होम लोन विषयी माहिती सविस्तर. Home Loan information in Marathi

शेअर करा

होम लोन विषयी माहिती

जर आपल्याला आपले स्वतःचे घर बनवायचे असेल किंवा जागा खरेदी करायचे असेल तर आपण त्यासाठी गृहकर्ज घेऊ शकतो. सदर कर्ज हे आपण आपल्याला पाहिजे तसे पाहिजे तेवढे घेऊ शकतो मग ते दहा लाख, वीस लाख किंवा पन्नास लाखापर्यतचे का असेना.आणि हे कर्ज आपल्याला तीस वर्षापर्यत मिळत असते.

कर्ज मिळविण्यासाठी आपल्याला कुठल्याही बँकेच्या फेऱ्या मारायची मुळीच आवश्यकता नाही. यासाठी आपल्याला फक्त आँनलाईन अर्ज करायचा असतो.त्यानंतर अवघ्या एक दोन तासातच कोणती बँक आपल्याला किती कर्ज देऊ शकते हे आपल्याला लगेच समजते. त्यानंतर आपण आपल्याला जी बँक कमी व्याजदरात जास्त कर्ज देत असेल ती बँक आपण निवडु शकतो.

चला तर मग जाणुन घेऊयात होम लोन विषयी माहिती, होम लोनसाठी आँनलाईन अर्ज कसा करायचा? होम लोन साठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती असतात? होम लोन साठी काय पात्रता आवश्यक असते? होम लोन साठी आपल्याला काही तारण ठेवावे लागेल का? 

होम लोनसाठी आँनलाईन अर्ज कसा करावा?

होम लोनसाठी म्हणजेच गृहकर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती पाहायला गेले तर खुप सोप्पी आणि सरळ असते. होम लोन अँप्लीकेशन फाँर्म प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी सगळयात पहिल्यांदा आपल्याला आपला वैयक्तिक रोजगार तसेच व्यवसाय व इतर उत्पन्न आणि धनसंपत्तीचे विवरण करणे गरजेचे असते. सदर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आपल्याला आपली आवश्यक ती कागदपत्रे आँनलाईन देखील सबमीट करावी लागतात.

●     सगळयात पहिले आपण आपले ब्राऊजर ओपन करायचे आणि त्यात सर्च बारमध्ये आपल्याला एका वेबसाईटचे नाव टाईप करायचे आहे ती आहे psb loan in 59 minutes.com

●     त्यानंतर आपल्याला रजिस्टर नावाच्या बटणावर क्लीक करून आपले स्वताचे एक अकाऊंट तयार करावे लागते.ज्यासाठी आपल्याला तिथे आपले नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर तसेच गेट ओटीपी आँप्शनवर क्लीक केल्यावर आपल्या मोबाईलवर जो ओटीपी येईल तो इथे ओटीपी मध्ये टाकायचा. याच्यानंतर सर्व टर्म तसेच कंडिशन अंँक्सेप्ट करून प्रोसिड नावाच्या बटणवर ओके करायचे. याच्यानंतर आपल्याला न्यू पासवर्ड मध्ये जाऊन आपला एक पासवर्ड तयार करावा लागतो आणि तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड मध्ये देखील टाकावा लागतो. मग प्रोसिड बटणावर क्लीक करा.

●     त्यानंतर select your requirement option येईल ज्यातुन आपल्याला कोणत्या प्रकारचे लोन हवे आहे ते आपण निवडु शकतो. यात लोनचे दोन प्रकार दिलेले असतात. बिझनेस लोन आणि होम लोन/पर्सनल लोन/आँटो लोन. बिझनेस लोनमध्ये आपल्याला मुद्रा लोन तसेच MSME लोन काढता येत असते. पण जर आपल्याला होम लोन हवे असेल तर होम लोनवर क्लीक करायचे त्यानंतर प्रोसिड नावाचे बटणवर क्लीक करायचे.त्यानंतर आपल्यापुढे काही आँप्शन येतात. त्यापैकी जे पर्याय आपल्या बाबतीत लागु होते तिथे आपण क्लीक करायचे आणि प्रोसिड वर ओके करायचे.

●     त्यानंतर आपल्याला income tax return आणि आपले ज्या बँकेत खाते आहे त्याचे statement अपलोड करायचे असते.आणि शेवटी प्रोसिड वर ओके करायचे असते.

●     यानंतर आपल्याला आपली personal basic detail देखील fill करावी लागते. जसे की सर्वप्रथम आपले नाव वडिलांचे नाव आडनाव, मग जन्मतारीख, वर्ग, मोबाईल नंबर त्यानंतर वडिलांचे नाव, शैक्षणिक पात्रता, आपली संपुर्ण मिळकत एकुण किती आहे? आपले राष्टीयत्व काय आहे? म्हणजे आपण कोणत्या देशाचे नागरीक आहात. मग आपल्यावर किती जण अवलंबुन आहेत ते द्यायचे. मग शेवटी आपण विवाहीत आहे का अविवाहीत हे देखील तिथे द्यायचे असते. त्यानंतर सर्व माहीती भरून झाल्यावर प्रोसिड बटणवर ओके करायचे.

●     त्यानंतर आपल्याला आपली सर्व employment detail देखील fill करावी लागते. प्रोसिड बटणवर ओके करायचे असते.

●     त्यानंतर मग आपल्याला आपली सर्व contact information देखील fill करावी लागते. यानंतर प्रोसिड बटणवर ओके केल्यावर नियम तसेच अटी येत असतात त्यावाचून आपण त्यावर agree करायचे असते. 

 होम लोन विषयी माहिती
होम लोन विषयी माहिती मराठी home loan information in Marathi

●     मग credit information fill करावी लागते. त्यानंतर देखील प्रोसिड वर ओके करावे, आपले प्रोफाईल पुर्ण झालेले असेल.

●     यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचे लोन हवे आहे त्याची निवड करायची असते. तिथे आपल्याला पर्सनल/होम/ आँटो असे तीन प्रकायचे लोन आँप्शन दिलेले असतात. यात आपल्याला जर होम लोन घ्यायचे असेल तर होम लोनवर ओके करायचे. 

●     त्यानंतर applicant information fill करायची असते त्यात आपण applicant म्हणुन आपले नाव द्यावे  आणि co applicant म्हणुन आपण आपल्या पत्नी भाऊ वडील आई वगैरेंचे नाव देखील देऊ शकतो.

●     यानंतर आपल्याला एक फाँर्म भरावा लागेल ज्यात आपल्याला आपली required loan detail fill करायची असते.

●     त्यानंतर declaration मध्ये आपल्याला कशासाठी कोणत्या हेतूसाठी लोन हवे आहे आपण कोणत्या प्रकारची प्राँपर्टी विकत घेतो आहे ते सर्व द्यावे.

●     मग आपल्यासमोर वेगवेगळया बँकाची यादी येत असते ज्या आपल्याला लोन देऊ शकतात त्यात हे देखील दिलेले असते की कोणती बँक आपल्याला किती लोन देऊ शकते? कोणती बँकेचे किती व्याजदर आहे इत्यादी सर्व काही बँकेविषयी माहीती दिलेली असते.

●    आपल्यासमोर ब्रांच देखील येते. त्यात आपल्याला कोणत्या ब्रांचमधून लोन हवे आहे? ते निवडायचे त्यानंतर मग आपल्यासमोर एक लेटर येते की आपले लोन अँप्रुव्ह झालेले आहे. त्यानंतर आपल्याला एक ईमेल देखील येतो. ज्यात कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहे ते देखील दिलेली असते. 

होम लोनसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती असतात?

होम लोन विषयी माहिती घेत असताना त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राबाबत देखील जाणून घेऊ.

Kyc documents :

●     आधार कार्ड

●      पँन कार्ड

●     मतदान कार्ड

●     ड्रायव्हिंग लायसन्स

●     अँड्रेस प्रूफ

●     पाच ते सहा पासपोर्ट फोटो 

Income documents :

●     3 महिन्याची सँलरी स्लीप 

●     6 महिन्याचे बँकेचे विवरण

●     3 वर्षाचे आयटीआर

●     नौकरीचे प्रमाणपत्र

Property documents:

●     प्राँपर्टीचे सेल अँग्रीमेंट 

●     प्राँपर्टीची फोटो काँपी

Liability documents : 

●     लोन स्टेटमेंट 

●     लोन सँक्शन लेटर 

●     क्लोझर लेटर 

Assets documents :

●     कार आरसी झेराँक्स

●     फिक्स डिपाँझिट 

●     एल आयसी पाँलिसी 

●     बाकीचे प्राँपर्टी पेपर 

●     म्युच्अल फंड 

वरील सर्व कागदपत्रे होम लोन घेण्यासाठी नोकरदार तसेच व्यावसायिक या दोघांनाही लागतात. 

होम लोन घेण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे?

तसे पाहायला गेले तर होम लोन देण्यासाठी प्रत्येक संस्था तसेच बँकेचे आपापले वेगवेगळे नियम अटी असतात पण तरी देखील होम लोन घेण्यासाठी जी सामान्यत पात्रता ही असावीच लागते. ती आपण जाणुन घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला अंदाज येईल.

●     होम लोन घेणारा भारतीय रहिवासी असावा.किंवा तो एन आर आय असला तरी देखील त्याला लोन मिळु शकते.

●     होम लोनला अँप्लाय करण्यासाठी आपले क्रेडिट स्कोर 750 किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते. 

●     होम लोन घेण्यासाठी आपले वय 18 ते 70 वर्ष आहे. 

●     नोकरदारांसाठी कमीत कमी दोन वर्षाचा कार्य अनुभव असणे गरजेचे आहे. 

●     स्वयंरोजगारासाठी कमीत कमी तीन वर्ष जुना व्यवसाय असणे गरजेचे आहे. 


अर्थकारण विषयक लेख

error: Content is protected !!