वर्डप्रेस वेबसाईट साठी ५ महत्वाचे प्लगिन
वेबसाईट/ब्लॉग बनवण्यासाठी वर्डप्रेस हे माध्यम वापरले जाते. ज्यांना तांत्रिक गोष्टीचे जास्त ज्ञान नाही अशा व्यक्तींना वर्डप्रेस अगदी उपयुक्त आहे. वर्डप्रेस मध्ये “Plugin” हे फार महंतांचे आहेत. प्लगिन शिवाय जास्त प्रभावी पणे वेबसाईट बनवणे अथवा देख्ररेख करणे अगदी अवघड असते. वर्डप्रेस वेबसाईट साठी ६ महत्वाचे प्लगिन बाबत जाणून घेऊ.
१. Rank Math : सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन साठी
वेबसाईट कुठल्याही प्रकारची असली तरी search engine मध्ये सर्वात वरती असण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. या मध्ये स्पर्धा वाढली आहे, कारण प्रत्येक जण आपली वेबसाईट टॉप ला रँक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. या साठी Rank Math SEO हे प्लगिन उपयुक्त आहे. याच्या वापरासाठी कुठल्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही. बाकी कुठल्याही SEO plugin मध्ये आपल्याला अधिक पैसे देऊन प्रीमियम प्लॅन घ्यावा लागतो. Rank Math मध्ये सर्व वैशिष्ट्ये अगदी मोफत मिळतात, या साठी अधिक पैसे देण्याची गरज नाही.
या प्लगिनचा वापर करणे देखील सोपे आहे. याची रचना समजण्यास सोपी आहे तसेच सेटअप देखील लवकर करता येतो. जर आपण आधीच SEO प्लगिन वापरात असाल तर Rank Math सेटअप करते वेळी आधीच्या SEO प्लगिनचा बॅकअप घेण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे, जेणेकरून आधी केलेल्या कामावर कुठलाच परिणाम होणार नाही.
२. Autoptimize : वेबसाईट स्पीड साठी
वेबसाईटचा लोड टाइम वापर कर्त्या साठी आणि SEO साठी महत्वाचा असतो. जेवढ्या वेळेस आपली वेबसाईट पहिली जाते त्या प्रायटेक वेळेस Cache जमा होत असतो. हा cache साफ करणे गरजेचे असते, त्यामुळे वेबसाईट अधिक जलद गतीने लोड होते. जर वेबसाईट ५ सेकंद पेक्षा जास्त वेळ घेत असेल तर आपल्याला स्पीड वाढवण्याची गरज आहे. Autoptimize प्लगिन हे cache साफ करण्याचे काम करते.
CSS, Java Script, Images या सर्व गोष्टींमुळे cache तयार होतो. या प्लगिन चा सेटअप करताना हे सर्व पर्याय निवडता येतात. “Clear cache” असा पर्याय आपल्या डॅशबोर्ड वर दिसतो ज्यावर क्लिक करून cache साफ करता येतो.
३. Smush : इमेजेस कॉम्प्रेस करण्यासाठी
आपल्या पोस्ट अथवा पेज वर वापलेल्या इमेजेस जास्त जागा घेत असतील, म्हणजेच जास्त kb मध्ये असतील तर लोड टाइम वाढतो. त्यासाठी इमेजेस कॉम्प्रेस करण्याची गरज असते. Smush प्लगिन मध्ये clarity कमी न करता इमेजेस कॉम्प्रेस केल्या जातात.
या प्लगिन मध्ये LazyLoad हा पर्याय देखील आहेत. वापरकर्त्याने जर पेज स्क्रोल केला तरच इमेजेस दिसतील. म्हणजेच आपल्या वेबसाईट ची स्पीड वाढेल. काही theme मध्ये हा पर्याय आधीच उपलब्ध असेल तर Smush मधील lazyload हा पर्याय बंद करू शकतो. हे प्लगिन मोफत आहे.
४. SSL Zen : Secure कनेक्शन साठी
वापर कर्त्या साठी आपली वेबसाईट सुरक्षित असणे गरजेचे आहे. वेबसाईट जर सुरक्षित नसेल तर, URL च्या बाजूला “This connection is not secure” अशी सूचना येईल. इंटरनेट च्या माध्यमातून फसवणूक वाढली आहे, त्यामुळे वापर-कर्ता अधिक जागरूक झाला आहे. SSL Zen प्लगिन आपली वेबसाईट Secure करते. SSL म्हणजेच Secure Socket Layer या साठी लागणारे प्रमाणपत्र दिले जाते.
इन्स्टॉलेशन साठी स्टेप्स दिल्या आहेत, अगदी सोप्या पद्धतीने इन्स्टॉल करू शकता. SSL Zen मोफत आहे, फक्त दर तीन महिन्याला एकदा renew करावे लागते. renewal ची सूचना एक महिना अगोदर ई-मेल वर दिली जाते. या साठी आधीचे सर्टिफिकेट काढून त्या जागेवर नवीन जोडावे लागते.
५. UpdraftPlus : बॅकअप साठी
वर्डप्रेस वर काम करत असताना अनेक वेळेस चुकीच्या प्लगिन/थीम सेटिंग मुळे, डेटा बसे ला धोका निर्माण होतो. काही वेळेस संपूर्ण वेबसाईट चा डेटा निघून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी बॅकअप घेणे महत्वाचे आहे. UpdraftPlus या प्लगिन च्या मदतीने आपण संपूर्ण बॅकअप संपादित करून ठेऊ शकता. जर कधी अडचण आली तर हा डेटा अपलोड करून वेबसाईट परत ठीक करता येईल.
होस्टिंग सेवा देणाऱ्या कंपनी तर्फे देखील बॅकअप पर्याय दिला जातो मात्र त्यासाठी अधीक पैसे मोजावे लागतात. UpdraftPlus हे मोफत प्लगिन आहेत या साठी अधिक पैसे देण्याची गरज नाही.
६. Sucuri Security : हॅकिंग सुरक्षेसाठी
जर वेबसाईट नवीन बनवलेली असेल तर त्याला हॅकिंग चा धोका नसतो. पण हळू हळू वेबसाईट च्या पोस्ट तसेच व्हिसिट वाढतात आणि प्रसिद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे हॅकिंग चा अथवा डेटा चोरी चा धोका वाढतो. नवीन थिम, प्लगिन, सेटिंग या सर्व गोष्टीचे निरीक्षण आणि ई-मेल सूचना Sucuri प्लगिन द्वारे दिल्या जातात.
जास्त सुरक्षेसाठी याचे प्रीमियम व्हर्जन घ्यावे लागेल. जर आपली वेबसाईट नवीन असेल तर काही काळासाठी मोफत सेवा वापरू शकता. नंतर गरज भासल्यास आपण अपडेट करू शकता.
वर्डप्रेस वेबसाईट वर काम करत असताना, होस्टिंग पासून ते कन्टेन्ट पर्यंत स्वतः लक्ष द्यावे लागते. हा नवीन गोष्टी शिकण्याचा काळ असतो. जास्त वेळ नवीन शिकण्यासाठी आणि रिसर्च करण्यासाठी खर्च होतो, जे प्रत्येका कडून अपेक्षित आहे. गूगल च्या मदतीने सर्व गोष्टीचे ज्ञान घेणे सोपे झाले आहे. नवीन ब्लॉगिंग करू पाहणाऱ्या व्यक्तीसाठी वरील माहिती नक्कीच उपयुक्त ठरेन.
या लेखाबद्दल आपला अभिप्राय आणि प्रतिक्रिया खाली दिलेल्या संपर्क कक्षात नोंदवा.
संबंधित लेख