सी एस आर निधी बद्दल माहिती मराठीत. CSR Information in Marathi.

शेअर करा

CSR Information in Marathi :

  1. सी एस आर म्हणजे काय? What is CSR in Marathi?

    सी एस आर म्हणजे Corporate Social Responsibility. CSR ला मराठी भाषेत “व्यावसायिक सामाजिक जबाबदारी” असे संबोधले जाते. कंपन्यांमध्ये निसर्गातील साधन संपत्तीचा वापर करून नफा मिळवला जातो. त्याबदल्यात परतफेड करण्याची जबाबदारी असावी म्हणून CSR निधीची तरतूद करण्यात आली. खाजगी क्षेत्रातील कंपन्या नफ्याचा काही भाग बाजूला काढून ठेवतात. एक सामाजिक जबाबदारी म्हणून ह्या निधीतून समाजोपयोगी कार्य करण्यात येते. कंपनी कायदा २०१३ मध्ये यासंबंधी तरतुद आहे आणि प्रत्येक खाजगी कंपनीला CSR निधी जमा करणे बंधनकारक आहे.

सामाजिक जबाबदारी

सामाजिक जबाबदारी म्हणजे समाजाप्रती असलेली जबाबदारी. आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि त्यासाठी समाजाला फायदा होईल असे कार्य केले पाहिजे. या कार्यामध्ये विविध गोष्टी केल्या जाऊ शकतात, जसे गरीब मुला-मुलींसाठी शिक्षण उपलब्ध करणे, पाणी, रस्ते, कपडे आणि अन्य बाबी. सामान्य वक्ती साठी सामाजिक जबाबदारी असते तसेच कॉर्पोरेट कंपन्यांसाठी Corporate Social Responsibility लागू होते.

कॉर्पोरेट जबाबदारी

कुठलीही कंपनी व्यवसाय करत असताना त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम समाजावर आणि निसर्गावर होत असतो. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत असताना निसर्गाला कमीत कमी नुकसान होईल असा प्रयत्न असला पाहिजे. तसेच याबदल्यात निसर्गाला परत दिले पाहिजे. वायू प्रदूषण, जलप्रदूषण, पर्यावरणाची हानी या गोष्टी कमी अधिक प्रमाणात होत असतात. हे टाळण्यासाठी अथवा पूर्वजीवात करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.(CSR Information in Marathi).

आर्थिक व सामाजिक हित

विविध करांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो, याच बरोबर सामाजिक विकास देखील महत्वाचा असतो. ज्याप्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेत कंपन्यांचे मोठे योगदान असते, त्याचप्रकारे सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे म्हणून सी एस आर ही एक महत्वाची बाब आहे. जसेआयकर भरणे महत्वाचे आहे. तसेच CSR निधीतून सामाजिक कार्य करणे हे देखील तितकेच महत्वाचे ठरते.

कंपनी मध्ये काम कारणाऱ्या कर्मचारी वर्गाची विशेष काळजी घेतली जाते, वस्तू व सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी काळजी घेतली जाते, ग्राहकाला संतुष्ट करण्यासाठी काळजी घेतली जाते. याचप्रकारे समाजाची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. समाजाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत केली गेली पाहिजे. हीच खरी व्यवसायिक सामाजिक जबाबदारी असते. (CSR Information in Marathi).

CSR निधी

कंपनी कायदा २०१३ कलम १३५ नुसार सी एस आर निधी संकलित करणे बंधनकारक आहे. यामध्ये रक्कम, अटी, उलाढाल, भांडवल अश्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. ज्या कंपन्यांचा नफा ५ कोटीच्या वरती आहे, ज्यांची पत ५०० कोटी पेक्षा जास्त आहे, ज्यांची वार्षिक उलाढाल १००० कोटी पेक्षा जास्त आहे अशा कंपन्यांना CSR निधी जमा करणे बंधनकारक आहे. 

मागच्या ३ वर्षात झालेल्या नफ्याची सरासरी रक्कम हिशोबली जाते, त्या रकमेच्या २% भाग हा CSR निधीमध्ये हस्तांतरित केला जातो. सी एस आर निधी आणि सामाजिक कार्य यांचे व्यवस्थापन करण्यासाठी कंपनी अंतर्गत एक समिती नेमली जाते. समितीद्वारे सी एस आर कुठे खर्च करायचा, कोणते सामाजिक कार्य करायचे व संबंधित बाबी व्यवस्थापित केल्या जातात. एक स्वतंत्र समिती प्रमुख नेमला जातो जो निपक्षपणे काम करतो. 

निष्कर्ष 

गरिबी, कुपोषण, रस्ते, पाणी, अन्न, निवारा असे अनेक प्रश्न देशासमोर आहेत. सी एस आर मार्फत हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. संपूर्ण निराकरण होणार नाही मात्र थोड्याफार प्रमाणात प्रश्न मार्गी लागू शकतात. CSR निधी योग्यप्रकारे कसा वापरावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाटा कंपनी. जवळपास सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारी, सामाजिक कार्य करण्यात देखील अग्रेसर आहे. सरकार कडून होणाऱ्या विविध योजना पेक्षा सी एस आर द्वारे होणारे कार्य वाढले तर देशाची भरभराट होईल यात दुमत नाही. (CSR Information in Marathi).



अलीकडील लेख

  • EPFO UAN KYC अपडेट करण्याची प्रक्रिया
    PF खात्यातून रक्कम काढण्यासाठी UAN मध्ये सर्व माहिती अपडेट करणे बंधनकारक आहे. माहिती अपडेट केली नसेल तर आपल्याला पीएफ रक्कम काढता येणार नाही. यामध्ये KYC म्हणजेच महत्वाची कागदपत्रे आणि त्यातील माहिती EPFO खात्याशी जोडणे. आधार, पॅन आणि बँक खाते हे … Read more
  • IPO म्हणजे काय ? What is IPO Means in Marathi?
    IPO म्हणजे काय ? What is IPO Means in Marathi? IPO म्हणजे Initial Public Offering. एक खाजगी कंपनी ज्यावेळी पहिल्यांदा आपले भाग (shares) विक्रीस काढते त्यावेळी त्यास IPO असे संबोधले जाते. अशा खाजगी कंपन्या ज्या शेअर बाजारात नोंदणीकृत नाहीत, त्यांना … Read more
  • Money Laundering म्हणजे काय?
    भारतामध्ये अनेक प्रकारचे कर भरावे लागतात त्यात व्यापारी असाल तर GST कर भरावा लागतो. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमाप्रमाणे ५ लाखाच्या वर वयक्तिक उत्पन्नावर आयकर भरणे बंधनकारक आहे. तसेच व्यापारी वर्गासाठी २० लाखांच्या वर उलाढाल असेल तर जीएसटी कर भरावा … Read more
  • UAN क्रमांक ऍक्टिव्ह करण्याची प्रक्रिया. UAN Activation Process in Marathi.
    UAN क्रमांक ऍक्टिव्ह करण्याची प्रक्रिया. UAN Activation Process पीएफ रक्कम काढण्यासाठी महत्वाची बाब म्हणजे UAN क्रमांक ऍक्टिव्ह असणे. UAN ऍक्टिव्ह करण्याआधी आपला UAN क्रमांक माहिती हवा. संस्थेतील संबंधित वरिष्ठांना विचारून तो माहित करून घेता येतो. त्याच प्रमाणे EPFO वेबसाईट वरून … Read more
error: Content is protected !!