जास्त visitors आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जितक्या जास्त भेटी आपल्या साईट ला येतील तितका जास्त फायदा होईल, मग ती वेबसाईट कुठल्याही प्रकारची असली तरी. जसे ब्लॉग, अफिलिएट वेबसाईट, व्यवसाय संबधी वेबसाईट. या साठी प्रत्येकजण वेगवेगळ्या युक्त्या वापरतो, त्यात SEO, Social Media, Backlinks याचा समावेश होतो. तसेच Google Search Console च्या मदतीने वेबसाईट रँक करण्यास मदत होते.

वरील सर्व टूल्स हे महत्वाचे आहेतच, पण त्यासोबत Google Analytics हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या वेबसाईट वर येणाऱ्या visitors बद्दल सर्व माहिती या टूल वर मिळते. ठिकाण, वेळ, डिवाइस, लिंक, क्लिक, आय पी, संदर्भ इत्यादी माहिती उपलब्ध होते. तसेच किती लोक अत्ता साईट वर आहेत, कुठल्या पेज वर आहेत हेही पाहता येते. एक पेक्षा जास्त वेबसाइट्स देखील या मध्ये जोडले जाऊ शकतात. ज्यांची नवीन वेबसाईट आहे त्यांना या टूल चा कमी वापर होईल पण जस-जसे येणारे visitors वाढतील तसे Analytics ची मदत घ्यावी लागेल.

आपल्या वेबसाईट वर कोणत्या लोकेशन वरून जास्त visit येतात या वरून targeting अधिक प्रभावी केली जाऊ शकते. तसेच जे जास्त भेटी दिलेले पेज आहे त्याला अधिक प्रभावी करून user interface अधिक सुखकर करता येईल.त्याच प्रमाणे वापरकर्ता किती कालावधी साठी येतो आणि कुठे क्लिक करतो हे इव्हेंट्स मध्ये पाहता येईल. विविध सोशल मीडिया अकाऊंट्स वर आपण टाकलेल्या url वरून किती लोक येतात हे देखील रेफेरेंन्सस मध्ये पाहता येईल. हि सर्व माहिती आपल्याला विविध प्रकारात मिळेल जसे graph, table, चार्ट आणि हे असल्यास हि माहिती csv स्वरूपात डाउनलोड देखील करता येते. 

हेही वाचा : SEO म्हणजे काय? वेबसाईट रँक कशी करतात?

Google Analytics मध्ये अगदी सखोल माहिती गोळा केली जाते, जेणेकरून आपल्याला वेबसाईट ची जाहिरात करायची असेल तर हि माहिती अतिशय उपयुक्त ठरते. आगोदर भेट देऊन गेलेल्या लोकांना Google Ads द्वारे  परत लक्ष केले जाऊ शकते: त्यामुळे जास्त लोक वेबसाईट वर येण्याची शक्यता वाढते.

Google Analytics

वरील इमेज Google Analytics मध्ये लॉगिन केल्यानंतर कुठले पर्याय आहेत ते दर्शवते.

डाव्या बाजूला आपल्याला Realtime, Audience, Acquisition, Behavior, Conversion हे पर्याय दिसतील. Visitors graph, Devices, Timings, Source, Country यांच्या विविध आकृत्या दिसतील. तारीख आणि कालावधी प्रमाणे आपण त्यात बदल करून माहिती पाहू शकतो.

Google Analytics बद्दल अजून भरपूर माहिती आणि त्यात पर्याय देखील आहेत, पण या क्षेत्रात नवीन असलेल्या लोकांना या टूल बाबत सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

 

error: Content is protected !!