अॅडसेन्स म्हणजे काय? AdSense meaning in Marathi?
AdSense meaning in Marathi | ब्लॉगिंग क्षेत्रात नवीन असणाऱ्यांना हा प्रश्न नेहमी उद्भवतो. सध्या ब्लॉगिंग आवड म्हणून केली जात नाही तर याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होत आहे. म्हणजेच आपण बनवलेल्या ब्लॉग अथवा वेबसाईट मार्फत जाहिरात करणे आणि पैसे कमावणे. सद्यस्थितीत कोणत्याही आर्थिक लाभाशिवाय ब्लॉग लिहिणे हे फार कमी लोक करतात.
आपल्या वेबसाईट वर जर बऱ्यापैकी भेटी (visits) येत असतील तर आपण अनेक मार्गाने आर्थिक लाभ घेऊ शकतो, त्यापैकी एक मुख्य आणि सर्वात जास्त वापर केले जाणारे मार्ग म्हणजे Affiliate Marketing आणि “Google AdSense”. आपल्या वेबसाईट वर जाहिरात केली जाते आणि त्यातून मिळणाऱ्या रकमेचा काही भाग हा आपल्याला मोबदला म्हणून दिला जातो. म्हणजेच गूगल कडून आपल्या ब्लॉग/वेबसाईट वरील काही जागा भाड्याने घेतली जाते, तिथे जाहिरात करून पैसे कमावले जातात.
समजा आपल्या ब्लॉग वर sidebar वर बरीच मोकळी जागा आहे, तर त्या ठिकाणी जाहिरात लावता येते. त्याचप्रमाणे हेडर, मुख्य परिच्छेद (body), फूटर अश्या वेगवेगळ्या जागेवर जाहिरात लावता येते. जागेच्या आकाराप्रमाणे आपण जाहिरात निवडू शकता. वेगवेगळ्या आकाराच्या जाहिराती आधीच उपलब्ध असतात, त्यांचा कोड त्या जागेवर टाकून त्या लावता येतात.
जर हे अजून सोप्या पद्धतीने करायचे असेल तर Auto ads हा पर्याय निवडता येतो. शक्य असेल त्या ठिकाणी आकारानुसार आपोआप जाहिराती टाकल्या जातात. आपल्याला प्रत्येक पानासाठी वेगळे काही करण्याची गरज नसते. एकदा हा पर्याय निवडला की गुगल आपोआप काम करते. तसेच कुठलाच कोड कुठे टाकण्याची गरज नाही. AdSense meaning in Marathi.
अॅडसेन्स साठी अप्लाय कसे करतात?
अॅडसेन्स ला अर्ज करण्याआधी या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. आपल्या वेबसाईट वर contact us, about us, privacy policy हे पेज पाहिजेत. तसेच वेबसाईटवर असलेले लेख आणि प्रतिमा (images) हे कॉपी केलेले नसावेत. अजून सविस्तर वाचण्यासाठी गुगल एडसेंस च्या पॉलिसी पेजवर जाऊ शकता.
https://www.google.com/adsense/start/ या लिंक वर जाऊन आपण अॅडसेन्स साठी अर्ज करू शकता. URL वरती आल्यानंतर SIGN UP NOW यावर क्लिक करा, वेबसाईट लिंक, ई-मेल आयडी आणि कुठलाही एक पर्याय निवडा. त्यानंतर जीमेल आयडी लॉगिन करा. आपला देश निवडा आणि एग्रीमेंट चा स्वीकार करा.

नाव पत्ता आणि बँक खात्याचे स्वरूप ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला दोन कोड दिले जातील. त्यापैकी एक कोड हेडर मध्ये आणि दुसरा बॉडी मध्ये पेस्ट करावा लागेल. जर आपल्याला कोडींग चे ज्ञान नसेल तर, “Insert Headers and footers” प्लगिन डाऊनलोड करून त्यात कोड टाका.
गुगल कडून मान्यता मिळालेल्या ई-मेल लवकरच आपल्याला प्राप्त होईल. गुगल अॅडसेन्स अकाऊंट मध्ये देखील सूचना दिसते. ब्लॉग ला मान्यता मिळाली की Auto ads अथवा manual यापैकी पर्याय निवडा. आपल्या अकॉउंट मध्ये $100 जमा झाल्या शिवाय पैसे खात्यात वाळवता येत नाहीत.
गुगल अॅडसेन्स मान्यतेसाठी लागणार वेळ हा ठराविक नाही. काही वेबसाईट साठी मान्यता मिळण्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकतो तर काहींना लगेच मान्यता मिळते. त्यामुळे आपल्याला काही काळ वाट बघावी लागेल. जर काही बदल गरजेचे असतील तर ते गुगल द्वारे सुचवले जातात. त्यावर काम करून परत अप्लाय करता येते.
एक पेक्षा जास्त वेबसाईट असतील तर त्याच अॅडसेन्स अकाउंट मध्ये जोडू शकता. एकपेक्षा जास्त अॅडसेन्स अकाउंट काढणे हे गुगल पॉलिसी च्या विरोधात आहे. ज्याप्रमाणे पहिली वेबसाईट जोडतात त्याचप्रमाणे दुसरी जोडली जाऊ शकते.
अॅडसेन्स मधून किती पैसे मिळतात?
हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. काही वेळेस जास्त कमाई होते तर काही वेळेस कमी. ज्याप्रमाणे जाहिरातदार ठरवतात त्याप्रमाणे दर ठरतात. प्रत्येक हजार इम्प्रेशन वर जवळपास. $0.50 ते $6.00 मिळू शकतात. तसेच क्लिक जास्त असतील तर अजून जास्त पैसे मिळतात. जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासात आपण स्वतः अथवा मित्रांना क्लिक करण्यास सांगणे असे करू नका. गुगल ला हे समजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि आपले अकॉउंट कायमचे बंद केले जाईल.
गूगल कडून देण्यात येणारा मोबदला कधीच ठराविक नसतो, views, impression, clicks या सर्व गोष्टी यामध्ये तपासल्या जातात आणि शहानिशा करून मग पैसे ठरवले जातात. हा सर्व हिशोब अॅडसेन्स अकाउंट मध्ये पाहता येतो.
सुरुवातीला फार कमी पैसे मिळतील पण चांगली ट्रॅफिक यायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला भरपूर पैसे मिळतील. सुरुवातीच्या काळात झटपट पैशांची अपेक्षा करू नका, चांगला कन्टेन्ट तयार करा आणि ट्रॅफिक वाढवण्यासाठी कष्ट घ्या. आपल्याला नक्कीच यश मिळेल. (AdSense meaning in Marathi).
संबंधित लेख