ऑनलाईन / डिस्टन्स एजुकेशन साठी प्रवेश घेताना घ्यावयाची काळजी

शेअर करा

A lot Marathi – Distance Education

डिस्टन्स एजुकेशन

जॉब करत असताना शिक्षण घेणे हे खूप कष्टाचे काम होते. पण अलीकडच्या काळात शिक्षणातही आधुनिकीकरण झाले. त्यामुळे शिक्षण आणि काम दोन्ही एकत्र करता येत आहे. काही कंपन्या कामगारांना प्रोमोशन साठी अट घालतात शिक्षणाची पात्रता पदवीधर/पद्युत्तर अशी ठेवतात. त्यामुळे नोकरदार वर्ग ऑनलाईन लर्निंग कडे वळतो. ऑनलाईन किंवा डिस्टन्स एजुकेशन साठी (Distance Education) प्रवेश घेताना खालील गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.

UGC मान्यता

UGC

विश्वविद्यालय अनुदान आयोग (UGC) ची मान्यता ही अनिवार्य आहे, अगदी सर्व विद्यापिठांसाठी. UGC ची मान्यता नसलेल्या विद्यापीठांची पदवी कुठल्याच संस्थे मध्ये वैध ठरत नाही. कुठल्याही ऑनलाईन कोर्स साठी प्रवेश घेताना त्या विद्यापीठाला UGC ची मान्यता असणे आवश्यक आहे. भारतात ९०० पेक्षा जास्त विद्यापीठ आहेत. वेध आणि अवैध तपासण्यासाठी UGC च्या संकेतस्थळावर भेट द्या. https://www.ugc.ac.in/ “युनिव्हर्सिटी” या पर्याय मध्ये आपल्याला सर्व माहिती मिळेल.

DEB मान्यता

DEB

डिस्टन्स एजुकेशन ब्युरो (DEB) ही विशेष संस्था आहे जी फक्त दूरस्थ शिक्षण देणाऱ्या विद्यापिठांसाठी स्थापन झालेली आहे. फक्त UGC ची मान्यता असणे म्हणजे विद्यापीठ वैध ठरले असे नाही. DEB ची मान्यता असणे हे देखील बंधनकारक आहे. DEB हा UGC या संस्थेशी संलग्नित एक विभाग आहे. https://deb.ugc.ac.in/ या संकेतस्थळावर डिस्टन्स एजुकेशन ब्युरो ची सर्व माहिती मिळेल.

प्रवेश प्रक्रिया

Distance Education

डिस्टन्स लर्निंग साठी प्रवेश घेताना आपल्याला त्या विद्यापीठात स्वतः जाण्याची गरज नसते. अर्ज हा त्या त्या विद्यापीठांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात. संकेत स्थळावर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून चौकशी अर्ज भरलात तर अधिक सोयीस्कर पडते. त्यांच्या कडून आपल्याला संपर्क केला जाईल आणि प्रवेश घेण्याबाबत मार्गदर्शन मिळेल.

अभ्यासाची पद्धत

Distance Education

या मध्ये दोन पद्धती अवलंबल्या जातात, ऑनलाईन आणि ऑफलाईन. जर तुम्हाला तुमच्या मोबईल अथवा कॉम्पुटर वरून अभ्यास करणे सोपे असेल तर तुम्ही इ-लर्निंग/ऑनलाईन चा पर्याय निवडू शकता. ऑनलाईन पद्धती मध्ये तुम्हाला विडिओ लेक्चर्स मिळतील. तुम्हाला पुस्तक वाचून अभ्यास करणे सोपे असेल तर तुम्ही ऑफलाईन हा पर्याय निवडू शकता. ऑफलाईन पद्धतीमध्ये पुस्तके घरी पाठवली जातात. विद्यापीठ हे या दोन पैकी एक अथवा दोन्ही पध्दतीचा वापर करतात.

परीक्षा पध्दत

Exam

अभ्यासासाठी जशा दोन पद्धती असतात तसेच परीक्षेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन या पद्धती असतात. ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्ही कॉम्पुटर वरून परीक्षा देऊ शकतात. तर ऑफलाईन पद्धतीमध्ये लिहून परीक्षा द्यावी लागते. तुमच्या पोस्ट क्रमांक नुसार जवळील स्थान तुम्हाला दिले जाते, जेथे विद्यार्थायला प्रत्यक्षात जाऊन परीक्षेला बसता येते.

A lot Marathi – Distance Education

वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

 
error: Content is protected !!