Amazon Great Indian Festival मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? Sale मध्ये कोणकोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत?

शेअर करा

अमेझॉन वर प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या sale मध्ये वस्तू इतक्या स्वस्त का असतात? असा प्रश्न तुम्हाला पडत असेलच, तसेच या सेल मध्ये वस्तू विकत घ्यावी अथवा नाही? हा प्रश्न देखील मनामध्ये येत असेल. बरेच जण या  सेलची वाट पाहत असतात. अनेक ईकॉमर्स वेबसाईट वर भरघोस सूट कुठल्या वस्तूवर असते आणि विकत घेताना काय काळजी घेतली पाहिजे या बाद्द्ल जाणून घेऊ. 

 

बऱ्याच वेळेस बाजारामध्ये असलेल्या किमतीपेक्षा ऑनलाईन किंमतीवर भरघोस सूट उपलब्ध करून दिली जाते. परंतु या मध्ये काही मोजक्याच वस्तू अशा असतात, ज्यावर सूट असते. सरसकट सर्व वस्तूंवर अशी सूट नसते. Smart Phone, LED TV, Washing Machine, Fridge अशा सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट मिळवता येते. तसेच कपडे, शूज, फॅशन, मेकअप अशा वस्तूंवर चांगली सूट असते.

जर तुमच्याकडे Credit Card असेल तर तुम्हाला विना व्याज मासिक हप्त्यावर वस्तू विकत घेता येतील . क्रेडिट कार्ड सेल तर बँकेनुसार अजून ज्यादा सूट मिळवता येईल. यामध्ये २ हजार पासून ते ५ हजारापर्यंतची अधिक सूट मिळवता येते. Amazon Great Indian Festival मध्ये फक्त क्रेडिट कार्ड वर नाही तर डेबिट कार्ड वर देखील ऑफर उपलब्ध आहे. तसेच दोन्ही नसेल तर बजाज नो कॉस्ट चा पर्याय आहे, ज्यामध्ये काही रक्कम आता भरून बाकी रक्कम मासिक हप्त्यावर भरू शकतो. 

ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यायला हवी हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा.

Amazon Great Indian Festival मध्ये कोणकोणत्या गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत?
बाजारापेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तू मध्ये मोबाईल/टीव्ही अशा इलेक्ट्रॉनिक गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत. जेणेकरून तुम्हाला अधिक सूट मिळवून पैसे वाचवता येतील. तसेच फर्निचर, सोफा, टेबल अशा वस्तू घेणे टाळले पाहिजे, ज्यावर जास्त सूट नसते आणि तुलनेने या गोष्टी महाग असतात.

Amazon Great Indian Festival मध्ये Iphone च्या सर्व मॉडेल वरती भरघोस सूट उपलब्ध आहे. Iphone 13, Iphone 14, Iphone 15 असे सर्व पर्याय आणि प्रो, मॅक्स, प्लस कॅटेगरी वर डिस्काउंट आहे. विविध बँकेच्या क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड नुसार मासिक हप्त्यावर apple products विकत घेता येतात.

Amazon Great Indian Festival वर असलेल्या वस्तू आणि बाजारात असलेल्या वस्तू सारख्याच असल्या तरी किमतीत इतकी तफावत का ?
बाजारात असलेले दुकानदार १०, २०, ३० अशा संख्येत माल विकत घेतात, ज्यात त्यांना खरेदी किंमत जास्त द्यावी लागते. याविरुद्ध ऍमेझॉन एकदाच १०००, २००० अशा संख्येत कंपन्यांकडून खरेदी करतात आणि खरेदी किंमत कमी द्यावी लागते. तसेच मागणी जास्त असल्याने कमी नफ्यावर ऍमेझॉन जास्त वस्तू विकू शकतो. पण बाजारातील दुकानदार इतकी कमी किंमत देऊ शकत नाही.

तसेच ऑनलाईन शॉपिंग करताना आपण जो प्रॉडक्ट विकत घेत आहात, त्याचा ब्रँड आणि सत्यता तपासून घेतली पाहिजे. बाजारमूल्य आणि ओनलाईन किंमत सारखी आहे का? सूट खरीच मिळतेय का? हे तपासले पाहिजे. आपण कुठल्या साईट वर विकत घेत आहेत ती नवीन असेल तर सर्व खात्री करून खरेदी केली पाहिजे. 

Leave a Comment

error: Content is protected !!