अण्णाभाऊ साठे यांची माहिती. Annabhau Sathe information in Marathi

शेअर करा

अण्णाभाऊ साठे यांची माहिती

अण्णाभाऊ साठे यांचे खर नाव तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊ साठे हे एक लेखक, लोकशाहीर तसेच समाजसुधारक म्हणुन ओळखले जातात. अण्णाभाऊ साठे एक मांग जातीत जन्मलेले व्यक्ती होते. त्यांनी अनेक लोकनाटये, प्रवासवर्णन, कथा, कादंबरी, नाटक, शाहीरी, पोवाडे, पटकथा यांचे देखील लेखन केलेले आपणास दिसुन येते. 

आज ह्या अशा एका थोर व्यक्तीमत्वाचा आढावा आजच्या लेखातुन घेणार आहोत जसे की अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण कोणते? अण्णाभाऊ साठे यांच्यावर कोणत्या विचारसरणीचा प्रभाव होता? अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि कविता कोणत्या? अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही पदवी केव्हा दिली गेली? अण्णाभाऊ साठे यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? इत्यादी बाबींचा आपण आजच्या लेखातुन थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Annabhau Sathe information in Marathi

अण्णाभाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण कोणते होते?

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट 1920 रोजी महाराष्टातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव ह्या छोटयाशा गावी झाला. अण्णाभाऊंच्या वडिलांचे नाव भाऊराव असे होते आणि आईचे नाव वालबाई असे होते. अण्णाभाऊ यांचा जन्म एका मांग जातीमध्ये झाला होता. त्यांचे आईवडील हे देखील खुप गरीब होते.

तसेच शाळेतील जातीय भेदामुळे अण्णाभाऊंना त्यांचे शिक्षण देखील अर्धवटच सोडावे लागले. अण्णाभाऊंचे दोन विवाह झाले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई साठे असे होते तसेच दुसरीचे जयवंता साठे असे होते. अण्णाभाऊंना मधुकर, शांता आणि शकुंतला या नावाची तीन अपत्य देखील होती.

अण्णाभाऊ साठे यांच्यावर कोणाच्या विचारसरणीचा प्रभाव होता?

अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल माक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद डांगे यांच्या विचारांचा खुप मोठा पगडा होता. अण्णाभाऊ साठे यांची माहिती घेत असताना असे लक्षात येते कि त्यांच्यावर आधी साम्यवादी विचारसरणीचा अधिक प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले. 

अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आणि कविता कोणकोणत्या?

अण्णाभाऊ हे समाजसुधारक असण्याबरोबरच साहित्यिक तसेच लेखक देखील होते. आपल्या साहित्य कारकिर्दीत त्यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्माण केलेले आपणास दिसुन येते. ज्यात त्यांनी अनेक कथा, कादंबरी, नाटक, कविता देखील रचलेल्या आहेत. 

अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली सर्वोत्तम कादंबरी: 

फकिरा : फकिरा ही अण्णाभाऊ साठे यांची मराठीतील फार नावाजलेली कादंबरी .सदर कादंबरीला महाराष्टाच्या उत्तम कादंबरीचा सन्मान देखील प्राप्त झालेला आहे. फकिरा कादंबरीमध्ये संपुर्ण मांग समाजाच्या जीवणाचे चित्रण अण्णाभाऊ साठे यांनी केलेले आहे. मांग लोकांच्या समस्या, त्यांचा पोटासाठीचा संघर्ष या सर्व गोष्टींचे दर्शन सदर कादंबरीतुन घडते. 

अण्णाभाऊंनी लिहिलेल्या काही इतर कादंबऱ्या: 

●     वारणेचा वाघ

●      चित्रा

●      रानगंगा 

●     माकडीचा माळ 

●     वैजयंता 

●      चिखलाती कमळ

अशा अनेक कादंबरींचे लेखन अण्णाभाऊंनी आत्तापर्यत केलेले आहे. वरील कादंबरीमधील पहिल्या क्रमांकाच्या कादंबरीत अण्णाभाऊंनी मांग समाजाचे जीवणचित्रित केलेले आपणास दिसुन येते.

अण्णाभाऊ यांनी लिहिलेल्या कविता : 

1) माझी मैना गावावर राहिली 

2) मुंबईत उंचावरी 

ह्या काही अण्णाभाऊंच्या निवडक तसेच गाजलेल्या कविता आहेत. 

अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही पदवी केव्हा दिली गेली?

अण्णाभाऊ साठे हे संपुर्ण महाराष्टात लोकशाहीर म्हणुन ओळखले जातात. अण्णाभाऊ साठे यांची माहिती घेत असताना हे समजते की अण्णाभाऊंनी तमाशा ह्या कलेला लोकनाटयाची प्रतिष्ठा, मान प्राप्त करून देण्याचे एक महत्वाचे कार्य केले. आपले पोवाडे, गीत आणि लावण्यांचा वापर त्यांनी गरीब कष्टकरी जनतेत विचारांचे बीज पेरण्यासाठी त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी केला. याचमुळे संपुर्ण महाराष्टाने अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली. 

अण्णाभाऊ साठे जयंती केव्हा साजरी केली जाते? 

अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 आँगस्ट रोजी साजरी केली जाते. संपुर्ण मांग समाजातच नव्हे तर सर्व तळागाळातील जातीत देखील त्यांची जयंती मोठया उत्साहाने आणि जल्लोषाने साजरी केली जाते. त्यांच्या जयंतीला गावातुन नाचत-गाजत मिरवणुक देखील काढली जाते. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त निबंध लेखन स्पर्धा देखील घेतल्या जातात. अशा विविध पदधतीने ठिकठिकाणी अण्णाभाऊंची जयंती साजरी केली जाते.

अशाच माहितीपूर्ण लेखासाठी विशेष या पानाला नक्की भेट द्या.


माहितीपूर्ण लेख

error: Content is protected !!