रक्षाबंधन विषयी माहिती. रक्षाबंधन हा सण का साजरा केला जातो? 

शेअर करा

रक्षाबंधन विषयी माहिती

रक्षाबंधन हा एक बहिण भावाच्या या पवित्र्य नात्याला घट्ट करणारा सण म्हणुन सर्व जगभर ओळखला जातो. म्हणुन मुख्यत्वे भारतात ह्या सणाला खुप महत्वाचे स्थान आहे. कारण रक्षाबंधन हा हिंदु धर्मियांचा एक महत्वाचा आणि एक पवित्र सण आहे. 

आजच्या लेखातुन आपण रक्षाबंधन विषयी माहिती सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत. रक्षाबंधन म्हणजे काय? रक्षाबंधन सण का साजरा केला जातो? रक्षाबंधन ह्या सणाचे महत्व काय आहे? रक्षाबंधन हा सण कधी आणि केव्हा साजरा केला जातो? रक्षाबंधन हा सण कशापदधतीने साजरा केला जातो? रक्षाबंधन ह्या सणाचे वैशिष्टय कोणकोणते? इत्यादी सर्व काही आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

रक्षाबंधन म्हणजे काय असे सांगायला गेले तर आपण याची एक सोप्पी व्याख्या करू शकतो ती म्हणजे रक्षेचे बंधन म्हणजेच बहिणीने भावाला तिच्या रक्षणासाठी घातलेले बंधन म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा एक भावाबहिणीच्या प्रेमळ आणिअतुट नात्याचा गोड दिवस. 

रक्षाबंधन सण का साजरा केला जातो? 

रक्षाबंधन विषयी माहिती जाणून घेत असताना इतिहासाचा संदर्भ घेणे अनिवार्य ठरते. जेव्हा देवता आणि राक्षसांमध्ये घमासान युदध झाले होते, त्यात राक्षसांचा पगडा हा देवतांपेक्षा अधिक भारी होता. त्यांचे सामर्थ्य देवतांपेक्षा अधिक होते. ह्यामुळे देवराज इंद्र अतिशय चिंतातुर झाले होते. देवराज इंद्र यांची अशी अवस्था पाहुन त्यांची धर्म पत्नी इंद्रायणी देखील खुप चिंतीत झाली होती. 
मग इंद्रायणीने तिच्या पतीच्या रक्षणासाठी कठोर तपश्चर्या केली आणि त्या कठोर तपश्चर्येतुन एक रक्षाकवच निर्माण केले आणिते रक्षाकवच तिने देवराज इंद्र यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर बांधले. देवराज इंद्र विजयी होऊन सुखरूप इंद्रलोकी परतले, तेव्हा तो दिवस होता श्रावन पोर्णिमैचा. इंद्रायणीने तयार केलेले कवच हे एका पतीव्रता स्त्रीने आपल्या सौभाग्याच्या रक्षणासाठी तयार केलेले कवच होते. पण यानंतर हीच प्रथा पुढे जाऊन भावाबहिणीच्या नात्यामध्ये देखील वापरली जाऊ लागली. तेव्हापासुन रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.

रक्षाबंधन सणाला एवढे महत्व का दिले जाते? 

भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे कारण इथे सर्व धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदतांना आपणास दिसुन येतात. मुख्य म्हणजे भारतात प्रत्येक स्त्रीला माता-बहिणीचा दर्जा दिला जातो. रक्षाबंधन ह्या नात्याला अजुन घट्ट करण्याचे काम करतो. कारण ह्या दिवशी सख्खी बहिण आपल्या भावाला तर राखी बांधतेच पण त्याचसोबत आपल्या नातेसंबंध, शेजारपाजारी, वर्गातील, महाविद्यालयातील मित्र ह्यांना देखील ती राखी बांधत असते. यामुळे सामाजिक सलोख्यात वाढ होते, बंधुत्व निर्माण होत असते. एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा, आपलेपणा अधिक वाढत जातो. 

रक्षाबंधन विषयी माहिती
रक्षाबंधन विषयी माहिती

रक्षाबंधन सण कधी आणि केव्हा साजरा केला जातो? 

रक्षाबंधन ह्या सणाला राखी पौर्णिमा तसेच नारळी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. रक्षाबंधन हा सण दर वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जात असतो. 

रक्षाबंधन सण कशापदधतीने साजरा केला जातो? 

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावासाठी बाजारातुन सर्वात आधी राखी विकत आणते, त्याला ओवाळताना चांगले नवीन कपडे तिने परिधान केलेले असावे यासाठी ती नवीन कपडेही विकत घेते. भाऊही रक्षाबंधनाच्या सणासाठी स्वतःला परिधान करण्यासाठी चांगल्या कपडयांची खरेदी करत असतो. बहिणीसाठी काहीतरी उपहार खरेदी करतो. 

मग बहिण भावाला ओवाळण्यासाठी पुजेचे ताट तयार करते आणि आपल्या भावाला ओवाळत असते. त्याच्या कपाळाला टिळा लावून त्याच्या हातावर राखी बांधत असते. मग ओवाळुन झाल्यावर भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी उपहार देतो. अशा पदधतीने रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. 

रक्षाबंधन सणाचे वैशिष्टय कोणकोणते? 

रक्षाबंधन हा एक असा सण आहे जो फक्त भारतात नव्हे तर संपुर्ण जगभरात मोठया आनंदाने साजरा केला जातो. ह्या सणाला कोणत्याही धर्माचे देखील बंधन नाहीये म्हणुन हा सण हिंदुच नव्हे तर भारतात सर्व धर्मीय मोठया आनंदाने साजरा करत असतात. कारण ह्या सणाला कोणतेही जातीचे किंवा धर्माचे बंधन नाही. ह्या एका सणामुळे आपल्या सामाजिक एकतेत, बंधुत्वात वाढही होत असते. रक्षाबंधन ह्या सणाचे हे एक खुप मोठे वैशिष्टय आपणास पाहायला मिळते.

” रक्षाबंधन विषयी माहिती “ अशाच माहितीपूर्ण लेखासाठी विशेष या पणाला नक्की भेट द्या. माहिती आवडल्यास शेअर नक्की करा.


इतर महतीपूर्ण लेख

error: Content is protected !!