भारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी

शेअर करा

भारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी :

लोकशाही मध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्थांपैकी एक संस्था म्हणजे भारतीय निवडणूक आयोग (Election Commission of India). लोकशाही मूल्यांचे पालन करून आणि स्वतंत्रपणे निवडणूक व्यवस्थापन करणे  हे या संस्थेचे मुख्य काम आहे. देशपातळीवरील अथवा राज्य पातळीवरील निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणे, कोणताही अनुचित प्रकार होत असेल तर त्याला आला घालणे अशा अनेक जबाबदाऱ्या निवडणूक आयोगाकडे असतात. भारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी मराठी मधून ….

1. स्थापना 

२५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली गेली. राजकीय पक्ष नोंदणी, निवडणूक चिन्ह, पक्ष देणग्या हिशोब, निवडणूक जाहीर करणे आणि संबंधित विविध काम भारतीय निवडणूक आयोगाद्वारे केले जातात. भारतीय राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोग संबंधित तरतुदी दिल्या आहेत (३२४ ते ३२९क). निवडणूक आयोग स्थापना दिवस हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.

2. आयुक्त नेमणूक

भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे, मुख्यालयाचे प्रमुख म्हणजेच आयोगाचे मुख्य आयुक्त असतात. राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात तसेच सहाय्यक आयुक्तांची नेमणूक केली जाते. भारतातील सर्वोच संस्था म्हणून निवडणूक आयोगाची गणना केली जाते. यामुळे निवडणूक आयुक्त पद हे न्यायमूर्ती पद प्रमाणे असते.

निवडणूक आयोगाचे आयुक्त यांचा कार्यकाळ ६ वर्ष अथवा वयवर्षे ६५ जे आधी पूर्ण होईल ते ग्राह्य धरले जाते. कार्यकाळ संपण्याआधी पदमुक्त व्हायचे असेल तर, राष्ट्रपती यांच्या कडे राजीनामा सुपूर्द करण्यात येतो. तसेच कायदयानुसार राष्ट्रपती हे आयुक्तांना पदमुक्त करू शकतात (अपवादात्मक परिस्थिती मध्ये). 

3. राज्य निवडणूक आयोग 

महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना २६ एप्रिल १९९४ मध्ये करण्यात आली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत  यांच्या निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य आयुक्त द्वारे नियंत्रित केला जातो तसे राज्यात मुख्य निवडणूक अधिकारी द्वारे निवडणूक नियंत्रित केल्या जातात. मुख्य निवडणूक अधिकारी याना जिल्हाधिकारी, तहसीलदार निवडणूक प्रक्रियेमध्ये मदत करतात.

4. यंत्रणा 

निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर निवडणूक व्यवस्थापन करण्यासाठी एक यंत्रणा उभी केली जाते. राज्य निवडणूक आयोगाद्वारे यंत्रणा आखली जाते. या मध्ये शासकीय सेवेमध्ये असणारे कर्मचारी आणि अधिकारी नेमले जातात. अनुभव आणि पदाच्या दर्जाप्रमाणे काम सोपवण्यात येते. निवडणूक संपल्यानंतर सर्व कर्मचारी पूर्वपदावर काम करण्यास जातात.

राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग या दोन्ही यंत्रणा लोकशाही साठी अत्यंत महत्वाच्या आहेत. कोणत्याही दबावाशिवाय आणि स्वायत्तपणे कार्य करणे हि मोठी जबाबदारी यांच्यावर असते. निवडणूक प्रक्रियेमध्ये अनुचित प्रकार घडू न देणे, मतदान केंद्रावर लक्ष ठेवणे, कायद्यानुसार कार्यवाही करणे  या बाबी महत्वाच्या असतात. (भारतीय निवडणूक आयोग माहिती मराठी)


अलीकडील लेख :

 • NCB विषयी माहीती
  NCB विषयी माहीती मराठी Narcotics Control Bureau ही एक गुप्तचर संस्था आहे जिचे प्रमुख काम हे अवैधपणे  होणारी ड्रग्जची तस्करी थांबवणे तसेच त्यावर आळा घालणे हे आहे. Narcotics Control Bureau ही संस्था समाजात ज्या अवैध तसेच मादक पदार्थाची जी तस्करी केली जाते. त्या तस्करीला थांबवण्यासाठी गुप्तपणे कार्य करत असते.  आजच्या लेखातुन आपण ह्याच एन-सी-बी म्हणजेच … Read more
 • ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी?
  ऑनलाईन शॉपिंग आज स्मार्ट फोन आणि इंटरनेट आल्यामुळे आपणा सर्वाना कोणत्याही वस्तुची घरबसल्या खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. एका क्लीकवर आज आपण हजारो नही तर लाखोची खरेदी करू शकतो.  पण ज्या पदधतीने आँनलाईन खरेदी केल्याने आपल्याला आपला वेळ, उर्जा यांची बचत करून कोणतीही वस्तु, प्रोडक्ट, सर्विस घरबसल्या प्राप्त करता येते. याने आपल्या पैशांची देखील … Read more
 • पत्रकार कसे बनावे?
  पत्रकार कसे बनावे? आज पत्रकारीतेला आपण लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दर्जा देत असतो. आणि पत्रकारीता म्हटल की पहिले आपल्याला वर्तमानपत्र आठवतात. कारण आज जगातील प्रत्येक व्यक्तीच्या दिवसाची सुरूवात गरम चहा आणि हातात वर्तमान पत्र ह्या दोन गोष्टींद्वारेच होत असते. वर्तमान पत्रातील हे लेख पत्रकार लिहित असतो. ह्यात काही छोटे मथळे देखील असे असतात जे इतर लेखकांनी … Read more
 • इथेनॉल बद्दल माहिती. इथेनॉलची निर्मिती, वापर आणि फायदे
  इथेनॉल बद्दल माहिती इथेनॉल हे एक अल्कोहोल असते. ज्याला एथिल अल्कोहोल असे देखील संबोधित केले जाते. आपल्या देशाचे सरकार आता ऊसापासुन इथेनॉल तयार करण्याबरोबरच तांदुळा पासुन इथेनॉल तयार करण्याच्या तयारीला देखील लागलेले आपणास दिसुन येते आहे. भारत हा एक असा देश आहे जिथे उसाचे उत्पादन हे फार अधिक प्रमाणात केले जाते. म्हणुन येथे उसाच्या रसापासुन साखर … Read more
 • बिग बॉस शो विषयी माहिती 
  बिग बॉस शो विषयी माहिती आज आपण प्रत्येक जण टिव्हीवर वेगवेगळया प्रकारच्या मालिका तसेच शो बघत असतो. ज्या शो मुळे आपले भरपुर मनोरंजन होत असते आणि तो शो वास्तवावर आधारलेला असतो. असाच एक वास्तवावर आधारलेला शो म्हणजे बिग बॉस. आपल्याला प्रत्येकाला वाटते की आपण देखील बिग बॉस सारख्या टिव्ही शो वर झळकावे, जगभरातील लोकांनी आपल्याला … Read more

error: Content is protected !!