अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? Affiliate Marketing meaning in Marathi

शेअर करा

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? What is Affiliate Marketing in Marathi?

एखाद्या कंपनीचे उत्पादन विकून त्याबदल्यात काही मोबदला मिळवणे म्हणजे अफिलिएट मार्केटिंग. आपल्या वेबसाईट द्वारे वस्तूंबद्दल माहिती देऊन ती वस्तू घेण्यासाठी लोकांना आवाहन करणे. यातून जर ती वस्तू विकली गेली तर त्या किमतीचा काही भाग (commission) मोबदला म्हणून दिला जातो. अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी वेबसाईट अथवा सोशल मीडिया वर खाते असणे गरजेचे आहे……

Affiliate Marketing meaning in Marathi

Affiliate Marketing meaning in Marathi : ऑनलाईन पैसे कमवण्याच्या मार्गांपैकी affiliate marketing असा प्रकार आहे ज्या मध्ये इतर कुठल्याही मार्गापेक्षा जास्त पैसे कमवता येऊ शकतात. Google AdSense मध्ये आपल्याला click किंवा Impression वर पैसे मिळतात. आपल्या वेबसाईट वर आपण किती ट्रॅफिक आणतो या वर सर्व गोष्टी अवलंबून असतात.

Affiliate Marketing मध्ये आपण कोणतीही वस्तू निवडू शकतो आणि त्याची जाहिरात आपल्या वेबसाईट किंवा सोशल  मीडिया वर करू शकतो. जर कोणी त्या जाहिरातीवर क्लिक करून खरेदी केली तर त्या वस्तूच्या किमती नुसार काही टक्के पैसे मोबदला म्हणून आपल्याला मिळतात. या मध्ये वस्तू शिवाय signup, installation,  registration, click अशा विविध प्रकारच्या जाहिराती मधून देखील पैसे कमवता येतात. 

समजा आपली वेबसाईट इलेक्ट्रॉनिक गॅझेट बद्दल आहे तर आपण त्यावर review, comparison, features या सर्व बाबीवर ब्लॉग लिहू शकता. आपण लिहिलेल्या ब्लॉग मध्ये त्या गॅझेट च्या जाहिराती देऊ शकता. जर त्या जाहिरातीवर क्लिक करून संबंधित अफिलिएट साईट वर खरेदी केली, तर त्याचा मोबदला (commission) आपल्याला मिळेल. जाहिराती साठी लागणारी लिंक किंवा इमेज अफिलिएट वेबसाईट कडून दिल्या जातात. तसेच  आपल्या वेबसाईट च्या आकार आणि जागे नुसार निवडू शकतो.

अशा अनेक वेबसाईट आहेत ज्या विविध जाहिराती द्वारे पैसे कमावण्याची सेवा देतात. या मध्ये शॉपिंग साठी Amazon, Flipkart आणि इतर Commission Junction, Max bounty ह्या वेबसाईट आहेत. आपल्या वेबसाईट ची traffic, niche, speed या गोष्टीं वर Affiliate marketing विक्री अवलंबून असते. Affiliate marketing हे मराठी ब्लॉग वर देखील केली जाऊ शकते, यासाठी भाषेची अट नाही. (Affiliate Marketing meaning in Marathi)

 हेही वाचा :

आपल्याला समजण्यासाठी Amazon Associates Program बद्दल जाणून घेऊ. सर्वात आधी amazon.in वर जाऊन आपल्याला Associate रजिस्ट्रेशन करावे लागेल. amazon.in च्या होम पेज वर सगळ्यात खाली “Become an Affiliate” असा पर्याय दिसेल.

Affiliate Marketing Meaning in Marathi, Affiliate Marketing म्हणजे काय Amazon.in द्वारे पैसे कसे कमवतात
Affiliate Marketing meaning in Marathi

त्यानंतर sign up वर क्लिक करून login करा. या मध्ये दोन मुख्य माहिती तक्ते भरावे लागतील १. Profile २. Traffic and Monetization. तसेच आपला पत्ता, बँक खाते क्रमांक. आयकर विषयक माहिती भरावी लागते. आपण Amazon Associates Program साठी नोंदणी केली आहे.

Amazon वर रेजिस्ट्रेशन केल्यानंतर product link, widgets, tools, report असे पर्याय दिसतील, हा तुमचा डॅशबोर्ड असेल. तसेच आपल्या amazon च्या पेज वर वरती “SiteStripe” हा पर्याय कायम दिसेल. Sitestripe  वर क्लीक करून ज्या प्रॉडक्ट च्या पेज वर आहेत त्या प्रॉडक्ट ची जाहिरात तयार करता येईल. Text, Image, image & Text या तीन पद्धतीमध्ये आपण जाहिरात तयार करू शकता. जाहिरातीची एक विशिष्ठ लिंक दिली जाईल, ती आपल्या वेबसाईट वर टाकावी लागेल. ज्या पेज अथवा ब्लॉग वर जाहिरात करायची आहे तिथे टाकू शकता, या साठी कुठल्याही तंत्रज्ञान विषयी अभ्यासाची गरज नाही.

Affiliate Marketing

वस्तू आणि त्याच्या श्रेणी नुसार amazon ने मोबदल्याची टक्केवारी ठरवली आहे. ज्यामध्ये १% पासून १०% पर्यंत मोबदला दिला जातो. तसेच amazon च्या काही अति आणि शर्ती देखील आहेत ज्या तुम्हला पूर्ण कराव्या लागतील. उदा: आपल्या जवळच्या नतेवाईकांना आणि मित्रांना थेट लिंक पाठवू शकत नाही तसे आढळल्यास amazon आपल्याला मोबदला देत नाही. तसेच आपण रेजिस्ट्रेशन केल्यानंतर १८० दिवस म्हणजेच सहा महिन्यामध्ये कुठल्याही तीन प्रॉडक्ट ची विक्री करावी लागते त्यानंतर आपल्याला परवानगी (approval) मिळते.

अफिलिएट मार्केटिंग कोण करू शकतं? Who can do Affiliate arketing?

ज्या व्यक्तीला इंटरनेट चे थोडेफार ज्ञान आहे तो व्यक्ती अफिलिएट मार्केटिंग करू शकतो. जर तुम्ही सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह आहेत आणि त्यातील सर्व तांत्रिक बाबी हाताळता तर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग सुरु करू शकता, या साठी कोणत्याच कोडींगची आवश्यकता नाही. आपली स्वतःची वेबसाईट असेल तर उत्तम प्रकारे अफिलिएट मार्केटिंग करू शकता. डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट किंवा जाहिरात करणाऱ्या व्यक्ती अफिलिएट मार्केटिंग करू शकतात.

ऑनलाईन झटपट मार्गाने पैसे कमवा असे अनेक ब्लॉग आणि विडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पण झटपट पैशाचा असा कुठला मार्ग नाही जो जास्त दिवस टिकेल. अशा योजनांना बळी पडू नका. Affiliate Marketing मध्ये पैसे कमावण्यासाठी देखील कष्ट घ्यावे लागतात. या मध्ये थोडा वेळ लागतो पण नंतर महिन्याकाठी चांगले उत्पन्न मिळते. स्पर्धा वाढली आहे.त्यामुळे सहजासहजी पैसे कमावणे हे सोपे नाही. आपली वेबसाईट सर्वापेक्षा वेगळी असेल तर लोक भेट देतील आणि त्यावरच पुढील सर्व गोष्टी अवलंबून आहेत. (Affiliate Marketing meaning in Marathi)


संबंधित लेख

error: Content is protected !!