EPFO UAN KYC अपडेट करण्याची प्रक्रिया

शेअर करा

PF खात्यातून रक्कम काढण्यासाठी UAN मध्ये सर्व माहिती अपडेट करणे बंधनकारक आहे. माहिती अपडेट केली नसेल तर आपल्याला पीएफ रक्कम काढता येणार नाही. यामध्ये KYC म्हणजेच महत्वाची कागदपत्रे आणि त्यातील माहिती EPFO खात्याशी जोडणे. आधार, पॅन आणि बँक खाते हे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने KYC प्रक्रिया पूर्ण करता येते.

KYC अपडेट करण्याची प्रक्रिया

UAN लॉगिन

सर्वात आधी UAN खात्यात लॉगिन करावे लागेल. जर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक माहित नसेल अथवा UAN ऍक्टिव्ह केला नसेल तर “UAN क्रमांक ऍक्टिव्ह करण्याची प्रक्रिया” हा लेख वाचा. लॉगिन करण्यासाठी EPFO Login या लिंक वर भेट द्या.  

EPFO UAN खात्यामध्ये KYC अपडेट करण्याची प्रक्रिया, UAN activation process in Marathi, PF UAN activation, EPFO UAN KYC
UAN Login

“Manage” पर्याय 

लॉगिन केल्यानंतर विविध पर्याय दिसतील त्यातील “Manage” या पर्यायामध्ये KYC निवडा. संदर्भासाठी खाली इमेज दिली आहे.

EPFO UAN खात्यामध्ये KYC अपडेट करण्याची प्रक्रिया, UAN activation process in Marathi, PF UAN activation, EPFO UAN KYC
Manage – KYC

वयक्तिक माहिती 

KYC पर्यायामध्ये आल्यानंतर विविध कागतपत्रे जोडण्यासाठी पर्याय असतील. यातील सर्व कागदपत्रांची माहिती भरण्याची आवश्यकता नाही. फक्त आधार, पॅन आणि बँक खाते संबंधीत माहिती भरणे पुरेसे आहे. माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या “save” वर क्लिक करा. संदर्भासाठी इमेज जोडली आहे.

EPFO UAN खात्यामध्ये KYC अपडेट करण्याची प्रक्रिया, UAN activation process in Marathi, PF UAN activation, EPFO UAN KYC
Add Document details

अपडेट साठी लागणारा वेळ

सर्व माहिती भरल्यानंतर त्याच्याच खाली “pending process” असा तक्ता दिसेल. ज्यामध्ये कोणती माहिती मंजूर झाली/ मंजूर नाही हे पाहता येईल. साधरणतः पाच ते सात दिवसात मंजूर होईल, मात्र सरकारी काम असल्याने KYC अपडेट होण्यासाठी विलंब देखील लागू शकतो. 


संबंधित लेख

error: Content is protected !!