महाराष्ट्र विधानसभा माहिती मराठी

शेअर करा

महाराष्ट्र विधानसभा माहिती मराठी :

विधिमंडळ सभागृह

महाराष्ट्र विधिमंडळाचे मुख्य दोन सभागृह आहेत, विधानसभा आणि विधान परिषद. ज्याप्रकारे भारतीय कायदेमंडळात लोकसभा आणि राज्यसभा असे दोन सभागृह आहेत तसेच राज्यात देखील दोन सभागृह आहेत. दोन्ही सभागृहाचे सदस्य हे निवडून दिलेले आमदार आहेत. यामध्ये लोकांतून निवडून गेलेले, स्थानिक स्वराज्य संथा, राज्यपाल नियुक्त, शिक्षक, पदवीधर अश्या निवड पद्धतीचा समावेश असतो. 

विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 इतकी आहे आणि विधानपरिषदेमध्ये एकूण 78 इतकी सदस्य संख्या आहे. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची निवडणूक पद्धत अत्यंत वेगळी आहे. सामान्य नागरिक निवडणुकीत मतदान करून आमदार विधानसभेत पाठवतात, तर विधान परिषदेत विविध सदस्य हे आमदार निवडून देतात. (महाराष्ट्र विधानसभा माहिती मराठी).

महाराष्ट्र विधानसभा माहिती मराठी
महाराष्ट्र विधानसभा माहिती मराठी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

राज्य सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असते. त्यासाठी निवडणूक आयोगामार्फत अधिसूचना काढली जाते. या अधिसूचनेमध्ये विधानसभा निवडणूक आणि नियम याबाबत सविस्तर माहिती दिली जाते. तसेच महत्वाच्या तारखा जाहीर केल्या जातात. या मध्ये उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत अशी सर्व माहिती दिली जाते.

सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार ठरवतात आणि त्यांना अर्ज वाटप केले जातात, म्हणजेच तिकीट दिले जाते. उमेदवा्रांसाठी शैक्षणिक पात्रता नसली तरी अर्जासोबत अनेक महत्वाची कागदपत्रे जमा करावी लागतात. तसेच काही रक्कम अनामत (deposit) म्हणून भरावी लागते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेआधी कागतपत्रे, अर्ज आणि अनामत रक्कम जमा करणे आवश्यक असते. जर उमेदवार विधानसभा निवडणूक हरला तर ही रक्कम जप्त होते.

निवडणूक प्रचार, चिन्ह, उमेदवार, खर्च या सर्व गोष्टींवर वर निवडणूक आयोगाद्वारे लक्ष ठेवले जाते. आचार संहिता भंग होणार नाही याची दक्षता उमेदवाराकडून घेतली जाते.

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक

विधानपरिषद आमदार हे वेगवेगळ्या निवड पद्धतीने निवडले जातात. जसे विधानसभेत थेट लोकांमधून आमदार निवडले जातात तसे विधान सभेतील आमदारासाठी लोक थेट मतदान करत नाहीत. तर एकूण 78 पैकी 26 जागेसाठी विधानसभेतील आमदार मतदान करतात. स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य म्हणजेच महानगरपालिका नगरसेवक, नगरपालिका नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य हे इतर 26 जागेसाठी मतदान करतात.

महाराष्ट्र विधानसभा माहिती मराठी vidhan parishad maharashtra in marathi
महाराष्ट्र विधानसभा माहिती मराठी

तसेच 14 सदस्य हे राज्यपाल नियुक्त करतात. राज्य मंत्रिमंडळाद्वारे या जागांची शिफारस राज्यपाल महोदयांकडे केली जाते. यात कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होतो. उरलेले 12 सदस्य हे दोन विभागात विभागलेले आहेत. यातील 6 सदस्य शिक्षक मतदार संघातून निवडून दिले जातात आणि इतर 6 सदस्य हे पदवीधर मतदार संघातून निवडून दिले जातात.

विधानसभा अध्यक्ष / सभापती 

विधानसभा अध्यक्ष/सभापती याची निवड सदस्य करतात. यासाठी विधानसभेत प्रस्ताव मांडला जातो आणि सर्वानुमते सहमती दर्शवून विधानसभा अध्यक्ष यांची निवड होते.जी व्यक्ती अध्यक्ष पदासाठी उभी राहते ती व्यक्ती विधानसभा अथवा विधानपरिषद सदस्य असणे बंधनकारक असते. 

सत्ताधारी आणि विरोधक यांच्या मध्ये समन्वय ठेवून निपक्षपातीपणाने काम करण्याची जबाबदारी अध्यक्षांवर असते. विधानसभा अध्यक्ष हे सभागृहाचे सर्वोच्च आहे आणि संविधानानुसार त्यांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. सदस्य नियमांचे उल्लंघन करणार नाहीत याची दक्षता अध्यक्ष घेतात आणि जर उल्लंघन होत असेल तर त्यावर कार्यवाही करण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. महाराष्ट्र विधानसभा माहिती मराठी मध्ये संक्षिप्त स्वरूपात देण्याचा हा प्रयत्न. 


वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खालील चौकटीत नोंदवा.

Comments are closed.

error: Content is protected !!