२१ कमी खर्चात सुरु करता येणारे व्यवसाय. Top 21 Business Ideas in Marathi

शेअर करा
वाचन सूची hide
2. कमी खर्चात सुरु करता येणारे व्यवसाय कोणकोणते?

कमी खर्चात सुरु करता येणारे व्यवसाय

Business Ideas in Marathi

घरगुती व्यवसाय, ऑनलाईन व्यवसाय, महिलांसाठी व्यवसाय आणि अन्य व्यवसाय. 

पैसा ही एक अशी गोष्ट आहे ज्याची गरज ही प्रत्येक मानव प्राण्याला भासत असते. आपल्या जीवणातील आपल्या दैनंदिन तसेच महत्वपुर्ण गरजांची पुर्तता करण्यासाठी. ह्याच एका कारणामुळे प्रत्येक मनुष्यप्राणी एका विशिष्ट वयानंतर म्हणजेच २० ते २५ वय झाल्यानंतर पैसा म्हणजेच धन कमविण्यासाठी एखादी नोकरी तसेच स्वतःचा  उद्योग व्यवसाय करत असतो. 

पण चिंतेची गोष्ट अशी आहे की आपला स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची आर्थिक स्थिती ही बळकट नसते. तो स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो इतके पर्याप्त धन त्याच्याकडे उपलब्ध नसते. जेव्हा आपण कोणताही उद्योग तसेच व्यवसाय सुरू करत असतो तेव्हा आपल्याला सगळयात जास्त गरज असते ती भांडवलाची म्हणजेच पैशांची. ह्याच एका कारणामुळे आपली खुप ईच्छा असुन सुद्धा आपण आपला स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करू शकत नसतो. कारण स्वतःचा एक वैयक्तिक मालकीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे भांडवलाच्या स्वरुपात भरपुर पैसे नसतात. 

म्हणुन आजच्या ह्या लेखातुन आपण काही अशा व्यापार तसेच उद्योग व्यवसायांविषयी जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या उद्योग व्यवसायांची सुरूवात आपण कोणत्याही प्रकारचा खर्च न करता निशुल्क सुद्धा करू शकतो. तसेच खुप कमी भांडवल आपल्याकडे असले तरी सुद्धा आपण ते उद्योग व्यवसाय घरबसल्या तसेच आँनलाईन पद्धतीने देखील करू शकतो. 

जाणुन घेऊया की असे कोणते उद्योग व्यवसाय आहेत जे आपण कमी खर्चात, घरबसल्या इंटरनेटचा वापर करून आँनलाईन पद्धतीने देखील करू शकतो आणि ज्या उद्योग व्यवसायासाठी आपल्याला भांडवल देखील खुप कमी लागते. 

कमी खर्चात सुरु करता येणारे व्यवसाय कोणकोणते? 

जेव्हा कोणतीही व्यक्ती आपला स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करण्याचा विचार करते तेव्हा त्या व्यक्तीला जर सर्वात जास्त कशाची आवश्यकता असते तर ती म्हणजे व्यवसाय करण्यासाठी एका सुयोग्य योजनेची तसेच नियोजनाची. आपला उद्योग तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी एका जागेची तसेच कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या वस्तु सामग्रीची खरेदी करणे गरजेचे असते त्या वस्तु सामग्रीची.
ह्या सर्व वस्तु सामग्री खरेदी करण्यासाठी आपल्याला लागत असते काही भांडवल.वरील बाबी सांगण्यामागचे उद्दिष्ट असे मुळीच होत नाही की सर्वसामान्य व्यक्ती त्याच्याकडे पुरेसा पैसा नसल्या कारणाने किंवा त्याच्याकडे खुपच कमी पैसे असल्यामुळे आपला स्वतःचा एक उद्योग, व्यवसाय अजिबात सुरू करू शकणार नाही. किंवा त्याने तो सुरू करू नये.  

कमी खर्चात सुरु करता येणारे व्यवसाय

1) आँनलाईन मार्केटिंग अँण्ड सेलिंग करणे  

आँनलाईन मार्केटिंग अँण्ड सेलिंग हा एक असा व्यवसाय आहे ज्यात आपण आपल्या दैनंदिन जीवणात आपल्याला लागत असलेल्या गरजेच्या तसेच उपयुक्त वस्तुंची खरेदी-विक्री करतो. म्हणजेच आपल्याला परिधान करण्यासाठी लागत असलेले नवनवीन कपडे खरेदी करत असतो. घरातील स्वयंपाकासाठी लागणारा किराणा खरेदी करत असतो, तसेच घरात लागत असलेल्या इतर वस्तु जसे की टिव्ही, फ्रीज, वाँशिंग मशिन अशा घरगुती वापरात येत असलेल्या वस्तुंची देखील खरेदी करत असतो. वेगवेगळया कंपनीच्या health तसेच beauty product तसेच service यांची आँनलाईन मार्केटिंग तसेच सेलिंग आपण आँनलाईन मार्केटिंग अँण्ड सेलिंगच्या व्यवसायामध्ये करत असतो. 

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या प्रोडक्ट तसेच सर्विसची आँनलाईन मार्केटिंग करावी लागते. त्यासाठी आपल्याला आँनलाईन जाहीरातीचा खर्च करावा लागत असतो. 

2) स्वतःची वेबसाईट, ब्लाँग सुरु करणे

ब्लाँगिंग हा एक असा आँनलाईन व्यवसाय आहे जो कोणीही कुठेही बसुन आँनलाईन पद्धतीने करू शकतो.हा एकमेव असा व्यवसाय आहे ज्याच्यासाठी आपल्याला कोणतीही धावपळ करण्याची आवश्यकता नसते.ब्लाँगिंग आपण घरात बसुन नव्हे तर घराच्या बाहेर असताना तसेच आपल्या कुटुंबियांसोबत पिकनिकला गेलेलो असताना देखील आपल्याला मिळेल त्या वेळेत करू शकतो. ब्लाँगिगला वेळेचे कोणतेही बंधन नसते. आपण कधीही आपल्या ब्लाँगसाठी आर्टिकल लिहुन ते प्रकाशित करू शकतो.

फक्त ब्लाँगिंग करण्यासाठी आपल्याला स्वतःचा एक अँड्राईड मोबाईल असावा लागतो किंवा आपल्याकडे आपला स्वतःचा एक लँपटाँप तसेच कंप्युटर असावा लागतो. त्यात इंटरनेटचे चांगले कनेक्शन असावे लागते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एक डोमेन तसेच होस्टिंग खरेदी करावे लागते. त्याचा वर्षाचा खर्च देखील आपल्याला करावा लागतो. एवढीच गुंतवणुक यात आपल्याला करावी लागते.

3) स्वतःची आँनलाईन किराणा शाँपी सुरू करणे

आजच्या ह्या डिजीटल युगात प्रत्येक व्यक्ती त्याला हवी असलेली वस्तु तसेच किराणा मालाची खरेदी ही आँनलाईनच वेगवेगळया शाँपिंग वेबसाईटवरून करत असते.ह्या मुळे आपला वेळ आणि पैसे दोघांची बचत होते. कारण आँनलाईन खरेदीत आपल्याला सवलत देखील मिळत असते. दुकानात जाऊन कोणतीही वस्तु आणण्यासाठी लागत असलेल्या उर्जेची देखील बचत होत असते. आँनलाईन शाँपिंग सेंटर हा एक असा व्यवसाय आहे जो आपण आत्ताच्या वर्तमान स्थितीत आणि भविष्यात कधीही सुरू करू शकतो. कारण आजकाल दिवसेंदिवस आँनलाईन खरेदीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि भविष्यात देखील ह्या व्यवसायाला अधिक महत्व प्राप्त होत जाणार आहे. म्हणुन हा सुद्धा एक उत्तम व्यवसायाचा मार्ग आहे जो आपण निवडु शकतो. ह्यासाठी आपल्याला फक्त आपली एक आँनलाईन शाँपिंग वेबसाईट बनवावी लागत असते.

4) आँनलाईन नोकर भरतीचा व्यवसाय (online recruitment company)

Online recruitment company ही एक अशी कंपनी तसेच एजंसी असते जी युवा युवक- युवतींना job मिळवुन देण्याचे काम करत असते. ते ही त्यांनी शिक्षण घेतलेल्या क्षेत्रानुसार त्यांच्या कला,कौशल्य आणि रुचीनुसार. अशाप्रकारे तरुण पिढीला नोकरी करण्याची संधी मिळवुन देऊन त्यांना रोजगार प्राप्त करून देण्याचे मोलाचे काम हे online recruitment company करत असते. पण जी कंपनी हा उद्योग व्यवसाय सुरू करत असते त्या कंपनीचे network system हे फार मजबुत असावे लागते. हा एक उत्तम व्यवसाय आहे जो अत्यंत कमी दरात देखील केला जाऊ शकतो.

5) आँनलाईन रिअल इस्टेट कन्सल्टन्सी 

सर्वसामान्य माणुस जो काही पैसा कमवित असतो त्याच्यापैकी काही टक्के भाग तो नक्कीच कुठेतरी invest करु पाहत असतो. गुंतवणुक म्हटले की real estate सारखा पैशांची गुंतवणुक करण्याचा व्यवसाय दुसरा कोणता असु शकतो. ह्यात आपण real estate agent द्वारे किंवा consultant चा सल्ला घेऊन आपली एखादी Property म्हणजेच बंगला किंवा प्लाँट तसेच जमीन खरेदी करतो.

जेव्हा आपली प्राँपर्टी डिल फायनल होत असते तेव्हा आपल्याला real estate agent ला आपली डील फायनल करून देण्याचा काही मोबदला टक्केवारीनुसार द्यावा लागत असतो.पण real estate consultancy चे तसे नसते आपल्याला real estate consultant आपल्याला जे काही गाईड करत असतो त्याबदले आपल्याला त्याला काही चार्ज द्यावा लागतो. जो आपल्याला तासानुसार द्यावा लागत असतो. Real estate consultancyहा एक खुप चांगला व्यवसाय आहे जो करून आत्तापर्यत लाखो लोक यशस्वी झाले आहेत. कित्येक जणांनी करोडोंचीच काय तर त्यांनी अरबोंची कमाई ह्यातुन केली आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल देखील फार मुबलक प्रमाणात लागते. 

कमी खर्चात सुरु करता येणारे व्यवसाय
कमी खर्चात सुरु करता येणारे व्यवसाय | Business Ideas in Marathi

6) आँनलाईन बुक स्टोअर

आज तसे पाहायला गेले तर वाचकांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आपणास दिसुन येते. पण अद्यापही भरपुर असे लोक आहेत ज्यांना अजुनही वाचनाची खुप आवड आहे. जे आँफलाईन वाचनालयात वाचण्यासाठी कामातुन वेळ काढुन जाऊ शकत नसले तरी आँनलाईन का होईना नेहमी पुस्तके मागवत असतात  आणि त्यांचे वाचन करीत असतात. आपण अशा गरजू वाचकांसाठी एखादे आँनलाईन बुक स्टोअर सुरू करून आँनलाईन पद्धतीने त्यांना पुस्तकांची सर्विस देणे सुरू केले तर हा देखील आपल्यासाठी भरपुर पैसे कमविण्याचा उत्तम मार्ग बनु शकतो. 

7) अफिलिएट मार्केटिंग करणे

अफिलिएट मार्केटिंग हा एक असा आँनलाईन पद्धतीने केला जाणारा व्यवसाय आहे ज्या मध्ये आपल्याला कोणत्यातरी एका कंपनीच्या अफिलिएट मार्केटिंग प्रोग्रँमला जाँईन करायचे असते आणि त्या कंपनीचे जे काही प्रोडक्ट असतात तसेच सर्विस असतात त्यांची आँनलाईन आपल्या अफिलिएट वेबसाईटदवारे तसेच सोशल मिडिया पेजद्वारे अकाऊंटद्वारे सेलिंग करायची असते. त्याबदल्यात आपल्याला त्या अफिलिएट प्रोग्राम कंपनीकडुन ठरलेल्या नुसार एक फिक्स कमीशन देखील प्राप्त होते. जे आपल्याला त्या विक्री केलेल्या वस्तुच्या प्रोडक्ट तसेच सर्विसच्या किंमतीनुसार कंपनीकडुन दिले जात असते.

8) डेटा इंट्री आँपरेटर

डेटा इंट्री हा व्यवसाय आपल्याला संगणक तसेच लँपटापद्वारे करायचा असतो. तसे पाहायला गेले तर आपण मोबाईल द्वारे सुद्धा हा व्यवसाय करू शकतो. अशा खुप कंपन्या आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्या डेटा इण्ट्री आँपरेटरची कामे आपल्याला घरबसल्या देत असतात. त्यांना डेटा इण्ट्रीच्या कामासाठी तरूण मुला मुलींची गरज देखील असते. हा एक असा व्यवसाय आहे जो तरुण तरुणीच नाही तर घरगृहिणी देखील आपल्या रिकाम्या वेळामध्ये एक्सट्रा इन्कम करीता करू शकतात.

9) युटयुब चँनल

युटयुब हे एक असे माध्यम आहे जिथे आपण आपल्या अंगी जी ही कला असेल कौशल्य असेल त्याचा वापर करून घरबसल्या आँनलाईन कमाई करू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला ज्या क्षेत्राचे विषयाचे चांगले ज्ञान प्राप्त असेल त्यावर आपल्याला व्हिडिओ बनवायचे लागतील आणि ते युटयुबवर अपलोड करावे लागतील आणि जसजसे आपल्या सबस्क्राईबर वाढतात आपल्या व्हिडिओवरचे व्युव्ह वाढतात तसतसे आपल्या व्हिडिओवर लोकांना गुगलकडुन जाहिराती दाखवल्या जातात त्या जाहिरातीचे ६० टक्के आपल्याला गुगलकडुन मिळत असतात.

10) आँनलाईन कुकिंगचे क्लासेस घेणे

जेव्हा चांगले उत्तम आणि लज्जतदार पदार्थ खाण्याची वेळ येत असते तेव्हा आपण सगळेच तयार असतो. कारण आपल्याला प्रत्येकाला खमंग जेवणाची मनापासुन आवड असते म्हणुन अशी संधी आपल्याला कुठे मिळाली तर आपण ती कधीच सोडत नसतो. पण ह्याच ठिकाणी तेच पदार्थ बनवायचे म्हटले तर खुप जणांना कंटाळा येत असतो. पण असे काही लोक असतात ज्यांना चांगले आणि उत्तम पदार्थ खाण्याबरोबरच बनवण्याची देखील आवड असते. असे लोक मग तो पुरूष असो किंवा स्त्री आपले आँनलाईन कुकिंगचे क्लासेस घेऊ शकतात आणि आपले ज्ञान इतरांपर्यत पोहचवू शकतात. त्याबदल्यात फी चार्ज करू शकतात. किंवा युटयुबवर आपले कुकिंगचे व्हिडीओ टाकुण आपले चँनल माँनिटाईज करून देखील पैसे कमावू शकतात.

Business Ideas in Marathi

महिलांसाठी कमी खर्चात सुरु करता येणारे व्यवसाय/घरगुती व्यवसाय

1) स्वतःचे आईसक्रीम पार्लर सुरू करणे

आज पाहावयास गेले तर आपणास दिसुन येते की छोटी मुलेच नाही तर मोठी माणसेही आईसक्रीम खूप आवडीने खातात. आज आपल्याला प्रत्येकाला आईसक्रीम ही इतकी जास्त प्रमाणात आवडत असते की दिवस असो किंवा रात्र तसेच कोणताही ऋतू असो आपण प्रत्येकजण आईसक्रीम खाणे कधीच सोडत नाही. म्हणुन दररोज रात्री जेवण झाले कि आपण कमीत कमी एक आईसक्रीम खावे अशी इच्छा होते. मग त्यासाठी आपल्याला कितीही दुर जावे लागले तरी आपली तयारी असते. अशा परिस्थितीत आईसक्रीमची सर्व लोकांमध्ये एवढी आवड असताना आपल्याकडे एक चांगली व्यवसायाची संधी आहे. ज्यात आपण स्वतःचे एक आईसक्रीम पार्लर टाकुन लोकांना आईसस्क्रीम सेवा देऊन एक चांगल्या कमाईच्या साधनाची निर्मिती करू शकतो.

2) योगा क्लासेस घेणे

ज्या महिला आपल्या आरोग्याच्या बाबतीत खुप सचेत आहेत आणि त्या नेहमी सकाळी व्यायाम करतात.योगासने करतात अशा महिला तसेच गृहिणी आपल्या आजुबाजुच्या परिसरातील लोकांना आपल्या घराच्या टेरेसवर रोज सकाळी योगा शिकवण्याचे काम देखील करू शकतात.

फक्त एवढेच नव्हे तर आपण आपल्या घरातच योगाचे क्लासेस देखील सुरू करू शकतो.फक्त ह्यासाठी योगाशी संबंधित काही महत्वाचे शिक्षण घेऊन एखादा कोर्स आपल्याला करावा लागत असतो.यानंतर आपण स्वता योगा इन्सट्रक्टर म्हणुन इतरांना योगा शिकवू शकतो.

3) स्वतःचे ब्युटी पार्लर सुरू करणे

ज्या महिलांना  सौंदर्य आणि सौंदर्य साधनांची चांगली माहीती आहे. अशा महिला आपल्या घरातच आपले एक छोटेसे ब्युटी पार्लर सुरू करू शकतात. ह्यासाठी आपल्याला व्यवसायाविषयी इतरत्र कळावे म्हणुन घराबाहेर एखादी छोटी मोठी पाटी लावावी लागेल. आजुबाजुच्या परिसरातील काँलनीतील महिलांना जाऊन सांगावे लागेल की मी एक ब्युटी पार्लर सुरू केले आहे. जसजसे तुमच्या परिसरातील महिलांना तुमच्या ब्युटी पार्लरविषयी ऐकु येईल त्या तुमच्याकडे येणे सुरू करतील आणि तुमचा व्यवसाय जोरात चालणे सुरू होईल.

4) अगरबत्या तसेच मेणबत्या बनवुन विकणे

अशा महिला ज्यांच्यामध्ये वेगवेगळया अगरबत्त्या तयार करण्याचे कौशल्य दडलेले आहे. अशा महिला आपल्या ह्या ज्ञानाचा कौशल्याचा वापर अगरबत्ती तसेच मेणबत्ती तयार करण्याच्या व्यवसायात करू शकतात.

5) पापड लोणच्याचा व्यवसाय करणे

अशा महिला ज्यांना तिखट चमचमीत लोणचे तयार करता येत असेल अशा महिला तसेच गृहिणी स्वतःच्या घरातुनच पापड लोणचे विकण्याचा व्यवसाय करू शकतात.

6) द्रोण तसेच पत्रावळी तयार करणे

आज कोणत्याही कार्यक्रमामध्ये महिलांना भांडे घसण्याचा त्रास होऊ नये.म्हणुन महिला कोणत्याही कार्यक्रमात द्रोण तसेच पत्रावळीचा वापर जेवण वाढण्यासाठी करीत असतात. त्यामुळे हा सुद्धा एक चांगला व्यवसाय आहे ज्यात आपण एखाद्या कार्यक्रमासाठी द्रोण तसेच पत्रावळी बनविण्याचे आणि ते पुरवण्याचे काम करू शकतात. 

7) जेवणाचा डब्बा तयार करणे

अशा महिला ज्यांना पाककलेत चांगला रस आहे आणि त्यांना उत्तम पाककला येते अशा महिला बाहेरगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी आलेल्या स्त्री पुरूष तसेच तरुण मुला मुलींना जेवणाचा डब्बा पोहचवण्याचे काम करू शकतात. किंवा आपल्या घरातच त्यांच्यासाठी जेवणाला बसण्याची सुविधा करून छोटीशी मेस चालवू शकतात. 

8) शिवणकाम करणे

ज्या महिलांना शिवणयंत्र चालविता येत असेल तसेच शिवणकाम येत असेल अशा महिला आपल्या घरातुनच शिवणकामाचा व्यवसाय सुरू करू शकतात. यासाठी गुंतवणुक फारशी काही नसते फक्त आपणास शिवणयंत्र खरेदी करावे लागते तो खरेदी करण्याचा खर्च करावा लागतो. यानंतर आपण आपल्या आजुबाजुच्या परिसरातील स्त्री पुरूषांच्या फाटलेल्या कपडयांना शिलाई करण्याचे तसेच टीपा मारण्याचे इत्यादी कामे घरबसल्या करू शकतात. 

9) चाँकलेट बनविण्याचा व्यवसाय

आपणास जर वेगवेगळया प्रकारच्या चाँकलेट डिशेस बनविता येत असतील  तर आपण घरबसल्या चाँकलेट तयार करून लोकांना उत्तम प्रकारच्या डिशेस खायला देऊ शकतात. सुरूवातीला आपल्याला आपली मार्केटिंग करण्यासाठी फ्री मध्ये सुद्धा सेवा द्यावी लागु शकते. जसजशी लोकांना आवड आणि चटक निर्माण होईल लोक स्वता आपल्या घरी येऊन चाँकलेट विकत घेत जातील.

10) नृत्य शिकवणे

जर तुम्हाला चांगले नृत्य करता येत असेल तर आपण आपल्या आजुबाजुच्या मुलींना तसेच महिलांना डान्स शिकविण्याचे काम देखील करू शकता. 

11) साडीचे दुकान

आजकाल प्रत्येक महिलेला नवनवीन साडया साज श्रृंगार ह्या गोष्टी आवडत असतात. याचा फायदा आपण आपल्या घरातुनच आपल्या आजुबाजुच्या परिसरातील काँलनीतील महिलांना घरबसल्या साडया विकण्याचे काम करू शकता. ह्यासाठी तुम्हाला फक्त कमी किंमतीत साडयांचा मोठा स्टाँक विकत आणावा लागेल आणि त्यात आपला प्राँफिट मार्जिन अँड करून आजुबाजुच्या महिलांना विकाव्या लागतील.


error: Content is protected !!