रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी

शेअर करा

रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी :

रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी | सध्या सगळे जग Covid-19 या जीवघेण्या आजारामुळे त्रस्त झाले आहे. या रोगावरती लस अजून येणे बाकी आहे. जगातील बऱ्याच संस्थांनी आपण लस शोधली असल्याचा दावा केलाय, परंतु लस ची मानवी चाचणी पूर्ण होऊ पर्यंत आपल्याला ती घेता येणार नाही. तो पर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून आपण mask, sanitizer वापरतोच पण आपली प्रतिकार शक्ती वाढवणे हे देखील तितकेच महत्वाचे.

पुरेसे पाणी पिणे

आपल्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर म्हणजेच झंपीतून उठल्यानंतर एक ग्लास पाणी प्यावे, झोपेमुळे शरीरात जी पाण्याची कमतरता होते ती भरून निघण्यास मदत होते. एका दिवसात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्या, त्यात गरम पाणी असेल तर अजून उत्तम.

व्यायाम करणे

रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी
रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी

वजन कमी करण्यासाठी/वाढवण्यासाठी आपण व्यवमचा पर्याय निवडतो. परंतु व्यायामामुळे आपल्या शरीरात होणारा रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. शक्यतो व्यायामासाठी सकाळची वेळ निवडा.

तणाव कमी करणे

रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी

प्रतिकार शक्ती साठी शारीरिक आरोग्याप्रमाणाने मानसिकरीत्या सक्षमसन आवश्यक असते. ताण-तणावामुळे सतत आपल्यावर दबाव येतो आणि त्याचा परिणाम शरीर आणि मनावर होतो. तणाव विरहित जीवनशैली ही उत्तम आरोग्य राखण्यास मदत करते. त्या साठी आपण प्राणायाम, योग हे करू शकतो.

आहारामध्ये फळांचा वापर करणे

रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी

पुरेशा प्रमाणात आहारामध्ये फळांचा वापर करणे हे देखील तितकेच उपयुक्त ठरते. पेरू, संत्री, पपई, सफरचंद या फळांमध्ये व्हिटॅमिन “C” असते जे आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच पालक, गाजर, लिंबू हे देखील उपयुकत ठरतात. महागड्या फळांमध्ये सफरचंद, ब्रोकोली, किवी यांचा समावेश होतो.

सात ते आठ तास झोप

जर तुम्ही तणावमुक्त राहिलात तर आपोआप तुमची झोप पूर्ण होईल आणि त्याचा मनावर सकारत्मक प्रभाव होईल. कमीत कमी सात ते आठ तास झोप ही शरीरासाठी आवश्यक असते. झोप पूर्ण नसेल तर मन आणि शरीराला थकवा जाणवतो, जो आरोग्यासाठी घातक असतो. पुरेशी झोप घेतल्यानंतर मन प्रसन्न राहील आणि शारीरिक थकवा दूर होईल.

हेही वाचा :

आत्ताच्या जागतिक महामारीच्या काळात आपली रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी या साठो हळद देखील उपयुक्त ठरते. कोरोना विरुद्ध लढण्याचा हा उपाय नाही मात्र आपण काही प्रमाणात याला आळा घालू शकतो.

 

वरील लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षा मध्ये नोंदवू शकता.

 

Comments are closed.

error: Content is protected !!