फेसबुक खाते बंद कसे करावे?

शेअर करा

फेसबुक खाते बंद कसे करावे?

काही वेळेस एक पेक्षा जास्त अकाउंट, जुने नवीन अकाउंट अथवा इतर कारणाने फेसबुक खाते बंद करण्याचे ठरवले जाते. जर आपल्याला आपले फेसबुक खाते बंद करायचे असेल तर आपल्या मोबाईल अथवा कम्पुटरद्वारे लॉगिन करून डिलीट करू शकता. फेसबुक अकाउंट डिलिट करताना तात्पुरते बंद किंवा कायमचे बंद असे दोन पर्याय दिले गेले आहेत. 

सर्वात आधी आपल्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वर लॉगिन करावे लागेल. आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा. जर आपला पासवर्ड अथवा आयडी विसरला असेल तर आधी रीसेट करून घ्यावा लागेल. त्यासाठी लॉगिन करताना forgot password/username या पर्यायावर क्लीक करा. ई-मेल अथवा फोन निवडा, त्यावर आणलेला कोड टाका. नवीन पासवर्ड टाका आणि सबमिट करा.

फेसबुक खाते बंद कसे करावे

लॉगिन केल्यानंतर मेन्यू वर अकाउंट सेटिंग वर क्लिक करा. इथे “account ownership and control” असा पर्याय दिसेल. यानंतर “deactivate and deletion” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. इथे दोन पर्याय उपलब्ध असतील. १. तात्पुरते बंद (Deactivate Account)  २. कायमचे बंद (Delete Account). दोन्ही पर्याय सविस्तर जाणून घेऊ.

१. फेसबुक खाते तात्पुरते बंद करणे

जर काही कालावधीसाठी तुम्हाला फेसबुक खाते बंद करायचे आहे तर “Deactivate Account” हा पर्याय निवडा. यामध्ये आपले अकाउंट काही काळ बंद ठेवता येते, ज्यावेळेस परत लॉगिन कराल त्यावेळेस आपोआप खाते चालू होईल. तसेच काही विशिष्ट कालावधी जसे ७ दिवस, ३० दिवस, सहा महिने असे पर्याय फेसबुक ने दिले आहेत. उदा. तुम्ही ७ दिवस हा पर्याय निवडला तर सात दिवसासाठी आपले फेसबुक खाते बंद होईल. सात दिवसानंतर ते परत कार्यरत (active) केले जाईल. जर कालावधी ठराविक नसे तर शेवटी दिलेला पर्याय निवडू शकता. ज्यामध्ये जोपर्यंत तुम्ही लॉगिन करणार नाही तोपर्यंत अकाउंट बंद राहील.

डीएक्टिवेट पर्याय निवडल्यानंतर “continue” वरती क्लिक करा. यानंतर आपण खाते का बंद करत आहेत याचे कारण निवडण्यास सांगितले जाईल.योग्य पर्याय निवडून “continue” वर क्लिक करा. जर फक्त फेसबुक बंद करायचे असेल आणि मेसेंजर सुरु ठेवायचे असेल तर “keep using messenger” याला टिक करा आणि “continue” वर क्लीक करा. आपले फेसबुक अकाउंट तात्पुरते बंद झाले असेल.

फेसबुक खाते बंद कसे करावे

२. फेसबुक खाते कायमचे बंद करणे

जर फेसबुक अकाउंट कायमचे बंद करायचे असं तर “Delete Account” हा पर्याय निवडा आणि “continue” वर क्लिक करा. आपली पूर्ण माहिती काढून टाकण्यात येईल याची खात्री करून दिली जाईल आणि तसें नको असेल तर तात्पुरते बंद करण्याचा पर्याय निवडावा असे सूचित करण्यात येईल. या पर्यायाबद्दल माहिती क्रमांक एक मध्ये दिली आहे.

कायमचे खाते बंद करत असल्याने, फेसबुक वर टाकलेली सर्व माहिती डाउनलोड करण्याचा पर्याय दिलेला आहे. जिथे पोस्ट, फोटो, व्हिडिओ आणि अन्या माहिती आपल्याकडे घेता येईल. तसेच इतर अँप्स/सेवा यांच्याशी खाते जोडलेले असेल तर ते रद्द केले जाईल असे सूचित करण्यात येते. त्यानंतर “continue”  वर क्लिक करा.

आपला पासवर्ड विचारला जाईल, तो पासवर्ड टाकून “continue” वर क्लिक करा. नंतर “delete account” वर क्लीक करा आणि आपले फेसबुक खाते बंद झाले असा संदेश दाखवला जाईल. तसेच 30 दिवसांचा अवधी दिला जाईल, जर आपल्याला परत खाते चालू करावेसे वाटले तर या तीस दिवसाच्या आत तसे करता येते. तीस दिवसाच्या आत लॉगिन केले तर cancel deletion असा पर्याय येईल तो निवडू शकता. लॉगिन नाही केले तर या कालावधीनंतर कायमचे फेसबुक खाते बंद होईल.


अलीकडील लेख

error: Content is protected !!