किंडल बुक म्हणजे काय? What is the kindle book?
किंडल म्हणजे एक असे उपकरण (device) ज्याच्या मदतीने E-Book, PDF स्वरूपातील पुस्तक वाचता येतात. ऍमेझॉन या कंपनीने हे उपकरण बाजारात आणले. म्हणजेच किंडल हा ऍमेझॉन या कंपनीचा एक Product आहे. मोबाईल, टॅबलेट प्रमाणेच दिसणारी परंतु फक्त पुस्तक वाचनासाठी बनवली गेलेली वस्तू म्हणजेच किंडल होय. Amazon Kindle मध्ये एकाच वेळेस १००० पुस्तके साठवली जाऊ शकतात. ही साठवलेली पुस्तक म्हणजे किंडल बुक. काही पुस्तके मोफत वाचायला मिळतील तर काही विकत घ्यावी लागतील.
ग्रंथालय किंवा वाचनालय म्हणजे वाचकांसाठी पर्वणीच. मात्र आत्ताच्या तंत्रज्ञाच्या युगात फार वाचनालय दिसत नाहीत. काही जुनी वाचनालयं अजून तग धरून आहेत, जिथे जुनी लोकच जातात. नव्या पिढीला पुस्तक वाचन म्हणजे नकोसे वाटते, मुळात ती आवड निर्माण होण्यासारखे वातावरणच नसल्याने तरूणांना पुस्तक वाचन आवडत नसावे. नवीन वाचनालयं तयार होतात मात्र फक्त उदघाटनासाठी. त्यात उपलब्ध पुस्तके सुद्धा तुटपुंजी.
एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने फार प्रगती केली. पुस्तकांचे E-Book मध्ये रूपांतर झाले. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्पुटर, टॅबलेट अशा अनेक उपकरणांनी पुस्तकाची जागा घेतली. परंतु पुस्तक वाचनाचे वेड असणाऱ्या लोकांसाठी E-Book वाचण्यासाठी ही उपकरणे उपयोगी ठरतात. ई-बुक मुळे प्रत्यक्ष पुस्तक जवळ ठेवायची गरज उरलेली नाही, कारण किंडल बुकच्या मदतीने आपल्या मोबाइल मध्ये असंख्य पुस्तके साठवता येतात आणि पाहिजे तेव्हा वाचन करता येते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की “किंडल बुक मध्ये काय विशेष आहे?” तर किंडल हे फक्त आणि फक्त पुस्तक वाचनासाठी तयार केलेले उपकरण (device) आहे. या मध्ये पुस्तकांशिवाय काहीच साठवता येत नाही. ज्या प्रकारे मोबाइल मध्ये अनेक अप्स डाउनलोड करता येतात, याउलट किंडल मध्ये फक्त पुस्तक समाविष्ट करता येतात. फोटो, चित्रफीत किंवा इतर गोष्टी सेव्ह करता येत नाहीत.
किंडल बुकचे फायदे
फक्त पुस्तक वाचन
किंडल हे उपकरण मोबाईल अथवा टॅबलेट सारखेच दिसत असले तरी त्यात अप्स ठेवता येत नाहीत, काही डाउनलोड करता येत नाही. फक्त E-Book वाचनासाठी याचा उपयोग केला जातो. पुस्तक वाचण्यासाठी एकाग्रता महत्वाची असते. मोबाईल वरती पुस्तक वाचन करत असताना नोटिफिकेशन किंवा इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होऊ शकते. किंडल मध्ये पुस्तकांशिवाय इतर गोष्टी नसल्याने शांततेत एकाग्र होऊन पुस्तक वाचन शक्य होते.
पुस्तक उपलब्धता
कधी कधी आपल्याला हवे असणारे पुस्तक उपलब्ध होत नाही किंवा बाजारात त्याची मिळत नाही. परंतु त्याचे E-Book सहज मिळू शकते. बरीच जुनी पुस्तके आत्ता वाचनासाठी उपलब्ध नाहीत किंवा प्रत मिळत नाही, त्यांची PDF स्वरूपात उपलब्ध असणारी पुस्तके किंडल वर उपलब्ध असतात जी सहज वाचता येतात. किंडल चा हा एक महत्वाचा फायदा आहे.
पुस्तकांचे ओझे
पुस्तकांचे ओझे कधीच नसते, येथे ओझे म्हणजे वजन असा उल्लेख केला आहे. अनेक जणांना प्रवासात पुस्तक वाचन करणे आवडते. किंडल सोबत असेल तर प्रत्यक्ष पुस्तकाची प्रत बाळगणे गरजेचे नाही. एक हजार पुस्तके किंडल मध्ये सामायिक होतात. म्हणजेच एक डायरी इतके उपकरण बाळगून तुम्ही कुठेही पुस्तक वाचन सुरु करू शकता आणि पुस्तकांचा संच बाळगणे गरजेचे नाही.
वाचन अनुभव
हातामध्ये पुस्तक घेऊन वाचन करताना जसा अनुभव येतो अगदी तसाच अनुभव किंडल वर वाचन करताना येईल. कारण ह्या मध्ये कुठलाच रंग नाही, पुस्तकां प्रमाणेच फक्त काळा आणि पांढरा असे दोन रंग आहेत. वाचन करताना डोळ्यांना कसलाच त्रास होत नाही. कारण किंडल मध्ये LED चा वापर केला गेला नाही, अगदी तासंतास सहजपणे पुस्तक वाचन करता येते. पेन्सिलने मुद्दे अधोरेखित देखील करता येतात.
पुस्तक खर्च
E-Book किंवा PDF स्वरूपात असणारी पुस्तके बाजारात मिळणाऱ्या पुस्तकांपेक्षा स्वस्त असतात सहज हाताळता येतात. किंडल वर अनेक पुस्तके मोफत मिळतात.फक्त भारतातील नव्हे तर संपूर्ण जगातील पुस्तके सहज उपलब्ध होतात. PDF स्वरूपात असल्याने प्रत्यक्ष आवृत्ती पेक्षा कमी किमतीत विकत घेता येतात. कमी खर्चात उत्तम दर्जाचे पुस्तक घर बसल्या उपलब्ध होते.

Amazon Kindle Book FAQs:
किंडल अनलिमिटेड म्हणजे काय? What is Kindle Unlimited?
दर महिन्याला काही शुल्क भरून Kindle Unlimited सभासदत्व स्वीकारता येते. जगातील जितके पुस्तके किंडल वर उपलब्ध असतील ते सर्व पुस्तके वाचता येतात. त्यामध्ये E-Book, PDF, Audio Book हे सर्व उपलब्ध असतात. Kindle Unlimited किंडल अनलिमिटेड मध्ये अमर्यादित पुस्तक वाचन करता येते. ज्या कालावधी साठी शुल्क भरले आहे त्या कालावधीसाठी कितीही पुस्तके वाचू शकता.
किंडल इडिशन म्हणजे काय? What is Kindle Edition?
विशेष किंडल साठी तयार केल्या गेलेल्या आणि किंडल डिवाइस साठी उत्तम कार्य करणारे “पुस्तके”.अनेक आहेत जी केवळ Aazon Kindle Edition आहेत. “edition” म्हणजेच आवृत्ती आणि “kindle edition” म्हणजे किंडल साठी तयार केलेली पुस्तकाची आवृत्ती. अशी विशेष पुस्तके मोबाइल अथवा टॅबलेट वरती देखील वाचली जाऊ शकतात. तुलनेने याची किंमत जास्त असू शकते.
- हेही वाचा :
निष्कर्ष
तंत्रज्ञानाच्या युगात काही गोष्टी लोप पावत आहेत तर काही गोष्टींचे अधिक प्रभावीपणे सवंर्धन होत आहे. पुस्तक हे त्यातील एक उदाहरण. ऍमेझॉन किंडल बुक म्हणजे आधुनिक युगातील वाचक वर्गासाठी असलेली उत्तम सोय. यामुळे पुस्तक वाचण्यासाठी कुठेच जाण्याची आवश्यकता नाही. खर्च आणि वेळ दोन्ही गोष्टींचा अपव्यय किंडल बुक मुळे टाळता येतो.
तंत्रज्ञान विषयक लेख