CBI माहिती मराठी CBI information in Marathi :
सीबीआय म्हणजे काय?
CBI Full form is Central Bureau of Investigation. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI (Central Bureau of Investigation). ब्रिटिश काळात युद्ध-सामग्री खरेदी मध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी Special Police Establishment Act १९४१ ची स्थापना केली गेली. या कायद्याद्वारे युद्ध सामग्री देवाण-घेवाण यातील आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यास मदत झाली.कालांतराने या कायद्यात बदल करून १९६३ मध्ये सीबीआय ची स्थापना करण्यात आली.
डी. पी. कोहली हे सीबीआय चे प्रथम संचालक होते. देश पातळीवर होणाऱ्या भ्रष्टाचारांची चौकशी CBI द्वारे केली जाते. CBI चौकशी झालेल्या प्रकारणांपैकी चारा घोटाळा, स्पेक्ट्रम ही प्रकरणे जास्त गाजली.
स्थापना उद्देश
FBI या अमेरिकच्या संस्थेच्या धर्तीवर CBI ची स्थापना झाली, या दोन्ही संस्थेचे कामकाज आणि इतर गोष्टीत साम्य आढळते. CBI ही देश पातळीवर सर्वात मोठी तपास यंत्रणा आहे. भारतात विविध शहरामध्ये मिळून एकूण आठ क्षेत्रीय कार्यालय आहेत. CBI संस्थेचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. (CBI information in Marathi)
हत्या, भ्रष्टाचार, आर्थिक फेरफार तसेच अन्य घोटाळे त्यानुसार तपास करण्यासाठी CBI चे तीन शाखांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. केंद्र सरकारचे सर्व विभाग, सार्वजनिक कंपन्या, वित्तीय संस्था या मध्ये झालेला भ्रष्टाचार किंवा घोटाळा याबाबत तपास करणे हे या शाखेच्या अंतर्गत येते.
- Anti Corruption Division
- Economic Crime Division
- Special Crime Division

तपास अधिकार
सुप्रीमकोर्ट, हायकोर्ट यांच्याकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर CBI तपास सुरु करू शकते. तसेच राज्य सरकार कडून विशेष केसेस साठी विनंती केली गेली तर CBI ही तपास यंत्रणा काम सुरु करते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीत येणार संथा नंतर पंतप्रधानाच्या अख्त्यारीत आणली गेली.
संचालक पदाची निवड
गृहमंत्रालयाकडून पात्र असणाऱ्या IPS अधिकाऱ्यांची यादी पंतप्रधान कार्यालयाला पाठवली जाते. पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि विरोधी पक्षनेते यांची समिती CBI संचालक पदाची निवड करते. या समितीचे अध्यक्ष हे विद्यमान पंतप्रधान असतात. म्हणजेच संचालक पदावर कोणाची नियुक्ती होणार याचे अधिकार पंतप्रधानांकडे असतात.
राजकीय वापर
CBI चा राजकीय वापर होतो अशी टीका वेळोवेळी करण्यात येते. सुप्रीम कोर्टाने ओढलेल्या ताशेऱ्यामुळे 2013 साली CBI संस्थे वर जोरदार टीका झाली. त्यावेळी “पिंजऱ्यातला पोपट” अशी उपमा सुप्रीम कोर्टाने दिली होती. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात सतत वादविवाद होत असतात. मात्र CBI संस्थेचा राजकीय वापर केला जाऊ शकतो का? हा एक संशोधनाचा विषय आहे.
कोणत्याही सरकारी तपास यंत्रणेवर निष्पक्ष काम करण्याची जबाबदारी असते. CBI या संस्थेत काम करणारे सर्व अधिकारी शिस्तप्रिय आणि निर्भीड असतात, कारण यांची नेमणूक IPS अधिकाऱ्यांमधून होते. असे असताना काही राजकीय पक्ष दबाव आणून आपल्या मर्जीने काम करून घेण्याचा प्रयत्न करत असतात.(CBI information in Marathi).
संबंधित लेख