कोरोनासारखा गंभीर आजार जगाला सतावत आहे. सर्व जगातील शास्त्रज्ञ कोरोनावरील लस शोधण्यात अथक परिश्रम घेत आहेत. काही लसी निर्माण सुद्धा करण्यात आल्या आणि अत्यावश्यक वापरासाठी परवानगी देखील देण्यात आली. कोरोना व्हायरस हा कुठून आला, कुठल्या देशात उद्भवला अथवा इतर अनेक प्रश्न उपस्थित होत असताना अजून एक नवीन आव्हान उभे राहिले आहे ते म्हणजे “म्युटेशन”.
म्युटेशन म्हणजे काय? What is Mutation in Marathi?
एका व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होतो हे तर आपल्याला ठाऊक आहे. मात्र संसर्गाची तीव्रता वेगवेगळी असते. कारण कोरोना व्हायरस चा एक प्रकार नसून तो स्वतः मध्ये बदल करत आहे. त्यामुळे कोरोनाचे अनेक प्रकार विविध देशामध्ये दिसून येत आहेत. कोरोना व्हायरस स्वतः मध्ये जो बदल करतोय म्हणजेच म्युटेशन होय.

ज्याप्रकारे कोरोना मानवाला संक्रमित करत आहे, त्याच प्रकारे प्राण्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. प्राण्याला कोरोना झाला हे ओळखणे कठीण आहे. प्राण्यातून माणसाला संक्रमाण झाले तर हा व्हयरस नवीन रूप धारण करतोय. हे नवीन रूप म्हणजेच म्युटेशन होय. यालाच नवीन स्ट्रेन असे देखील संबोधले जाते.
डिसेंबर 2019 साली कोरोना व्हायरस अस्तित्वात आला. थोड्या कालावधीनंतर तो जगाला घातक ठरत आहे असे निदान झाले आणि कोरोना प्रतिबंधीत लसीसाठी संशोधन सुरु झाले. त्यावेळेस पसरलेल्या व्हायरसला अनुसरून लस संशोधन सुरु करण्यात आले. मागच्या वर्षी अनेक लसी शोधण्यात आल्या आणि तात्पुरती मान्यता देखील दिली गेली. नवीन स्ट्रेन, म्युटंट, म्युटेशन हे सर्व शब्द एकाच संदर्भात आहेत.
परंतु नवीन स्ट्रेन वर ही लस प्रभावी आहे का? असा प्रश्न उदभावला. डॉक्टरांच्या मते नवीन आणि जुना या दोन्ही व्हायरस वर लस प्रभावी आहे. कारण लस संशोधन हे व्हायरसच्या मुख्य गाभा असणाऱ्या विषाणूनुसार करण्यात आले आहे. व्हायरस तोच फक्त अधिक लोकांना संक्रमित करण्याची क्षमता तो प्राप्त करत आहे.
त्यामुळे संशोधन करण्यात आलेल्या सर्व लसी कोरोनाच्या म्युटेशन वर देखील प्रभावी आहेत. काही लोक याविषयी शंका व्यक्त करत आहेत मात्र त्यांना कुठलाच शास्त्रीय आधार नाही. तसेच नवीन स्ट्रेन हा फक्त जास्त प्रभावीपणे लोकांना संक्रमाण करत आहे आणि लक्षणे तीच आहेत. तसेच WHO ने देखील यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. (Meaning of Mutation in Marathi).
संबंधित लेख