क्रेडिट कार्ड विषयी माहिती

शेअर करा

Credit Card information in Marathi

क्रेडिट कार्ड विषयी माहिती 

जेव्हा आपल्याला आँनलाईन शाँपिंग करायची असते तेव्हा आपण आँनलाईन कोणत्याही वस्तुंची खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा प्रामुख्याने वापर करत असतो. हे क्रेडिट कार्ड आपल्याला उपलब्ध करून देण्याचे काम बँक करत असते.

Credit Card हे एक प्रकारची लायबीलिटी असते. ज्यामुळे आपल्या खिशातुन पैसे जात असतात. पण जर आपण ह्याच क्रेडिट कार्डचा वापर करत असताना काही महत्वाच्या गोष्टींचे पालन केले तर हेच आपल्यासाठी लायबीलीटी ठरणारे क्रेडिट कार्ड आपल्यासाठी एक अँसेट बनु शकते. हे तेव्हाच घडु शकते जेव्हा आपण क्रेडिट कार्डचा योग्यपणे आणि मर्यादित असाच वापर करू. ह्याचसाठी आजच्या लेखातुन आपण क्रेडिट कार्डविषयी त्याच्यापासुन आपल्याला होत असलेल्या फायदा तसेच तोटयांविषयी सविस्तरपणे माहिती जाणुन घेणार आहोत.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड हे एक प्लँस्टिकचे बनवलेले मेटल कार्ड असते. जे आपल्याला बँकेकडुन आपले क्रेडिट स्कोअर तसेच हिस्ट्री जाणुन घेतल्यानंतर त्याच्यानुसार दिले जाते. क्रेडिट कार्ड हे आपल्या डेबिट कार्ड (एटीएम कार्ड) प्रमाणेच असते. क्रेडिट कार्ड ही एक सुविधा असते जी आपल्याला पुरविण्याचे काम बँक तसेच वेगवेगळया प्रकारच्या फायनान्स कंपनी करत असतात.

पण ही सुविधा अमर्याद स्वरूपात नसते याला सुदधा काही मर्यादा असतात. ज्याला आपण क्रेडिट लिमिट असे म्हणतो. म्हणजेच क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्ज असते जे आपल्याला बँकेकडुन, तसेच वित्तीय संस्थांकडून आपल्याला पैसे उपलब्ध नसताना तात्काळ आँनलाईन वस्तुंची खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते.

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांच्यात काय फरक आहे?

क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेकडून फायनान्स कंपनीकडुन आपल्याला दिली जाणारी एक अशी सुविधा तसेच एक प्रकारचे कर्ज असते ज्याचा वापर करून आपण आपल्याला तात्काळ हवी ती वस्तु खरेदी करू शकतो ते ही आपल्याकडे रोख पैसे नसताना. क्रेडिट कार्ड प्रमाणे डेबिट कार्ड, ए टी एम कार्ड सुदधा ही आपल्याला बँकेकडुनच दिली जाणारी एक सुविधा असते. जिचा वापर करून आपण कुठुनही आणि केव्हाही आपल्या एटीएम कार्ड द्वारे पैसे काढु शकतो.

आपल्याला प्रश्न असा पडतो की क्रेडिट कार्ड द्वारे आपल्याला तात्काळ एखादी वस्तु खरेदी करण्यासाठी बँकेकडुन कर्जच्या स्वरुपात पैसे प्राप्त होत असतात. त्याचप्रमाणे डेबिट कार्डनेही, एटी एम कार्ड आपल्याला तात्काळ अकाऊंट मधुन पैसे काढता येत असतात. याचा अर्थ तिघे सारखे असतात का?आणि तिघांमध्ये जर फरक असतो तर मग तो काय आहे?आपल्याला पडत असलेल्या ह्याच प्रश्नांचे उत्तर आपण क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड, एटीएम कार्ड  यांची तुलना करून समजुन घेणार आहोत.

Credit Card information in Marathi

क्रेडीट कार्ड आणि डेबिट कार्ड, एटीएम कार्ड या तिघांमधील फरक

एटी एम कार्ड आणि डेबिट कार्ड यातील साम्य 

एटीएम कार्डचा वापर आपण बँकेतील आपले अकाऊंटमध्ये सेव्ह केलेले पैसे काढण्यासाठी करत असतो. जेव्हा आपण एटीएममधुन पैसे काढायला जात असतो. तेव्हा आपल्याला बँकेकडून दिला गेलेला पिन नंबर तिथे प्रथम टाकावा लागत असतो. एटीएम कार्डचा वापर आपण प्रामुख्याने आपल्या सेव्हिंग तसेच करंट अकाऊंटमधील पैसे काढण्यासाठी नेहमी करत असतो.

एटीएम कार्डद्वारे आपल्याला बँकेकडून कोणत्याही प्रकारची क्रेडिट आँफर ही दिली जात नसते. त्यामुळे इथुन आपल्याला दिल्या गेलेल्या कालावधीनुसार आपल्या अकाऊंटमधील पैशांची कपात केली जाते.

समजा जर आपल्याला जर आपल्या अकाऊंटमधुन एखाद्या व्यक्तीच्या मग ती व्यक्ती आपली कुटुंबातील सदस्य असो किंवा आपले त्याच्याशी काही आर्थिक व्यवहार असलेली परकी व्यक्ती असो इथे आपल्याला आपल्या अकाऊंटमधुन त्याच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवायचे असेल तर बँकेला त्याचा चार्ज देखील पे करावा लागतो.

डेबिट कार्ड हे आपल्याला एटीएम कार्डप्रमाणेच सुविधा पुरविण्याचे काम करत असते. डेबिट कार्ड द्वारे आपण जेव्हा खरेदी करत असतो तिथेदेखील आपल्याला एटीएम कार्ड प्रमाणेच पिन नंबर टाकावा लागतो. डेबिट कार्डचा वापर करून हाँटेलमधील जेवणाचे बिल भरू शकतो. सगळयात महत्वाचे म्हणजे आपण एटीएम कार्ड प्रमाणेच डेबिट कार्डचा वापर देखील आपल्या अकाऊंटमधील सेव्ह केलेली रक्कम काढण्यासाठी देखील करू शकतो. म्हणुन आपण एटीएम कार्डलाच डेबिट कार्ड असे देखील म्हणतो कारण या दोघांची बहुतेक कार्ये ही सारखीच असलेली आपणास दिसुन येते.  

क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड या दोघांमधील फरक

तसे पाहायला गेले तर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे दोघे आपल्याला सारखेच वाटतात. कारण या दोघांच्या कार्यपदधतीत देखील खुप समानता आपणास पाहावयास मिळते. जसे की क्रेडिट कार्डमध्ये ज्या पदधतीने आपण पिन नंबर वापरत असतो त्याचप्रमाणे आपण डेबिट कार्डमध्ये देखील सोळा अंकांचा पिन नंबर वापरत असतो. तसेच दोघांचा वापर करून आपण एटीएममधुन पैसे देखील काढु शकतो. आपण Credit Card आणि Debit Card या दोघांमधील फरक जाणुन घेणार आहोत.

जेव्हा आपण क्रेडिट कार्डचा वापर करून कोणताही व्यवहार करत असतो. तेव्हा तो व्यवहार करण्यासाठी आपले स्वताचे एक खाते बँकेमध्ये असणे देखील फार गरजेचे असते. म्हणजेच आपलेच पैसे आपल्याला वापरायला देण्याचे काम डेबिट कार्डचे असते. पण याउलट क्रेडिट कार्डची कार्यपद्धत असते. ज्यात बँक आपल्याला क्रेडिटच्या स्वरुपात एक प्रकारचे कर्ज देत असते. म्हणजेच क्रेडिट कार्डमध्ये आपण स्वताचे पैसे न वापरता बँकेचे पैसे वापरतो. जे आपल्याला नंतर बँकेला द्यावे लागत असतात.

आपण डेबिट कार्डद्वारे बँकेतुन जी रक्कम काढत असतो ती काढण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचे व्याज देण्याची आवश्यकता नसते. पण जेव्हा आपण क्रेडिट कार्डचा वापर करून एखादी रक्कम बँकेतुन काढतो तेव्हा मात्र आपल्याला बँकेकडुन व्याज आकारले जाते.

Credit Card information in Marathi
Credit Card information in Marathi

क्रेडिट कार्डचा सर्विस चार्ज हा डेबिट कार्डच्या तुलनेत खुप अधिक असतो.

डेबिट कार्डद्वारे आपण जो व्यवहार करतो त्याची मर्यादा आपल्या खात्यात किती पैसे आहेत यावरुन ठरत असते. पण क्रेडिट कार्डचे तसे नसते इथे आपली व्यवहार करण्याची मर्यादा ही आधीपासुनच बँकेने आपल्या Credit Score नुसार सुनिश्चित केलेली असते. ज्यात आपण कोणताही हस्तक्षेप तसेच बदल करू शकत नाही. डेबिट कार्ड हे आपण भारतात कुठेही वापरू शकतो. पण क्रेडिट कार्ड हे आपण भारतातच नव्हे तर परदेशात देखील वापरू शकतो.

डेबिट कार्डचा वापर आपण अशा आपल्या रोजच्या वापरातील दैनंदिन वस्तुंच्या खरेदीसाठी करतो ज्या खरेदी करण्याची आपली आर्थिक क्षमता असते. पण क्रेडिट कार्डचा वापर करून आपण अशा वस्तुंची देखील खरेदी करू शकतो ज्या खुप महाग आहेत आणि त्याची खरेदी करण्याइतकी रोख रक्कम आपल्याकडे तसेच आपल्या खात्यात नसते.

Credit Card information in Marathi

क्रेडिट कार्डचे फायदे कोणकोणते असतात?

जेव्हा आपण एखादी वस्तु क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करत असतो. तेव्हा आपल्याला त्याचे काही लाभ देखील प्राप्त होत असतात ते पुढीलप्रमाणे आहेत:

●     जरी आपल्या बँक खात्यात कोणतीही वस्तु खरेदी करण्याइतपत पुरेशी रक्कम नसली तरी देखील क्रेडिट कार्डचा वापर करून आपल्याला हवी ती वस्तु आपण आँनलाईन पदधतीने क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करू शकतो.

●     जी वस्तु खरेदी करण्याइतकी रक्कम आपल्या बँक खात्यात नसते. ती वस्तु देखील आपण क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करू शकतो. भलेही मग ती कितीही महाग असो.

●     आपल्याला जेव्हा खुप गरज असेल तेव्हा आपण क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे काढु शकतो. पण हे पैसे काढत असताना काही व्याज आपल्याला आकारले जात असते ते व्याज आपल्याला नंतर जास्त प्रमाणात भरावे लागत असते.

●     क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्याने आपल्याला चांगला डिस्काऊंट तसेच रिवाँअड पाँईण्ट देखील देखील प्राप्त होत असतो. ज्याचा फायदा आपल्याला पुढच्या वेळी खरेदी करताना होत असतो. म्हणुनच खुप जण क्रेडिट कार्डचा वापर करून आँनलाईन शाँपिंग करत असतात.

●     क्रेडिट कार्डचा वापर करून आपण कोणतीही वस्तु ईएम आयवर खरेदी करू शकतो.

●     जर आपण क्रेडिट कार्डचा वापर करून ५० हजारपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तुंची खरेदी केली तर आपल्याला क्रेडिट कार्डची जी वार्षिक फी आकारली जात असते. ती माफ होत असते.

●     प्रत्येक कार्डने खरेदी केल्याने प्रत्येक महिन्याला आपण किती खरेदी केली?आणि ती खरेदी कधी तसेच केव्हा केली ह्याबाबद नोंदणी केलेले एक बिल शीट देखील आपल्याला प्राप्त होते.  

क्रेडिट कार्डचे नुकसान तसेच तोटे

ज्या प्रमाणे क्रेडिट कार्डचा वापर करून आपल्याला अनेक प्रकारच्या सुविधांचा लाभ मिळतो त्याप्रमाणे क्रेडीट कार्डचा वापर केल्याने आपल्याला काही नुकसानांना देखील सामोरे जावे लागु शकते. म्हणुन आपण क्रेडिट कार्डचा योग्य तिथे आणि मर्यादितच वापर करायला हवा नाहीतर आपल्याला जे नुकसान होईल ते पुढीलप्रमाणे असु शकते.

●     जर आपण क्रेडिट कार्डचा वापर करून एखादी वस्तु खरेदी केलेली असेल तर आपल्याला ते पैसे लवकरात लवकर बँकेला फेडणे देखील खुप गरजेचे असते. नाहीतर बँक आपल्याकडुन त्याचे व्याज देखील वसुल करत असते. ज्याचे प्रमाण हे खुप अधिक प्रमाणात असते.

●     आपल्या क्रेडिट कार्डचे लिमिट जेवढे असते तेवढा दर वर्षी आपल्याला वार्षिक चार्ज बँकेला द्यावा लागत असतो.

●     क्रेडिट कार्डवर बँक आपल्याला अनेक फी तसेच चार्ज देखील आकारत असते जे बँक आपल्याला कधीच सांगत नसते. ज्यामुळे आपण कर्जाच्या जाळयात फसत असतो.

●     क्रेडिट कार्डचे बील फेडण्यासाठी बँक आपल्याला कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना देत नसते आणि मग बील भरण्याची लास्ट डेट माहीत नसल्यामुळे बील भरायला आपल्याला उशिर होतो. मग त्यासाठी बँक आपल्याकडुन लेट फी देखील वसुल करत असते.

●     क्रेडिट कार्ड आँटोमोडला जर आपण ठेवले तर आपल्या नकळत आपल्या खात्यातुन पैसे दरमहा तसेच दरसाल कपात केले जात असतात. म्हणुन असे म्हटले जाते की आपण आपल्या क्रेडिट कार्डचा पिन अपडेट करत राहायला हवा. (Credit Card information in Marathi).


error: Content is protected !!