मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना माहिती

शेअर करा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना माहिती

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची सुरूवात राज्य सरकार द्वारे करण्यात आली. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा प्राप्त करून देण्यासाठी हि योजना अस्तित्वात आली. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना एक अशी योजना आहे जिच्याद्वारे राज्य सरकारच्या वतीने महाराष्टातील शेती करत असलेल्या सर्व शेतकरी बंधुंना शेतीचे सिंचन करण्यासाठी सोलर पंप म्हणजेच सौर उर्जेवर चालणारे सौर पंप उपलब्ध करून दिले जात आहे.

जे जुने डिझेल, विजेचे पंप आहेत त्यांचे परिवर्तन सोलर पंपमध्ये केले जाणार आहे. म्हणजेच जुन्या डिझेल तसेच वीजेच्या पंपच्या ठिकाणी नवीन सौरपंप बसविले जाणार. त्याचबरोबर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी बांधवाला महाराष्ट शासनाच्या वतीने सबसिडीची सुविधा देखील दिली जाते.

चला तर मग ह्या योजनेविषयी अजुन सविस्तरपणे जाणुन घेऊयात की मुख्यमंत्री कृषी पंप योजना नेमकी आहे काय? या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे? ह्या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा? ह्या योजनेच्या इत्यादी प्रमुख बाबींविषयी सविस्तरपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करुयात. 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना काय आहे?

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही एक अशी योजना आहे जी मुख्यत: शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे. ह्या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार महाराष्टातील सर्व गरजू शेतकऱ्यांना सोलार पंप उपलब्ध करून देते. जेणेकरून त्यांना शेतीचे सिंचन करता यावे. 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना उद्दिष्ट काय आहे? 

आपणा सर्वाना चांगलेच ज्ञात आहे की आपला भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे येथील मिळकतीचे प्रमुख साधन सुदधा शेती हेच आहे. पण येथे शेतीसाठी पाहिजे तेवढा पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसल्या कारणाने येथील प्रत्येक शेतकरी हा पिकांना पाणी मिळण्यासाठी पावसाची आतुरतेने प्रतिक्षा करत असतो. म्हणुन शेतकरी बांधवांची हीच गंभीर समस्या कायमची नष्ट करण्यासाठी महाराष्ट सरकारने सदर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा प्रारंभ केला. 

ह्या योजनेद्वारे महाराष्ट सरकार ज्या ज्या शेतकरींना वीजेची पर्याप्त सुविधा उपलब्ध झालेली नाहीये अशा ठिकाणी सोलर पंपच्या माध्यमातुन शेतीचे सिंचन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जावी, हे योजना सुरू करण्यामागचे उद्दिष्ट आहे.

सदर योजने अंतर्गत सौर पंप प्राप्त होऊन शेतकरी बांधवांच्या मिळकतीत वाढ व्हावी तसेच त्यांना बाजारातुन महागडया किंमतीचे सौरपंप खरेदी करण्याची वेळ येऊ नये हे देखील सदर योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना फायदे कोणकोणते?

●     सदर योजनेचा लाभ घेऊन महाराष्टातील सर्व शेतकरी सौर कृषी पंपाचा आपल्या शेतीसाठी फायदा घेऊ शकतात.

●     ह्या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची पाच एकर पेक्षा अधिक शेती असेल त्या शेतकऱ्यांना पाच एचपी तसेच तसेच पाच एकर पेक्षा कमी शेती असलेल्यांना 3 एचपी चे पंप दिले जातात.

●     आनंदाची बाब अशी की सदर योजनेच्या पहिल्या दुसरा आणि तिसरा टप्प्यात सर्व शेतकरी बांधवाना सरकारच्या वतीने तब्बल 25 हजार सौर पंप वितरीत केले जाणार आहेत. ही शेतकरी बांधवांसाठी खुपच लाभदायक बाब आहे.

●     पर्यावरणाचे होणारे प्रदुषण थांबवण्यासाठी तसेच ते कमी करण्यासाठी जुन्या डिझेल पंपांच्या ऐवजी ह्या योजनेअंतर्गत नवीन सौर पंप देखील बसविण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठीची पात्रता काय आहे?

1) सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्टातील मुळ रहिवासी शेतकरी बांधवांनाच प्राप्त होणार आहे. म्हणजेच ह्या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सदर शेतकरी महाराष्टातीलच मुळ रहिवासी असणे गरजेचे आहे.

2) सदर योजनेचा लाभ असे शेतकरी देखील घेऊ शकतात ज्यांच्या शेतीमध्ये सिंचनाचे स्त्रोत त्यांना उपलब्ध आहे. 

3) ज्यांच्या राहत्या विभागामध्ये पर्याप्त वीज उपलब्ध नाहीये असे शेतकरी बांधव सुद्धा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतात. 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती? 

●     आधार कार्ड 

●     ओळखपत्र (आयडेंटीटी कार्ड) 

●     रहिवासी दाखला

●     शेतीची सर्व महत्वाची कागदपत्रे 

●     बँक खात्याचे पासबुक 

●     स्वताचा संपर्क क्रमांक

●     दोन पासपोर्ट साईज फोटो 

वरील सर्व कागदपत्रे जोडणे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरींसाठी बंधनकारक आहे. 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी आँनलाईन अर्ज कसा करायचा?

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करण्याआधी आपल्याकडे आपल्या जमिनीचा सातबारा उतारा, आधार कार्ड आणि आपण एस सी किंवा एसटी प्रवर्गातील असाल तर जातीचा दाखला ह्या सर्व प्रमुख कागदपत्रांच्या स्कँन केलेल्या फाईल आपण आपल्या जवळ आधीपासुन ठेवणे गरजेचे आहे. कारण आँनलाईन अर्ज भरताना आपल्याला ह्या सर्व कागदपत्रांच्या फाईल्स तेथे अपलोड कराव्या लागतात.

त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी सौर कृषी पंप बसविणार असतो त्या जागेचा महावितरण ग्राहक क्रमांक देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे असते.

●     सगळयात आधी आपल्या लँपटाँप तसेच कंप्युटरवर गुगलमध्ये जाऊन सर्च बारमध्ये टाईप करा mahadiscom.in

●     मग महावितरणची वेबसाईट ओपन झाल्यावर आपल्याला तिथे दोन पर्याय दिसतात स्कीन इन्फो आणि बेनिफिशरी सर्विसेस मग बेनिफिशरी सर्विसेस या पर्यायावर ओके केल्यावर आपल्याला बरेच पर्याय दिसुन येत असतात त्यापैकी आपण apply online ह्या पर्यायावर क्लीक करायचे. मग क्लीक केल्यावर आपल्याला पाच पर्याय दिसुन येतात.

1) new customer

2) paid pending customer

3) click here apply for off grid

4) solar agricultural pump 7.5

5) hp load

वरील दिलेल्या पाच पर्यायांपैकी चौथ्या क्रमांकाच्या पर्यायावर आपण अर्ज करण्यासाठी क्लीक करायचा आहे. मग क्लीक केल्यावर एक application form येतो जो आपण इंग्रजी तसेच मराठी ह्या दोन्ही भाषेत भरु शकतो. आपल्याला विचारलेली सर्व माहीती त्या अर्जात अचुकपणे भरायची. 

सौर कृषी पंप बसविण्याचे फायदे कोणकोणते आहेत?

●     शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा प्राप्त होतो.

●     लाईट बीलापासुन आपली मुक्तता होते.

●     पर्यावरणास पुरक असे परिचलन निर्माण होते.

●     डिझेल पंपाच्या तुलनेत शुन्य परिचलन खर्च सौर कृषी पंप बसविल्याने लागतो.

●     ह्या योजनेमुळे शेतकरींना दिवसा देखील सौर उर्जा उपलब्ध होईल.

●     विद्युत पंपासाठी जो दुरुस्ती खर्च आपल्याला करावा लागायचा तो देखील आपला वाचणार आहे.

सौरपंपाची वैशिष्टये कोणकोणती? 

●     सदर योजनेमध्ये फक्त डिसी पंपाचा समावेश केला गेला असुन ह्या डिसी पंपाची कार्यक्षमता ही एसी पंपापेक्षा अधिक जास्त प्रमाणात असते.

●     सौरपंपासोबतच दोन एल ईडी बल्ब विनामुल्य आकारता आपल्याला फ्री मध्ये मिळतात.


error: Content is protected !!