बिग बॉस शो विषयी माहिती
आज आपण प्रत्येक जण टिव्हीवर वेगवेगळया प्रकारच्या मालिका तसेच शो बघत असतो. ज्या शो मुळे आपले भरपुर मनोरंजन होत असते आणि तो शो वास्तवावर आधारलेला असतो. असाच एक वास्तवावर आधारलेला शो म्हणजे बिग बॉस.
आपल्याला प्रत्येकाला वाटते की आपण देखील बिग बॉस सारख्या टिव्ही शो वर झळकावे, जगभरातील लोकांनी आपल्याला बघावे आपल्या कार्याचे देखील कौतुक करावे. पण बिग बॉस म्हणजे काय? त्याचे स्वरूप कसे असते? तिथे जाण्यासाठी आपल्याला काय करावे लागते? आपल्याला मानधन कसे प्राप्त होते हे माहीत नसते.
याचकरीता बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणुन भाग घेऊ इच्छित तसेच बिग बॉस शो विषयी संपुर्ण माहिती जाणुन घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आज बिगबॉस ह्या शो विषयी आपण आजच्या लेखातुन सविस्तर माहिती जाणुन घेणार आहोत.
बिग बॉस काय आहे ?
बिग बॉस ही टेलिव्हिजनवर प्रसारीत केली जाणारी एक अशी मालिका आहे जी वास्तवावर आधारलेली आहे. ही मालिका बिग ब्रदर ह्या टिव्ही शो प्रमाणेच असलेली आपणास दिसुन येते. इथे जिंकण्यासाठी आपल्याला काही अवघड टास्क दिले जात असतात जे पार पाडणे अत्यंत गरजेचे असते.
बिग बॉसची सुरूवात कधी झाली होती?
बिग बॉसची सुरूवात सर्वप्रथम 2006 मध्ये करण्यात आली होती आणि याच्या पहिल्या शो चे प्रकाशन 3 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.
बिग बॉस हा शो कशावर दाखवला जातो?
बिग बॉस हा शो प्रत्येक वर्षी आपणास कलर टिव्ही ह्या टिव्ही चँनलवर पाहायला मिळत असतो. तसेच आपण हा शो वुट अँप वरून देखील बघु शकतो.
बिग बॉसच्या शो चे स्वरुप काय असते?
बिग बॉसच्या शो साठी काही प्रसिदध तसेच टेलिव्हिजन वरील शो तसेच मालिकांमध्ये काम करत असलेल्या सेलिब्रिटीजची निवड केली जाते. सोबतच एक सेलिब्रिटी नसलेल्या सर्वसामान्य व्यक्तीची देखील ह्या शोसाठी निवड केली जात असते. बिग बॉसच्या शो मध्ये सर्व स्पर्धकांना एका अशा घरात ठेवले जात असते. जिथुन त्या स्पर्धकांना बाहेर काय घडते आहे? काय चालु आहे? याविषयी काहीच कळत नसते.
आठवड्यातुन एकदा सर्व स्पर्धक आपल्या गटातील कोणत्याही दोन कमकुवत जणांना आपल्या घरातुन बेदखल करण्याचे सुचवत असतात. आणि मग प्रत्येक स्पर्धक आपल्या गटातील दोन कमकुवत सदस्यांना घरातुन बेदखल करण्यासाठी नामांकन करून झाल्यावर लोकांकडुन ह्या बाबद मतदान केले जाते.
मग मतदान करून झाल्यावर स्पर्धकांनी नामांकित केलेल्या गट सदस्यांपैकी एक सदस्याला घरातुन बाहेर काढले जात असते. म्हणजेच घरातुन बेदखल केले जात असते. शेवटी बिग बॉसच्या घरात तीनच सदस्य अंतिम आठवडयात उरत असतात. मग लोकांकडुन मतदान केले जाते हे ठरविण्यासाठी की ह्या स्पर्धेचा विजेता या तिघांपैकी कोण आहे? अशा पदधतीने बिग बॉसचा शो असलेला आपणास दिसुन येते.
बिग बॉस साठी स्पर्धकांची निवड कशी केली जाते?
बिग बॉस हा एक टेलिव्हिजनवर प्रसारीत केला जाणारा असा रिअँलिटी शो आहे जिथे मोठमोठे टिव्ही सीरीयल मध्ये काम करणारे सेलिब्रिटीज नाही तर कोणीही सर्वसामान्य व्यक्ती देखील जाऊ शकतो. पण त्यासाठी काही निवड प्रक्रिया असते जी आपल्याला पुर्ण करावी लागत असते. ज्यात आपल्याला उत्तीर्ण व्हावे लागते. बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणुन भाग घेण्यासाठी आधी आपल्याला एक आँडिशन द्यावे लागत असते.
बिग बॉसच्या आँडिशनमध्ये जाण्यासाठी लागणारी पात्रता
1) आँडिशनमध्ये भाग घेण्यासाठी आपली वयोमर्यादा ही किमान अठरा असणे गरजेचे असते.
2) आपण भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे.
3) आपला कोणताही गुन्हेगारी प्रवृत्तीचा भुतकाळ नसावा. (क्रिमीनल बँकग्राऊंड)
4) आपल्याला कुठलाही शारीरीक तसेच मानसिक आजार नसावा.
एवढेच नाही तर बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणुन अर्ज करण्यासाठी आपल्याकडे काही महत्वाची कागदपत्रे देखील असावी लागतात. जी आपल्याला जमा करावी लागतात. ती महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत:
बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणुन भाग घेण्यासाठी आपल्याला आपली नाव नोंदणी देखील करावी लागते.
बिग बॉस मध्ये भाग घेण्यासाठी पुर्ण करावयाची नोंदणीप्रक्रिया
सर्वप्रथम आपल्याला बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणुन का जायचे आहे? हे आधी सांगावे लागते. सोबतच आपल्याला एक फाँर्म देखील भरावा लागतो. ज्यात आपली सर्व माहिती आपल्याला भरावयाची असते. उदा, आपले नाव, आपला पत्ता, वय, ऊंची, सोशल मिडिया डिटेल.
मग बिग बॉसच्या शो मध्ये स्पर्धक म्हणुन भाग घेण्यासाठी आँडिशन देऊन झाल्यानंतर आपण बिग बॉसच्या आँफिशिअल साईटवर जाऊन आपले नाव देखील नोंदवु शकतो.
बिग बॉसच्या घरातील नियम व अटी काय असतात?
बिग बॉसच्या शो चे जे काही नियम असतात. ते बिगबॉस स्वता ठरवत असतो गरज पडल्यावर ह्या नियमांमध्ये फेरबदल करण्याचा देखील अधिकार बिग बॉस कडेच असतो.
तसे पाहायला गेले तर बिग बॉसच्या नियमांमध्ये प्रत्येक वेळेला बदल केले जात असतात. म्हणुन आपण याच्या नियमांविषयी निश्चित सांगु शकत नाही पण बिग बॉसच्या शो चे काही प्राथमिक नियम आहेत ज्याचे पालन प्रत्येक स्पर्धकाला करावे लागत असते.
बिग बॉसचे काही प्राथमिक नियम पुढीलप्रमाणे आहेत :
1) बिग बॉसच्या प्राथमिक नियमानुसार सर्व स्पर्धकांना एका घरात ठेवले जात असते.
2) सर्व स्पर्धकांना एकमेकांना बाहेर काढण्यासाठी तसेच एकमेकांचा बचाव करण्यासाठी,मतदान करण्याचा इथे अधिकार दिलेला असतो.
3) कोणत्या सदस्याला बाहेर करायचे? कोणाला नाही? हे बिग बॉस स्वता निवड प्रक्रिया करून ठरवत असतो.
बिगबॉस मध्ये अंतिम विजेता कोण आहे हे कसे ठरवले जाते?
बिग बॉसच्या शो मध्ये सर्व स्पर्धकांना एका घरात ठेवल्यानंतर आठवडयातुन एकदा सर्व स्पर्धकांनी विचारले जात असते की तुमच्या गटातील कमजोर खेळाडु कोण आहे? मग सर्व स्पर्धक आपल्या गटात कोण कमजोर खेळाडु आहे हे सुचवत असतात आणि मग स्पर्धकांना आपल्या गटातील ज्या कमकुवत खेळाडुंचे नाव सुचवलेले असते त्या पैकी एकाला बाहेर केले जाते.
मग शेवटच्या आठवडयात जे स्पर्धक उरत असतात त्यांच्यात कोण कोण विजयी झाले आहे? हे जनता आपले मत देऊन ठरवत असते. यात ज्याला जास्त मत पडतात तो विजयी घोषित केला जातो.
बिग बॉसमध्ये विजेत्याला काय बक्षीस दिले जाते?
बिग बॉसमध्ये जनतेने ज्याला जास्त मतदान केलेले असते त्याला शेवटी विजयी घोषित केले जात असते. आणि त्या विजेत्या स्पर्धकाला बिग बॉसकडुन एक विशेष भेटवस्तु तसेच कमीत कमी पन्नास लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम बक्षिस म्हणुन दिली जात असते. असे देखील म्हटले जाते की अनेक सेलिब्रेटीज ह्या शो मधुन करोडोंचे देखील मानधन प्राप्त करत असतात.
बिग बॉस शो ची कोणकोणती रोचक तथ्ये आपणास पाहावयास मिळतात?
बिग बॉस हा एक असा रिअँलिटी शो आहे जिथे आपल्याला थटटा मस्करी, प्रेम, भांडण, वादविवाद इत्यादी सर्व काही पाहायला मिळत असते.
बिग बॉस मध्ये जाण्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतात का?
असे म्हटले जाते बिग बॉस शो मध्ये जाण्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पण जेव्हापासुन सर्वसामान्य व्यक्ती देखील बिग बॉस मध्ये जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तेव्हापासुन काही प्रमाणात प्रवेश फी देखील आपल्याकडुन बिग बॉस मध्ये जाण्यासाठी आकारले जाऊ लागली आहे असे आपणास दिसुन येते.
बिग बॉसच्या शो मध्ये बिग बॉसचा ऐकु येणारा आवाज कोणाचा आहे?
बिग बॉसच्या शो मध्ये आपल्याला जो आवाज ऐकु येत असतो. तो आवाज प्रसिदध ध्वनी कलाकार अतुल कपुर यांचा आहे.