लोकसभा आणि राज्यसभा फरक
आपल्या भारतीय संविधानात संसदेचे दोन सदन आहेत एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा.लोकसभेला आपण लोकांचे घर असे संबोधत असतो. कारण यात सर्वसामान्य जनतेचा समावेश असतो आणि राज्यसभेला संसदेचे वरचे गृह असे म्हणतात. आज आपण ह्याच दोन महत्वाच्या विषयावर आजच्या लेखातुन जाणून घेणार आहोत की लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे काय असते? लोकसभा आणि राज्यसभा फरक. जेणेकरून आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे नेमकी काय आणि यांच्यात असलेली साम्यता आणि विभिन्नता लक्षात येईल.
लोकसभा म्हणजे काय? महाराष्ट्रातून लोकसभेत किती खासदार निवडून दिले जातात?
संपुर्ण महाराष्टातुन लोकसभेत ४८ खासदार निवडुन दिले जातात. लोकसभेला लोकांचे घर असे संबोधिले जात असते. याच्या सदस्यांची निवड देखील लोकांद्वारेच केली जात असते. लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 552 सदस्य असतात आणि यांच्यातील 530 सदस्य हे राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात. ह्यातील 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत असतात.
लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्ष इतका असतो. लोकसभेमध्ये कोणत्याही एका सदस्याची निवड अध्यक्ष म्हणुन केली जात असते. त्यालाच सभापती असे म्हटले जात असते ज्याला मदत करण्याचे काम उपसभापती हा करत असतो. ज्याची निवड सुदधा लोकसभेद्वारेच केली जात असते.
राज्यसभा म्हणजे काय? महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य पाठवले जातात?
राज्यसभा हे संसदेचे वरचे गृह म्हणुन ओळखले जाते.महाराष्टातुन राज्यसभेवर १९ सदस्य पाठविले जातात.याची सदस्यांची संख्या 250 इतकी असते. राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही लोकांद्वारे न करता विविध राज्यांच्या विधानसभेद्वारे केली जात असते. प्रत्येक राज्यातील सदस्यांची एक निश्चित अशी संख्या ठरवली गेलेली असते. ज्यातील 12 जणांची निवड ही कला साहित्य आणि विज्ञान शाखेसाठी राष्टपतीदवारे केली जात असते.
तसेच उपराष्टपती हा राज्यसभेचा अध्यक्ष असतो. उपाध्यक्षाची निवड ही राज्यसभेच्या सदस्यांमध्येच केली जात असते. राज्यसभेच्या कोणत्याही सदस्याची वयोमर्यादा ही 30 वर्षापेक्षा कमी नसावी. तसेच ह्यात प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा किमान 6 वर्ष इतका असतो.
लोकसभा आणि राज्यसभा फरक
लोकसभा हे सर्वसामान्य जनतेचे सदन असे म्हणतात आणि हे एक कनिष्ठ सदन आहे. राज्यसभा हे एक राज्याची परिषद तसेच कनिष्ठ सदन म्हणुन ओळखले जाते.
- लोकसभेच्या सदस्यांची निवड सर्वसामान्य जनतेद्वारे केली जात असते आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवड ही राज्यसभेच्या नेमलेल्या सदस्यांदवारे होत असते.
- लोकसभेच्या कार्यकाळ हा किमान पाच वर्षाचा असतो.पण राज्यसभेचा सदस्य हा दोन वर्षानी निवृत्त होऊ शकत असतो. त्या एक नवीन सदस्याची निवड यात केली जात असते.
- लोकसभेच्या सदस्यांची संख्या जास्तीत जास्त 552 इतकी असते तर राज्यसभेच्या सदस्यांची संख्या ही कमाल 250 इतकीच असते.
- लोकसभेचा सदस्य बनण्यासाठी आपले वय किमान 25 असणे गरजेचे असते. राज्यसभेचा सदस्य बनण्यासाठी आपले वय हे 30 असणे आवश्यक असते.
- लोकसभेच्या बैठकीचे अध्यक्षपद हा लोकसभेचा अध्यक्ष भूषवित असतो.तर राज्यसभेच्या बैठकीचे अध्यक्षपद उपराष्टपती भुषवित असतो.
- धन विधेयक हे लोकसभेत सादर केले जात असते. राज्यसभेला धन विधेयकासंबंधी कोणताही विशेषाधिकार प्राप्त नसतो.
वरील मुद्दे लोकसभा आणि राज्यसभा फरक स्पष्ट करतात. संसदेचे दोन्ही सभागृह हे पवित्र मानले जातात. संसदेच्या आत आणि परिसरात अनेक नियम लावले गेले आहेत, जेणेकरून संसद भावनांची पवित्रता बाधित होणार नाही.
संबंधित लेख